पंतप्रधानांनी पुण्याच्या दगडूशेठ मंदिरात श्रीगणेशाचे दर्शन घेतले आणि पूजा केली

August 01st, 03:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील पुणे येथील दगडूशेठ मंदिरातील श्रीगणेशाचे दर्शन घेतले आणि पूजा केली.

पंतप्रधान 1 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर

July 30th, 01:51 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान सकाळी 11 वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत. सकाळी 11.45 वाजता पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येईल. त्यानंतर, दुपारी 12:45 वाजता पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.