श्रीनगरमधील दल सरोवर येथे यंदाच्या योग दिनाच्या कार्यक्रमात मनोरम्य वातावरणाची अनुभूती : पंतप्रधान

June 21st, 02:22 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या योग दिनाच्या कार्यक्रमाची क्षणचित्रे शेअर केली आहेत.

जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर येथे योग साधकांना उद्देशून पंतप्रधानांनी केलेले भाषण

June 21st, 12:58 pm

आज हे जे दृश्य आहे, हे संपूर्ण जगाच्या मानस पटलावर कायम राहणारे दृश्‍य आहे. जर पाऊस पडला नसता तर कदाचित इतके लक्ष गेले नसते पाऊस असूनही आणि जेव्हा श्रीनगरमध्ये पाऊस पडतो तेव्हा थंडी देखील वाढते. मला देखील स्वेटर घालावे लागले. तुम्ही लोक तर इथलेच आहात, तुम्हाला सवय आहे, तुम्हाला याचा त्रास वाटत नाही. पण पावसामुळे थोडा उशीर झाला, आपल्याला याची दोन-तीन भागात विभागणी करावी लागली. तरीही जागतिक समुदायाला स्वतःसाठी आणि समाजासाठी योगाचे महात्म्य काय आहे, योग जीवनातील नित्यक्रम कसा बनेल. जसे दात घासणे आपला नित्यक्रम बनतो, केस विंचरणे आपला नित्यक्रम बनतो, तितक्याच सहजतेने योग जीवनाशी जेव्हा जोडला जातो, एक नेहमीची क्रिया बनतो, तेव्हा प्रत्येक क्षणाला त्याचे लाभ देत राहतो.

पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय योग दिन - 2024 निमित्त जम्मू आणि काश्मीरमधील दल सरोवर येथे योग अभ्यासकांना केले संबोधित

June 21st, 11:50 am

जम्मू आणि काश्मीरच्या लोकांनी योगाबद्दल आज दाखवलेला उत्साह आणि बांधिलकीचे प्रदर्शन लोकांच्या कायम स्मरणात राहील, असे पंतप्रधान उपस्थित नागरिकांना संबोधित करताना म्हणाले. पावसाळी हवामानामुळे तापमानात घसरण झाली, परिणामी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम उशिराने सुरू झाला आणि त्याचे दोन तीन भागात विभाजन करावे लागले, असे असले तरीही लोकांचा योग दिनाचा उत्साह अजिबात कमी झाला नाही, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. स्वत:साठी आणि समाजासाठी योगाभ्यासाला जीवनाची सहज प्रवृत्ती बनवण्याचे महत्त्व पंतप्रधानांनी विशद केले. योग दैनंदिन जीवनाशी जोडला गेला आणि सोप्या रूपात अभ्यासला गेला तर त्याचे फायदे नक्कीच मिळतात, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगर मधील दल लेक इथं उत्साही योगप्रेमींसोबत काढला सेल्फी

June 21st, 11:44 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथील दल सरोवर येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगप्रेमींसोबतचे सेल्फी शेअर केले आहेत.

श्रीनगर इथे 'युवा सशक्तिकरण, जम्मू काश्मीरचा कायापालट' या कार्यक्रमातले पंतप्रधानांचे संबोधन

June 20th, 07:00 pm

जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल श्री मनोज सिन्हा जी,केंद्रीय मंत्री मंडळातले माझे सहकारी श्री प्रतापराव जाधव जी, इतर सर्व मान्यवर आणि जम्मू काश्मिरच्या काना कोपऱ्यातून जोडले गेलेले माझे युवा मित्र आणि सर्व बंधू भगिनींनो !

पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर येथे ‘युवकांचे सक्षमीकरण, जम्मू-काश्मीरमध्ये परिवर्तन’ कार्यक्रमाला केले संबोधित

June 20th, 06:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्र येथे ‘‘युवकांचे सक्षमीकरण, जम्मू-काश्मीरमध्ये परिवर्तन’ कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीर मध्ये 1,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी केली , ज्यामध्ये रस्ते, पाणीपुरवठा आणि उच्च शिक्षणातील पायाभूत सुविधा आदी क्षेत्रांचा समावेश आहे. त्यांनी 1,800 कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि संलग्न क्षेत्रातील स्पर्धात्मकता सुधारणा प्रकल्पाचे उद्‌घाटन देखील केले. मोदी यांनी सरकारी सेवेत नियुक्त झालेल्या 200 हून अधिक उमेदवारांना नियुक्ती पत्रे वितरित करण्याचा देखील प्रारंभ केला.या प्रसंगी, पंतप्रधानांनी प्रदर्शनाला भेट दिली आणि केंद्रशासित प्रदेशातील यशस्वी युवकांशी संवाद साधला.

दल सरोवरात भारताचे पहिले तरंगते आर्थिक साक्षरता शिबिर आयोजित केल्याबद्दल पंतप्रधानांनी आयपीपीबीचे केले कौतुक

November 05th, 11:49 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेशक दीदींच्या नेतृत्वाखाली जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर येथील दल सरोवरात भारतातील पहिले तरंगते वित्तीय साक्षरता शिबिर आयोजित केल्याबद्दल आयपीपीबीचे कौतुक केले आहे.

जम्मू आणि काश्मीरच्या सौंदर्य आणि आदरातिथ्याबद्दल पंतप्रधानांनी नागरिकांचा प्रतिसाद सामायिक केला

October 08th, 10:06 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरच्या सौंदर्य आणि आदरातिथ्याबद्दल नागरिकांचा प्रतिसाद सामायिक केला आहे. ज्यात बैसरन, अरु, कोकरनाग, अछबल, गुलमर्ग, श्रीनगर आणि दल सरोवराच्या सौंदर्य याविषयी भाष्य केले आहे.