PM dedicates Namo Path, Devka Seafront to the nation in Daman

April 25th, 11:23 pm

PM Modi dedicated to the nation, Namo Path, Devka Seafront in Daman today. Upon arriving at the venue, the PM interacted with construction workers and also posed for a photograph alongside them. He also visited the Naya Bharat Selfie Point.

पंतप्रधानांचे सिल्वासा येथे विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण कार्यक्रमातील भाषण

April 25th, 04:50 pm

व्यासपीठावर उपस्थित प्रफुल्ल पटेल, खासदार विनोद सोनकर, खासदार भगिनी कलाबेन, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा भवर जी , भाई राकेश सिंह चौहान जी , वैद्यकीय क्षेत्रातील मित्रगण , इतर मान्यवर आणि मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो! केम छो मजा, सुख मा, संतोष मा, आनंद मा, प्रगति मा, विकास मा...वाह. मी जेव्हा जेव्हा इथे येतो तेव्हा माझे मन आनंदाने भरून येते. दमण, दीव, दादरा आणि नगर हवेलीच्या विकासाचा प्रवास पाहणे हा माझ्यासाठीही सुखद अनुभव असतो. आणि आता जी चित्रफित पाहिली , कोणी कल्पना करू शकत नाही की, इतक्या छोट्या क्षेत्रात चहु दिशांना आधुनिक आणि वेगवान विकास कशाप्रकारे होतो आहे , ते आपण चित्रफितीमध्ये अत्यंत चांगल्या रीतीने पाहिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिल्वासा, दादरा आणि नगर हवेली येथे 4850 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण

April 25th, 04:49 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सिल्वासा, दादरा आणि नगर हवेली येथे 4850 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण झाले. या प्रकल्पांमध्ये सिल्वासा येथील नमो वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन या संस्थेचे लोकार्पण, सरकारी शाळा, दमण येथे सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय, विविध रस्त्यांचे सुशोभीकरण, बळकटीकरण आणि रुंदीकरण, फिश मार्केट आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स, पाणीपुरवठा योजनेचा विस्तार अशा 96 प्रकल्पांचा समावेश आहे. दीव आणि सिल्वासा येथील पंतप्रधान आवास योजना शहरी योजनेच्या लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते घरांच्या किल्ल्यांचे वितरण देखील करण्यात आले.

पंतप्रधान 24 आणि 25 एप्रिलला मध्य प्रदेश, केरळ, दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीवला देणार भेट

April 21st, 03:02 pm

पंतप्रधान 24 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 11:30 वाजता मध्‍य प्रदेशातील रीवा येथे राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. रिवा येथे त्यांच्या हस्ते सुमारे 17,000 कोटी रूपये खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण होईल.

पंतप्रधानांनी दीवच्या किनारी स्वच्छता आणि विकासावर उल्लेखनीय माहिती केली सामायिक

April 07th, 11:17 am

“अद्भूत किनारपट्टी लाभलेल्या दिवच्या संदर्भात किनारी स्वच्छता आणि विकासावरील हा एक उल्लेखनीय ट्विट थ्रेड आहे. सामूहिक प्रयत्नांमुळे मानसिकतेत कसा बदल होतो आणि संपूर्ण समाजाचा फायदा कसा होतो याचे हे निदर्शक आहे.”

रोजगार मेळाव्यात नोकरी मिळालेल्या जवळपास 71,000 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्याच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण

November 22nd, 10:31 am

तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. आज देशाच्या 45 शहरांत 71 हजारांपेक्षा जास्त तरुणांना नियुक्तीपत्रे दिली जात आहेत. म्हणजे, आज एकाच वेळी हजारो घरांत सुखाच्या नव्या पर्वाची सुरवात झाली आहे. गेल्या महिन्यात आजच्याच दिवशी धनत्रयोदशीला केंद्र सरकार तर्फे 75 हजार तरुणांना नियुक्तीपत्रे वितरीत करण्यात आली होती. आणि आजचा हा विशाल रोजगार मेळावा हेच दाखवतो आहे, की सरकार कशाप्रकारे सरकारी नोकऱ्या देण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे.

रोजगार मेळाव्या अंतर्गत नव्याने भर्ती झालेल्या सुमारे 71,000 जणांना पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण

November 22nd, 10:30 am

रोजगार मेळाव्या अंतर्गत नव्याने भर्ती झालेल्या सुमारे 71,000 जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचे वितरण केले. रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी, तरुणांच्या सक्षमीकरण तसेच राष्ट्रीय विकासात थेट सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करण्याकरता रोजगार मेळावा उत्प्रेरक म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे. याआधी ऑक्‍टोबरमध्ये रोजगार मेळाव्या अंतर्गत नव्याने भर्ती झालेल्या 75,000 जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती.

गोव्यात पणजी येथे हर घर जल उत्सवात पंतप्रधानांनी ध्वनीचित्रफीतीद्वारे दिलेला संदेश

August 19th, 04:51 pm

नमस्कार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत जी, गोवा सरकारमधील अन्य मंत्री, अन्य मान्यवर , महिला आणि पुरुषगण , आज एक अतिशय महत्वाचा आणि पवित्र दिवस आहे. देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह आहे. सर्व देशवासियांना, जगभरातील भगवान श्रीकृष्णाच्या भक्तांना खूप-खूप शुभेच्छा. जय श्री कृष्ण.

पंतप्रधानांनी, जल जीवन मिशन अंतर्गत हरघर जल उत्सवाला ध्वनीचित्रफीत संदेशाद्वारे केले संबोधित

August 19th, 12:12 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जल जीवन मिशन अंतर्गत हरघर जल उत्सवाला ध्वनीचित्रफीत संदेशाद्वारे संबोधित केले. हा कार्यक्रम गोव्यात पणजी येथे झाला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांनी जन्माष्टमीच्या शुभप्रसंगी श्रीकृष्ण भक्तांना शुभेच्छा दिल्या.

PM speaks to CMs of Maharashtra & Gujarat regarding cyclone situation

June 02nd, 07:45 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi has spoken to Chief Minister of Maharashtra Shri Uddhav Thackeray, Chief Minister of Gujarat Shri Vijay Rupani and Administrator of Daman Diu, Dadra and Nagar Haveli Shri Praful K Patel regarding the cyclone situation. He assured all possible support and assistance from the Centre.

सोशल मीडिया कॉर्नर 24 फेब्रुवारी 2018

February 24th, 08:14 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

दमण आणि दीव येथे विविध प्रकल्पांच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

February 24th, 02:09 pm

बहुधा दमणच्या इतिहासात यापूर्वी ना कधी एवढा मोठा जनसमुदाय आला असेल आणि ना कधी दमण, दीवच्या विकासासाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या योजना लागू केल्या गेल्या असतील -यापूर्वी बहुधा कधीही असे झाले नसेल.

दमण अणि दिव मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास योजनांचा शुभारंभ

February 24th, 02:01 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दमण आणि दिवमध्ये 1 हजार कोटी रुपयांच्या विविध विकास योजनांचा शुभारंभ केला. पंतप्रधानांनी विविध कार्यक्रमांच्या लाभार्थींना प्रमाणपत्रांचे वाटप केले तसेच दमण महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभेला संबोधित केले.

पंतप्रधान येत्या दोन दिवसात दोन राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांना भेट देणार

February 23rd, 04:13 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या दोन दिवसात गुजरात आणि तामिळनाडू या दोन राज्यांना आणि दमण आणि दीव, पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशांना भेट देणार आहेत.