17 व्या लोकसभेच्या शेवटच्या बैठकीत पंतप्रधानांनी केलेले संबोधन
February 10th, 04:59 pm
आजचा हा दिवस लोकशाहीच्या महान परंपरेचा महत्वाचा दिवस आहे.सतराव्या लोकसभेने पाच वर्षे देश सेवेत ज्या प्रकारे अनेक विविध महत्वपूर्ण निर्णय घेतले, अनेक आव्हानांना सर्वांनी आपल्या सामर्थ्याने देशाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला,एका प्रकारे आजचा हा दिवस आपणा सर्वांचा हा पाच वर्षांचा वैचारिक प्रवास, राष्ट्राला समर्पित तो काळ, देशाला पुन्हा एकदा आपले संकल्प राष्ट्र चरणी समर्पित करण्याची ही संधी आहे. ही पाच वर्षे देशात रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म,हे फार क्वचितच घडते.सुधारणाही होतात,कामगिरीही होते आणि परिवर्तन होताना आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहतो,एक नवा विश्वास निर्माण होतो. हे सतराव्या लोकसभेद्वारे देश अनुभवत आहे.मला विश्वास आहे की देश सतराव्या लोकसभेला नक्कीच आशीर्वाद देत राहील. या सर्व प्रक्रियेत सदनाच्या सर्व माननीय सदस्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. सर्व माननीय सदस्यांच्या या चमूचा नेता या नात्यानेही आणि आपणा सर्वांचा एक सहकारी या नात्यानेही मी आपणा सर्वांचे अभिनंदन करतो.17 व्या लोकसभेच्या शेवटच्या बैठकीला पंतप्रधानांनी केले संबोधित
February 10th, 04:54 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सभागृहाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, आजचा हा प्रसंग भारताच्या लोकशाहीसाठी महत्त्वपूर्ण आहे. पंतप्रधान मोदी यांनी 17 व्या लोकसभेच्या सर्व सदस्यांनी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि देशाला दिशा देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. ते म्हणाले की, आजचा दिवस हा वैचारिक प्रवास आणि हा काळ राष्ट्राच्या उन्नतीसाठी समर्पित करण्याचा एक विशेष प्रसंग आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात ' 'रीफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म' ' हा मंत्र राहिला आहे आणि आज संपूर्ण देश ते अनुभवत असल्याचे ते म्हणाले. 17 व्या लोकसभेत करण्यात आलेल्या प्रयत्नांना भारतातील जनता यापुढेही आशीर्वाद देत राहील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. सभागृहातील सर्व सदस्यांचे योगदान अधोरेखित करत मोदी यांनी त्यांच्याप्रती विशेषतः अध्यक्षांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. पंतप्रधानांनी सभापतींचे आभार मानले आणि सभागृहाचे कामकाज हसतमुखाने , संतुलित आणि निष्पक्ष पद्धतीने हाताळल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली.विकसित भारत विकसित गुजरात कार्यक्रमात पंतप्रधानांचे संबोधन
February 10th, 01:40 pm
गुजरातच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, केम छो...मजा मा. आज विकसित भारत-विकसित गुजरात हे फार मोठे अभियान सुरु होत आहे. आणि मला असे सांगण्यात आले आहे की, गुजरातमधील विधानसभेच्या सर्वच्या सर्व 182 जागांवर गुजरातच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. विकसित गुजरातच्या या प्रवासात तुम्ही सर्वजण इतक्या उत्साहाने सहभागी झाला आहात...मी तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो.‘विकसित भारत विकसित गुजरात’ कार्यक्रमात पंतप्रधानांचे मार्गदर्शन
February 10th, 01:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘विकसित भारत विकसित गुजरात’ या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी प्रधानमंत्री आवास योजना(PMAY) आणि इतर गृहनिर्माण योजनांतर्गत गुजरातमध्ये बांधण्यात आलेल्या 1.3 लाखांपेक्षा जास्त घरांचे उद्घाटन आणि भूमीपूजन केले. यावेळी त्यांनी आवास योजनेच्या काही लाभार्थ्यांसोबत संवाद देखील साधला.The soil of India creates an affinity for the soul towards spirituality: PM Modi
October 31st, 09:23 pm
PM Modi participated in the programme marking the culmination of Meri Maati Mera Desh campaign’s Amrit Kalash Yatra at Kartavya Path in New Delhi. Addressing the gathering, PM Modi said, Dandi March reignited the flame of independence while Amrit Kaal is turning out to be the resolution of the 75-year-old journey of India’s development journey.” He underlined that the 2 year long celebrations of Azadi Ka Amrit Mahotsav are coming to a conclusion with the ‘Meri Maati Mera Desh’ Abhiyan.PM participates in program marking culmination of Meri Maati Mera Desh campaign’s Amrit Kalash Yatra
October 31st, 05:27 pm
PM Modi participated in the programme marking the culmination of Meri Maati Mera Desh campaign’s Amrit Kalash Yatra at Kartavya Path in New Delhi. Addressing the gathering, PM Modi said, Dandi March reignited the flame of independence while Amrit Kaal is turning out to be the resolution of the 75-year-old journey of India’s development journey.” He underlined that the 2 year long celebrations of Azadi Ka Amrit Mahotsav are coming to a conclusion with the ‘Meri Maati Mera Desh’ Abhiyan.'मन की बात'च्या बाबतीत लोकांनी जे प्रेम दाखवले ते अभूतपूर्व: पंतप्रधान मोदी
May 28th, 11:30 am
‘मन की बात’ कार्यक्रमात पुन्हा एकदा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. ‘मन की बात’चा हा भाग म्हणजे या कार्यक्रमाच्या द्विशतकाचा प्रारंभ आहे. गेल्या महिन्यात आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा शतक महोत्सव साजरा केला आहे. तुम्हा सर्वांचा सहभाग, हेच या कार्यक्रमाचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. शंभराव्या भागाच्या प्रसारणाच्या वेळेला, एक प्रकारे संपूर्ण देश एका धाग्यात बांधला गेला होता. आपले स्वच्छता कर्मचारी बंधू-भगिनी असोत किंवा विविध क्षेत्रातील नामवंत, ‘मन की बात’ने सर्वांना एकत्र आणण्याचे काम केले आहे. तुम्ही सर्वांनीच या कार्यक्रमाप्रती जी आत्मीयता आणि जिव्हाळा व्यक्त केला आहे, तो केवळ अभूतपूर्व आहे, भावुक करणारा आहे. जेव्हा ‘मन की बात’चे प्रसारण सुरु होते तेव्हा जगाच्या विविध भागांमध्ये असणाऱ्या देशांमध्ये, विविध टाईम झोन मध्ये, काही ठिकाणी संध्याकाळ होत होती, तर काही ठिकाणी रात्र उलटून गेली होती, असे असूनही, तिथल्या लोकांनी 100 वा भाग ऐकण्यासाठी वेळ काढला. आपल्यापासून हजारो मैल दूर असलेल्या न्यूझीलंड देशातला एक व्हिडीओ मी पाहिला, तिथल्या शंभर वर्ष वयाच्या एक मातोश्री आपल्याला आशीर्वाद देत होत्या. 'मन की बात’ कार्यक्रमाबद्दल देश विदेशातील लोकांनी त्यांची मते मांडली आहेत.अनेक जणांनी या कार्यक्रमाचे संरचनात्मक विश्लेषण देखील केले आहे. ‘मन की बात' या कार्यक्रमात केवळ देश आणि देशवासीयांचे कर्तुत्व यांचीच चर्चा होते, याचे लोकांनी कौतुक केले आहे. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या पाठींब्यासाठी आदरसहित धन्यवाद देतो.IPS Probationers interact with PM Modi
July 31st, 11:02 am
PM Narendra Modi had a lively interaction with the Probationers of Indian Police Service. The interaction with the Officer Trainees had a spontaneous air and the Prime Minister went beyond the official aspects of the Service to discuss the aspirations and dreams of the new generation of police officers.सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी येथील प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले मार्गदर्शन
July 31st, 11:01 am
आपल्या सर्वांशी संवाद साधून मला खूप छान वाटले. दरवर्षी माझा असा प्रयत्न असतो, की आपल्यासारख्या तरुण मित्रांशी संवाद साधावा, आपले विचार जाणून घ्यावे. आपण सांगितलेल्या गोष्टी आपले प्रश्न, आपली उत्सुकता, हे सगळे मला भविष्यातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी उपयुक्त ठरतात.पंतप्रधानांनी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये आयपीएस प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला
July 31st, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी येथे आयपीएस प्रशिक्षणार्थींना संबोधित केले. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद देखील साधला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि गृह राज्य मंत्री नित्यानंद राय उपस्थित होते.मन की बातमध्ये सकारात्मकता आणि संवेदनशीलता, त्याला सामुहिक व्यक्तिमत्वः पंतप्रधान मोदी
July 25th, 09:44 am
दोन दिवसांपूर्वीची काही अद्भुत छायाचित्रे, काही अविस्मरणीय क्षणांच्या ताज्या आठवणी आताही माझ्या डोळ्यांसमोर आहेत. त्यामुळे, यावेळच्या ‘मन की बात’ ची सुरुवात याच क्षणांनी करुया. टोक्यो ऑलिंपिक मध्ये भारतीय खेळाडूंना तिरंगा घेऊन चालतांना बघून केवळ मीच नाही, तर संपूर्ण देश रोमांचित झाला होता. त्याक्षणी, संपूर्ण देशाने जणू एकत्र येत, आपल्या या योद्ध्यांना म्हटले -भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या महान व्यक्तींना पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली
March 12th, 03:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्य चळवळीतील सर्व स्वातंत्र्यसैनिक, चळवळ, उठाव आणि संघर्ष यांना आदरांजली वाहिली. त्यांनी चळवळी, संघर्ष आणि व्यक्तिमत्त्वांना विशेष आदरांजली वाहिली , ज्यांना भारताच्या गौरवशाली स्वातंत्र्यलढय़ातील कथेत योग्य ओळख मिळाली नाही. आज अहमदाबादच्या साबरमती आश्रमात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (भारत @ 75) सुरू केल्यानंतर ते बोलत होते.‘आझादी का अमृत महोत्सव’ यानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 12th, 10:31 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद इथे साबरमती आश्रमातून पदयात्रेला ( स्वातंत्र्य यात्रा) हिरवा झेंडा दाखवला. ‘आजादी का अमृत महोत्सव’ India@75 साठीच्या कार्यक्रमांचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. India@75 साठी विविध सांस्कृतिक आणि डिजिटल उपक्रमांचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते.‘आजादी का अमृत महोत्सव’ India@75 साठीच्या कार्यक्रमांचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन
March 12th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद इथे साबरमती आश्रमातून पदयात्रेला ( स्वातंत्र्य यात्रा) हिरवा झेंडा दाखवला. ‘आजादी का अमृत महोत्सव’ India@75 साठीच्या कार्यक्रमांचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. India@75 साठी विविध सांस्कृतिक आणि डिजिटल उपक्रमांचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते.‘स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा’संबंधित उपक्रमांचे पंतप्रधानांच्या हस्ते 12 मार्च रोजी उद्घाटन
March 11th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 12मार्च 2021 रोजी साबरमती आश्रम, अहमदाबाद येथे झेंडा दाखवून ‘पदयात्रे’ला ( स्वातंत्र्य यात्रा ) रवाना करणार आहेत. ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’ची (भारत @75) रंगीत तालीम असलेल्या उपक्रमांचे उदघाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. भारत @75 उत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान विविध अन्य सांस्कृतिक आणि डिजिटल उपक्रमांचे उदघाटन करणार आहेत. आणि ते साबरमती आश्रम येथे मेळाव्याला संबोधित करणार आहेत. सकाळी 10:30 वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाला गुजरातचे राज्यपाल श्री आचार्य देवव्रत, केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार ) श्री प्रल्हादसिंह पटेल आणि गुजरातचे मुख्यमंत्री श्री विजय रुपाणी हे देखील उपस्थित राहतील.