The US National Security Advisor calls on PM Modi
January 06th, 07:43 pm
The US National Security Advisor Mr. Jake Sullivan called on Prime Minister Shri Narendra Modi today.व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याअंतर्गत 71,000 पेक्षा जास्त नियुक्ती पत्रांच्या वितरण प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
December 23rd, 11:00 am
मी काल रात्री उशिरा कुवेतहून परत आलो आहे… तिथे मी भारतीय युवा आणि व्यावसायिकांची भेट घेतली आणि खूप गप्पा मारल्या. आता इथे आल्यानंतर माझा पहिला कार्यक्रम देशातील युवा वर्गासोबत आयोजित केला आहे. हा अतिशय सुखद योगायोग आहे. आज देशातील हजारो युवांसाठी,आपणा सर्वांच्या आयुष्याची नवी सुरुवात होते आहे. तुमचे कित्येक वर्षांपूर्वीचे स्वप्न पूर्ण झाले आहे, वर्षानुवर्षे केलेल्या मेहनतीला यश आले आहे. 2024 हे सरणारे वर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना नवीन आनंद देऊन जाते आहे. मी तुम्हा सर्व युवांचे आणि तुमच्या कुटुंबियांचे अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारी विभाग आणि संघटनांमध्ये नियुक्त झालेल्या नवनियुक्तांना रोजगार मेळ्या अंतर्गत केले 71,000 पेक्षा जास्त नियुक्तीपत्रांचे वितरण
December 23rd, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याला संबोधित केले आणि सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नवनियुक्त 71,000 हून अधिक युवांना नियुक्ती पत्रांचे वितरण केले. हा रोजगार मेळा पंतप्रधानांच्या रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करत असून युवकांना राष्ट्रउभारणी आणि आत्मसक्षमीकरणात योगदान देण्यासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून त्यांना सक्षम करेल.संयुक्त निवेदन: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शासकीय कुवेत दौरा (डिसेंबर 21-22, 2024)
December 22nd, 07:46 pm
कुवेतचे महामहीम अमीर शेख मेशल अल -अहमद अल-जबर अल-सबाह यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21-22 डिसेंबर 2024 दरम्यान कुवेतचा शासकीय दौरा केला. हा त्यांचा पहिला कुवेत दौरा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 डिसेंबर 2024 ला कुवेत मध्ये 26 व्या अरेबियन गल्फ करंडकाच्या उद्घाटन समारंभात अमीर शेख मेशल अल -अहमद अल-जबर अल-सबाह यांचे सन्मानीय अतिथी म्हणून उपस्थित राहिले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कुवेतच्या पंतप्रधानांची भेट
December 22nd, 06:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कुवेतचे पंतप्रधान महामहिम शेख अहमद अल-अब्दुल्ला अल-अहमद अल-सबाह यांची भेट घेऊन चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी राजकीय, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संरक्षण, सुरक्षा, आरोग्य, शिक्षण, तंत्रज्ञान, सांस्कृतिक आणि परस्पर संबंध यासारख्या क्षेत्रांमध्ये धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठीच्या आराखड्यावर चर्चा केली.फलनिष्पत्तींची यादी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कुवेतला भेट (डिसेंबर 21-22, 2024)
December 22nd, 06:03 pm
हा सामंजस्य करार संरक्षण क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याला संस्थात्मक रूप प्रदान करेल. सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण, कर्मचारी आणि तज्ञांची देवाणघेवाण, संयुक्त सराव, संरक्षण उद्योगात सहकार्य, संरक्षण उपकरणांचा पुरवठा तसेच संशोधन आणि विकासामध्ये सहकार्य यांचा समावेश आहे.नेदरलँडचे पंतप्रधान डिक शूफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला
December 18th, 06:51 pm
नेदरलँडचे पंतप्रधान डिक शूफ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला.India - Sri Lanka Joint Statement: Fostering Partnerships for a Shared Future
December 16th, 03:26 pm
Prime Minister of India His Excellency Shri Narendra Modi and President of Sri Lanka His Excellency Anura Kumara Dissanayake had comprehensive and fruitful discussions at their meeting in New Delhi on 16 December 2024, during the latter’s State Visit to the Republic of India.श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले निवेदन
December 16th, 01:00 pm
अध्यक्ष दिसनायके यांचे मी भारतात अतिशय जिव्हाळ्याने स्वागत करतो. तुमच्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी तुम्ही भारताची निवड केली त्याबद्दल मला अतिशय आनंद झाला आहे. अध्यक्ष दिसनायके यांच्या भेटीमुळे आमच्या संबंधांमध्ये नव्या उर्जेचा आणि गतिशीलतेचा संचार झाला आहे. आमच्या भागीदारीमध्ये आम्ही भविष्यवेधी दृष्टीकोनाचा अंगिकार केला आहे. आमच्या आर्थिक भागीदारीत आम्ही गुंतवणूक-प्रणीत वृद्धीवर आणि संपर्कव्यवस्थेवर भर दिला आहे आणि भौतिक, डिजिटल आणि ऊर्जा कनेक्टिव्हिटी हे आमच्या भागीदारीचे प्रमुख स्तंभ असतील असा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांदरम्यान विद्युत ग्रीड कनेक्टिव्हिटी आणि बहु-उत्पादन पेट्रोलियम पाईपलाईन्स स्थापन करण्यासाठी आम्ही काम करू. सामपुर सौर ऊर्जा प्रकल्पाला गती दिली जाईल. त्याव्यतिरिक्त श्रीलंकेच्या ऊर्जा प्रकल्पांना एलएनजीचा पुरवठा केला जाईल. द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्यासाठी दोन्ही बाजू ईटीसीए लागू करण्यासाठी पावले उचलतील.Our government has taken unprecedented steps for women empowerment in the last 10 years: PM in Panipat, Haryana
December 09th, 05:54 pm
PM Modi launched the ‘Bima Sakhi Yojana’ of Life Insurance Corporation, in line with his commitment to women empowerment and financial inclusion, in Panipat, Haryana. The Prime Minister stressed that it was imperative to ensure ample opportunities and remove every obstacle in their way to empower women. He added that when women were empowered, new doors of opportunities opened for the country.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला एलआयसीच्या बिमा सखी योजनेचा शुभारंभ
December 09th, 04:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महिला सक्षमीकरण आणि आर्थिक समावेशन या त्यांच्या बांधिलकीला अनुसरून हरयाणात पानिपत येथे भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या बिमा सखी योजना या योजनेचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी कर्नाल येथील महाराणा प्रताप फळबागायत विद्यापीठाच्या मुख्य संकुलाची देखील पायाभरणी केली.आज भारत महिला सक्षमीकरणाच्या दिशेने आणखी एक मजबूत पाऊल टाकत आहे, असे ते यावेळी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले. ते पुढे म्हणाले की आज महिन्याचा 9 वा दिवस विशेष आहे कारण 9 हा आकडा आपल्या धर्मग्रंथात शुभ मानला गेला होता आणि नवरात्री दरम्यान पूजल्या जाणाऱ्या नवदुर्गाच्या नऊ रूपांशी संबंधित होता. आजचा दिवस नारी शक्तीच्या उपासनेचाही आहे, असे त्यांनी सांगितले.देशभरात नागरी/संरक्षण क्षेत्रां अंतर्गत 85 नवीन केंद्रीय विद्यालये (KVs) उघडण्यास आणि सर्व वर्गांमध्ये 2 अतिरिक्त विभाग जोडून विद्यमान एक KV म्हणजेच KV शिवमोग्गा, कर्नाटकच्या विस्तारास, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
December 06th, 08:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली, मंत्रिमंडळाच्या आर्थिक घडामोडी विषयक समितीने, देशभरात नागरी/संरक्षण क्षेत्रा अंतर्गत 85 नवीन केंद्रीय विद्यालये (KVs) उघडायला आणि कर्नाटकात शिवमोग्गा जिल्ह्यात विद्यमान एक KV चा विस्तार करायला मान्यता दिली आहे.केंद्रीय विद्यालय योजना (केंद्रीय क्षेत्र योजना) अंतर्गत सर्व वर्गांमध्ये दोन अतिरिक्त विभाग जोडून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची वाढलेली संख्या सामावून घेण्यासाठी, हा निर्णय घेण्यात आला आहे . या 86 केंद्रीय विद्यालयांची यादी सोबत जोडली आहे.पंतप्रधानांनी सीमा सुरक्षा दलाला स्थापना दिनाच्या दिल्या शुभेच्छा
December 01st, 08:52 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सीमा सुरक्षा दलाला, दलाच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका बजावलेल्या ‘बीएसएफ’च्या धैर्य, समर्पण व अपवादात्मक सेवेची त्यांनी प्रशंसा केली.पंतप्रधान सुरीनामच्या राष्ट्रपतींना भेटले
November 21st, 10:57 pm
दोन्ही नेत्यांनी यावेळी विद्यमान द्विपक्षीय उपक्रमांचा आढावा घेतला तसेच त्यांनी संरक्षण आणि सुरक्षा, व्यापार आणि वाणिज्य, कृषी, युपीआय आणि आयसीटी यांसारखे डिजिटल उपक्रम, आरोग्यसेवा आणि औषधनिर्मिती, क्षमता निर्मिती, संस्कृती आणि दोन्ही देशांतील जनतेमधील परस्पर संबंध यांसह अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक वाढवण्यावर सहमती व्यक्त केली. सुरीनामला विकासविषयक सहकार्यासाठी विशेषतः समुदाय विकास प्रकल्प, अन्न सुरक्षा विषयक उपक्रम आणि लघु तसेच मध्यम उद्योग या क्षेत्रांमध्ये भारत देत असलेल्या सातत्यपूर्ण पाठींब्याबद्दल राष्ट्रपती संतोखी यांनी कौतुक व्यक्त केले.दुसरी भारत-ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषद
November 20th, 08:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी 19 नोव्हेंबर रोजी रिओ दि जानेरो येथे झालेल्या जी20 शिखर परिषदेला अनुषंगून दुसऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत भेट घेतली. पहिली वार्षिक शिखर परिषद 10 मार्च 2023 रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधान अल्बनीज यांच्या भारताच्या राजकीय दौऱ्यादरम्यान झाली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली चिलीच्या राष्ट्राध्यक्षांची भेट
November 20th, 08:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 नोव्हेंबर रोजी चिली प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फॉन्ट यांची ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जी -20 शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट घेतली. ही त्यांची पहिली भेट होती.रिओ दि जानेरो येथील G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली
November 20th, 08:05 pm
रिओ दि जानेरो येथे सुरु असलेल्या G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 नोव्हेंबर रोजी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांची भेट घेतली.Joint Statement: 2nd India-Australia Annual Summit
November 19th, 11:22 pm
PM Modi and Anthony Albanese held the second India-Australia Annual Summit during the G20 Summit in Rio de Janeiro. They reviewed progress in areas like trade, climate, defence, education, and cultural ties, reaffirming their commitment to deepen cooperation. Both leaders highlighted the benefits of closer bilateral engagement and emphasized advancing the Comprehensive Economic Cooperation Agreement (CECA) to strengthen trade and investment ties.पंतप्रधानांनी घेतली इटलीच्या पंतप्रधानांची भेट
November 19th, 08:34 am
ब्राझीलमध्ये रिओ द जानिरो येथे आयोजित जी20 परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी आज इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. या दोन पंतप्रधानांची गेल्या दोन वर्षांतील ही पाचवी भेट आहे. आजच्या भेटीआधी जून 2024 मध्ये इटलीत पुगलिया येथे पंतप्रधान मेलोनी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जी 7 शिखर परिषदेनिमित्त या दोन नेत्यांची भेट झाली होती. सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत जी 7 चे नेतृत्व करत असल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान मेलोनी यांचे अभिनंदन केले.पंतप्रधान आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष यांची झाली भेट
November 19th, 06:09 am
ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष एचई प्रबोवो सुबियांटो यांची आज भेट घेतली. दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती.