
रोजगार मेळाव्याअंतर्गत 51,000 हून अधिक नियुक्ती पत्रांच्या वितरण प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 26th, 11:23 am
आज 51000 हून अधिक तरुणांना केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये पक्क्या सरकारी नोकरीची पत्रे देण्यात आली आहेत. आज भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये तरुणांच्या नव्या जबाबदाऱ्यांची सुरुवात झाली आहे. तुमची जबाबदारी देशाची आर्थिक व्यवस्था मजबूत करण्याची आहे, तुमची जबाबदारी देशाची अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्याची आहे, देशात आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करणे ही तुमची जबाबदारी आहे, कामगारांच्या जीवनात मूलभूत बदल घडवून आणण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही तुमची कामे जेवढ्या प्रामाणिकपणे पूर्ण कराल तेवढा त्याचा सकारात्मक परिणाम विकसित भारताच्या प्रवासावर पडलेला दिसेल. मला खात्री आहे की तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण निष्ठेने पार पाडाल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळाव्याला केले संबोधित
April 26th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रोजगार मेळाव्याला मार्गदर्शन केले; याप्रसंगी दूरदृश्य प्रणालीमार्फत विविध सरकारी विभाग आणि संघटनांमध्ये नवनियुक्त 51,000 हून अधिक तरुणांना नियुक्ती पत्रांचे वितरण आज करण्यात आले. आज भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये या तरुणांच्या कारकिर्दीतील नवीन जबाबदाऱ्यांची सुरुवात होते आहे, असे पंतप्रधानांनी आजच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना सांगितले. देशाची आर्थिक चौकट मजबूत करणे, अंतर्गत सुरक्षा मजबूत करणे, आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये योगदान देणे आणि कामगारांच्या जीवनात परिवर्तनकारी बदल घडवणे, अशी आवश्यक कर्तव्ये पार पाडण्याचे काम या तरुणांना करावयाचे आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. तरुण ज्या प्रामाणिकतेने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतील त्याचा भारताच्या विकसित राष्ट्र बनण्याच्या प्रवासावर सकारात्मक परिणाम होईल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित कले. नव्याने कामावर रूजू होणारे तरुण अत्यंत समर्पण भावाने त्यांची कर्तव्ये पार पाडतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 व्या नागरी सेवा दिनी केलेले भाषण
April 21st, 11:30 am
मंत्रिमंडळातले माझे सहकारी डॉ जितेंद्र सिंह जी, शक्तीकांत दास जी,डॉ. सोमनाथ जी, इतर वरिष्ठ अधिकारी वर्ग, देशभरातून जोडले गेलेले नागरी सेवेतील सर्व मित्र, महिला आणि सद्गृहस्थ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 व्या नागरी सेवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला केले संबोधित
April 21st, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 17 व्या नागरी सेवा दिनानिमित्त नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे नागरी सेवकांना संबोधित केले. त्यांनी लोक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठीचे पंतप्रधान पुरस्कारदेखील प्रदान केले. उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी नागरी सेवा दिनानिमित्त सर्वांचे अभिनंदन केले आणि संविधानाचे 75 वे वर्ष आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती असल्याने या वर्षीच्या उत्सवाचे महत्त्व अधोरेखित केले. सरदार पटेल यांनी 21 एप्रिल1947 रोजी नागरी सेवकांना 'भारताची पोलादी चौकट' असे संबोधले होते. त्या संस्मरणीय संबोधनाची आठवण करून देताना, पंतप्रधान मोदी यांनी शिस्त, प्रामाणिकपणा आणि लोकशाही मूल्यांचे पालन करणारी आणि अत्यंत समर्पणाने देशाची सेवा करणारी सनदी सेवा, या सरदार पटेल यांच्या दृष्टिकोनावर भर दिला. विकसित भारत निर्माण करण्याच्या भारताच्या संकल्पाच्या संदर्भात त्यांनी सरदार पटेल यांच्या आदर्शांची प्रासंगिकता अधोरेखित केली आणि सरदार पटेल यांच्या दूरदृष्टीला आणि वारशाला मनापासून अभिवादन केले.NXT कॉन्क्लेवमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 01st, 11:00 am
NewsX World याची शुभ सुरुवात आणि यासाठी मी तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो, खूप-खूप शुभेच्छा देतो. तुमच्या नेटवर्कमधील हिंदी आणि इंग्रजीसहित सर्व प्रादेशिक वाहिन्या आज तुम्ही ग्लोबल होत आहात आणि आज अनेक fellowships आणि scholarship ची देखील सुरुवात झाली आहे. मी या कार्यक्रमांसाठी तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा देतो.NXT Conclave या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग
March 01st, 10:34 am
नवी दिल्ली मधील भारत मंडपम इथे आजपासून NXT Conclave या परिषदेला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज या परिषदेत सहभागी झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. यावेळी त्यांनी NewsX World या माध्यम समुहाच्या शुभारंभाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदनही केले. या माध्यम समुहात हिंदी, इंग्रजी आणि विविध प्रादेशिक भाषांमधील वाहिन्यांचा समावेश असून, या समूहाने आज जागतिक समूह होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. या समुहाने अनेक पाठ्यवृत्ती आणि शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरु केला असल्याचे सांगून या कार्यक्रमांसाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.जयपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या उदयोन्मुख राजस्थान जागतिक गुंतवणूक शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 09th, 11:00 am
राजस्थानच्या विकास यात्रेतील आज एक महत्वाचा दिवस आहे. देश आणि जगभरातून खूप मोठ्या संख्येने प्रतिनिधी, गुंतवणूकदार या गुलाबी नगरीमध्ये आले आहेत. इथल्या उद्योग विश्वातील अनेक सहकारीही आज इथे उपस्थित आहेत. ‘उदयोन्मुख राजस्थान शिखर परिषदेमध्ये आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो. इतक्या शानदार कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मी राजस्थानच्या भाजपा सरकारला शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायझिंग राजस्थान जागतिक गुंतवणूक शिखर परिषदेचे केले उद्घाटन
December 09th, 10:34 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमध्ये जयपूर येथे रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिट 2024 या गुंतवणूकदार शिखर परिषदेचे आणि राजस्थान ग्लोबल बिझनेस एक्स्पो या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, आज राजस्थानच्या यशस्वी वाटचालीमधील आणखी एक विशेष दिवस आहे. त्यांनी जयपूर या गुलाबी शहरात सर्व उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील अग्रणी, गुंतवणूकदार, प्रतिनिधींचे रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिट 2024 मध्ये स्वागत केले. या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल राजस्थान सरकारचे देखील अभिनंदन केले.प्रशासनासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि डाटा संदर्भातील जाहिरनामा - अनेक जी 20 देशांनी, अतिथी देशांनी तसेच आंतरराष्ट्रीय संघटनांनी मान्यता दिलेले आणि भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या जी 20 मधील त्रयीतर्फे सादर करण्यात आलेले संयुक्त परिपत्रक
November 20th, 07:52 am
केवळ 3 टक्क्याची जागतिक वृद्धी ही या शतकातील सर्वात नीचांकी वृद्धी असून महामारीच्या आधीपर्यंत या वृद्धीचा दर सुमारे 4 टक्के होता. त्याच वेळी तंत्रज्ञान मात्र भोवळ आणणाऱ्या वेगाने प्रगती करत असून जर न्याय्य पद्धतीने वापरले तर हे तंत्रज्ञान आपल्याला वृद्धीचा दर वाढवण्याची ऐतिहासिक संधी देते, असमानता कमी करते आणि शाश्वत विकास उद्दीष्ठांची (एसडीजीज)पूर्तता करण्यातील दरी भरून काढण्याच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल ठरते.डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा व्यवस्थापनावर भर ही सर्वसमावेशक विकास साध्य करण्याची आणि जागतिक स्तरावर जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची गुरुकिल्ली आहे: पंतप्रधान
November 20th, 05:04 am
सर्वसमावेशक वाढ साध्य करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर जीवन बदलण्यासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा व्यवस्थापन महत्त्वाचे आहे यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भर दिला.ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश येथे सेमीकॉन इंडिया 2024 कार्यक्रमात झालेले पंतप्रधानांचे भाषण
September 11th, 12:00 pm
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री-योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी-अश्विनी वैष्णव आणि जितीन प्रसाद, जागतिक सेमीकंडक्टर उद्योगाशी संबंधित सर्व दिग्गज, शिक्षण-संशोधन आणि नवोन्मेष क्षेत्रातील सर्व भागीदार, इतर मान्यवर पाहुणे, स्त्री-पुरुष आणि सज्जनहो, सर्वांना नमस्कार!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे सेमीकॉन इंडिया 2024 चे उद्घाटन
September 11th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्स्पो मार्ट येथे सेमीकॉन इंडिया 2024 चे उद्घाटन केले. यानिमित्त आयोजित प्रदर्शनालाही मोदी यांनी भेट दिली. 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान आयोजित या तीन दिवसीय परिषदेत भारताची सेमीकंडक्टर रणनीती आणि धोरण प्रदर्शित केले जाणार आहे ज्यामध्ये भारताला सेमीकंडक्टरचे जागतिक केंद्र बनवण्याची कल्पना आहे.कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी वार्षिक शिखर परिषद 2023 च्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले संबोधन
December 12th, 05:20 pm
आणि यामुळेच या शिखर परिषदेची जोडल्या गेलेल्या प्रत्येक देशावर एक मोठी जबाबदारी असणार आहे. मागच्या काही दिवसात मला अनेक राजकीय आणि उद्योग क्षेत्रातल्या नेत्यांशी भेटण्याची संधी मिळाली मी त्यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये सुद्धा या शिखर परिषदेविषयी चर्चा केली आहे. एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ते च्या प्रभावाखालून सध्याच्या आणि येणाऱ्या अनेक पिढ्या असे कोणीच सुटू शकणार नाही. आपल्याला खूपच सतर्क राहून आणि खूपच सावधानता बाळगून वाटचाल करावी लागणार आहे.आणि यासाठी मी समजतो की या शिखर परिषदेतून पुढे येणारे विचार या परिषदेतून मिळणाऱ्या सूचना संपूर्ण मानव जातीसाठी जे मूलभूत मूल्य आहे त्याचे संरक्षण करणे आणि त्याला योग्य दिशा देण्याचे काम करेल.पंतप्रधानांच्या हस्ते कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी वार्षिक शिखर परिषदेचे (जीपीएआय) उद्घाटन
December 12th, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी शिखर परिषदेचे (जीपीएआय) उद्घाटन केले. पंतप्रधानांनी जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक प्रदर्शनाचाही आढावा घेतला. जीपीएआय हा 29 सदस्य देशांसह एक बहु-हितधारक उपक्रम आहे. एआय संबंधित प्राधान्यक्रमांवरील अत्याधुनिक संशोधन आणि उपयोजित उपक्रमांना समर्थन देऊन एआय वरील सिद्धांत आणि सराव यांच्यातील अंतर कमी करण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे. वर्ष 2024 मध्ये भारत ‘ जीपीएआय’चे अध्यक्षस्थान भूषवेल.Embrace challenges over comforts: PM Modi at IIT, Kanpur
December 28th, 11:02 am
Prime Minister Narendra Modi attended the 54th Convocation Ceremony of IIT Kanpur. The PM urged the students to become impatient for a self-reliant India. He said, Self-reliant India is the basic form of complete freedom, where we will not depend on anyone.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कानपूर आयआयटीचा 54 वा दीक्षांत समारंभ संपन्न , ब्लॉकचेन आधारित डिजिटल पदव्यांचा केला प्रारंभ
December 28th, 11:01 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज कानपूर आयआयटीचा 54 वा दीक्षांत समारंभ झाला यावेळी त्यांनी ब्लॉकचेन आधारित तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल पदवी प्रदान केल्या.पश्चिम बंगाल मध्ये आयआयटी खरगपूरच्या 66 व्या पदवीदान समारंभात पंतप्रधानांचे भाषण
February 23rd, 12:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयआयटी खरगपूरच्या 66 व्या दीक्षांत समारंभाला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यावेळी उपस्थित होते.आयआयटी खरगपूरच्या 66 व्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधानांनी संबोधित केले
February 23rd, 12:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयआयटी खरगपूरच्या 66 व्या दीक्षांत समारंभाला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यावेळी उपस्थित होते.जागतिक आर्थिक मंचाच्या दावोस चर्चासत्रातील पंतप्रधानांचे संबोधन
January 28th, 05:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक आर्थिक मंचाच्या दावोस चर्चासत्रामध्ये दूरदृश्य प्रणालीव्दारे संवाद साधला. ‘‘चौथी औद्योगिक क्रांती - मानवतेच्या हितार्थ तंत्रज्ञानाचा वापर’’ या विषयावर पंतप्रधानांनी भाषण केले. या कार्यक्रमामध्ये त्यांनी विविध संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशीही संवाद साधला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जागतिक आर्थिक मंचाच्या दावोस चर्चासत्रामध्ये भाषण
January 28th, 05:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक आर्थिक मंचाच्या दावोस चर्चासत्रामध्ये दूरदृश्य प्रणालीव्दारे संवाद साधला. ‘‘चौथी औद्योगिक क्रांती - मानवतेच्या हितार्थ तंत्रज्ञानाचा वापर’’ या विषयावर पंतप्रधानांनी भाषण केले. या कार्यक्रमामध्ये त्यांनी विविध संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशीही संवाद साधला.