
गेल्या 11 वर्षात, आमच्या सरकारचे प्रत्येक पाऊल गरिबांची सेवा, सुशासन आणि कल्याणासाठी समर्पित आहेः पंतप्रधान
June 05th, 09:45 am
पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी एनडीए सरकारची गरीब कल्याणासाठी असलेली अतूट बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली. देशात परिवर्तनकारी आणि सर्वसमावेशक शासनाची 11 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, ते म्हणाले की, सक्षमीकरण, पायाभूत सुविधा आणि समावेशकतेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या एका कनवाळू सरकारने 25 कोटींहून अधिक लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
एबीपी नेटवर्क इंडिया @2047 शिखर परिषदेतील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
May 06th, 08:04 pm
भारत मंडपमचा हा मंच आज सकाळपासून एक सजीव व्यासपीठ बनला आहे. नुकतीच मला तुमच्या पथकाची काही मिनिटांसाठी भेट घेण्याची संधी मिळाली. ही शिखर परिषद बऱ्याच विविधतेने नटलेली आहे. अनेक माननीय व्यक्तींनी या शिखर परिषदेत रंग भरले आहेत. मला खात्री आहे की तुम्हा सर्वांनाही खूप छान अनुभव आला असेल. या परिषदेत मोठ्या संख्येने तरुण आणि महिलांच्या असलेल्या उपस्थितीत बहुदा त्याचे अनोखेपण सामावले आहे. विशेषतः आमच्या ड्रोन दीदी आणि लखपती दीदींनी त्यांचे अनुभव सामायिक केले. जेव्हा मी नुकताच या सर्व निवेदकांना भेटलो तेव्हा मी पहात होतो की ते त्यांचे अनुभव अत्यंत उत्साहाने सामायिक करित आहेत. त्यांचा प्रत्येक संवाद त्यांच्या स्मरणात होता. याचा अर्थ असा की ही एक खूपच प्रेरणादायी संधी साध्य झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एबीपी नेटवर्क इंडिया@2047 शिखर संमेलनाला केले संबोधित
May 06th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे एबीपी नेटवर्क इंडिया@2047 शिखर संमेलनात सहभागी झाले. उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, भारत मंडपममधील या कार्यक्रमात सकाळपासूनच उत्साहाचा संचार आहे. त्यांनी आयोजकांच्या चमूसोबतच्या संवादाचा उल्लेख केला आणि शिखर संमेलनातील समृद्ध विविधता अधोरेखित केली. कार्यक्रमाच्या गतिशीलतेमध्ये योगदान दिलेल्या अनेक मान्यवर व्यक्तींच्या सहभागाची त्यांनी दखल घेतली. सर्व उपस्थितांना अत्यंत सकारात्मक अनुभव आला असेल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. शिखर संमेलनात युवा वर्ग आणि महिलांची लक्षणीय उपस्थिती अधोरेखित करताना, त्यांनी विशेषतः ड्रोन दीदी आणि लखपती दीदी यांनी सांगितलेल्या प्रेरणादायी अनुभवांकडे लक्ष वेधले. त्यांच्या कथा प्रेरणादायी आहेत, असे त्यांनी नमूद केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या TV9 शिखर परिषद 2025 मधील भाषणाचा मराठी अनुवाद
March 28th, 08:00 pm
श्रीयुत रामेश्वर गारू जी, रामू जी, बरुण दास जी, TV9 ची संपूर्ण टीम, मी आपल्या नेटवर्कच्या सर्व प्रेक्षकांचे, इथे उपस्थित सर्व मान्यवरांचे अभिनंदन करतो, या शिखर परिषदेसाठी अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही 9 शिखर परिषदेत केले भाषण
March 28th, 06:53 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित टीव्ही 9 शिखर परिषदेत भाग घेतला. या परिषदेमध्ये संबोधित करताना त्यांनी टीव्ही9च्या संपूर्ण टीमला आणि त्याच्या प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, टीव्ही9 चा विस्तृत प्रादेशिक प्रेक्षकवर्ग आहे आणि आता जागतिक प्रेक्षकवर्गही तयार होत आहे. त्यांनी या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे जोडलेल्या परदेशस्थ भारतीयांचेही स्वागत केले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या.