पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली प्रगती मंचाची 42वी बैठक

June 28th, 07:49 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी प्रगती मंचाच्या 42व्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. प्रगती हा माहिती दूरसंवाद तंत्रज्ञानावर आधारित बहुपद्धतीय मंच असून केंद्र आणि राज्य सरकारांच्या सहभागाने सक्रीय प्रशासन आणि तत्पर अंमलबजावणी यासाठी या मंचाची स्थापना करण्यात आली आहे.

PM dedicates Namo Path, Devka Seafront to the nation in Daman

April 25th, 11:23 pm

PM Modi dedicated to the nation, Namo Path, Devka Seafront in Daman today. Upon arriving at the venue, the PM interacted with construction workers and also posed for a photograph alongside them. He also visited the Naya Bharat Selfie Point.

पंतप्रधानांचे सिल्वासा येथे विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण कार्यक्रमातील भाषण

April 25th, 04:50 pm

व्यासपीठावर उपस्थित प्रफुल्ल पटेल, खासदार विनोद सोनकर, खासदार भगिनी कलाबेन, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा भवर जी , भाई राकेश सिंह चौहान जी , वैद्यकीय क्षेत्रातील मित्रगण , इतर मान्यवर आणि मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो! केम छो मजा, सुख मा, संतोष मा, आनंद मा, प्रगति मा, विकास मा...वाह. मी जेव्हा जेव्हा इथे येतो तेव्हा माझे मन आनंदाने भरून येते. दमण, दीव, दादरा आणि नगर हवेलीच्या विकासाचा प्रवास पाहणे हा माझ्यासाठीही सुखद अनुभव असतो. आणि आता जी चित्रफित पाहिली , कोणी कल्पना करू शकत नाही की, इतक्या छोट्या क्षेत्रात चहु दिशांना आधुनिक आणि वेगवान विकास कशाप्रकारे होतो आहे , ते आपण चित्रफितीमध्ये अत्यंत चांगल्या रीतीने पाहिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिल्वासा, दादरा आणि नगर हवेली येथे 4850 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण

April 25th, 04:49 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सिल्वासा, दादरा आणि नगर हवेली येथे 4850 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण झाले. या प्रकल्पांमध्ये सिल्वासा येथील नमो वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन या संस्थेचे लोकार्पण, सरकारी शाळा, दमण येथे सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय, विविध रस्त्यांचे सुशोभीकरण, बळकटीकरण आणि रुंदीकरण, फिश मार्केट आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स, पाणीपुरवठा योजनेचा विस्तार अशा 96 प्रकल्पांचा समावेश आहे. दीव आणि सिल्वासा येथील पंतप्रधान आवास योजना शहरी योजनेच्या लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते घरांच्या किल्ल्यांचे वितरण देखील करण्यात आले.

पंतप्रधान 24 आणि 25 एप्रिलला मध्य प्रदेश, केरळ, दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीवला देणार भेट

April 21st, 03:02 pm

पंतप्रधान 24 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 11:30 वाजता मध्‍य प्रदेशातील रीवा येथे राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. रिवा येथे त्यांच्या हस्ते सुमारे 17,000 कोटी रूपये खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण होईल.

रोजगार मेळाव्यात नोकरी मिळालेल्या जवळपास 71,000 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्याच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण

November 22nd, 10:31 am

तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. आज देशाच्या 45 शहरांत 71 हजारांपेक्षा जास्त तरुणांना नियुक्तीपत्रे दिली जात आहेत. म्हणजे, आज एकाच वेळी हजारो घरांत सुखाच्या नव्या पर्वाची सुरवात झाली आहे. गेल्या महिन्यात आजच्याच दिवशी धनत्रयोदशीला केंद्र सरकार तर्फे 75 हजार तरुणांना नियुक्तीपत्रे वितरीत करण्यात आली होती. आणि आजचा हा विशाल रोजगार मेळावा हेच दाखवतो आहे, की सरकार कशाप्रकारे सरकारी नोकऱ्या देण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे.

रोजगार मेळाव्या अंतर्गत नव्याने भर्ती झालेल्या सुमारे 71,000 जणांना पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण

November 22nd, 10:30 am

रोजगार मेळाव्या अंतर्गत नव्याने भर्ती झालेल्या सुमारे 71,000 जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचे वितरण केले. रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी, तरुणांच्या सक्षमीकरण तसेच राष्ट्रीय विकासात थेट सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करण्याकरता रोजगार मेळावा उत्प्रेरक म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे. याआधी ऑक्‍टोबरमध्ये रोजगार मेळाव्या अंतर्गत नव्याने भर्ती झालेल्या 75,000 जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती.

गोव्यात पणजी येथे हर घर जल उत्सवात पंतप्रधानांनी ध्वनीचित्रफीतीद्वारे दिलेला संदेश

August 19th, 04:51 pm

नमस्कार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत जी, गोवा सरकारमधील अन्य मंत्री, अन्य मान्यवर , महिला आणि पुरुषगण , आज एक अतिशय महत्वाचा आणि पवित्र दिवस आहे. देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह आहे. सर्व देशवासियांना, जगभरातील भगवान श्रीकृष्णाच्या भक्तांना खूप-खूप शुभेच्छा. जय श्री कृष्ण.

पंतप्रधानांनी, जल जीवन मिशन अंतर्गत हरघर जल उत्सवाला ध्वनीचित्रफीत संदेशाद्वारे केले संबोधित

August 19th, 12:12 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जल जीवन मिशन अंतर्गत हरघर जल उत्सवाला ध्वनीचित्रफीत संदेशाद्वारे संबोधित केले. हा कार्यक्रम गोव्यात पणजी येथे झाला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांनी जन्माष्टमीच्या शुभप्रसंगी श्रीकृष्ण भक्तांना शुभेच्छा दिल्या.

हिमाचल प्रदेशातील आरोग्यसेवा कर्मचारी आणि कोविड प्रतिबंधक लसीकरण लाभार्थींबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला संवाद

September 06th, 11:01 am

हिमाचल प्रदेशाने आज एका प्रधानसेवकाच्या नात्यानेच नाही तर, परिवारातल्या एका सदस्याच्या नात्यानेही, मला अभिमानाच्या क्षणाची संधी दिली आहे. छोट्या-छोट्या सुविधांसाठी संघर्ष करणारा हिमाचलही मी पाहिला आहे आणि आज विकासाची गाथा लिहीत असलेला हिमाचलही पाहत आहे. हे सगळं देवी देवतांच्या आशीर्वादाने, हिमाचल सरकारच्या कार्यकौशल्याने आणि हिमाचलच्या जनतेच्या जागरूकतेमुळे शक्य होऊ शकलं आहे. मी पुन्हा एकदा, ज्या प्रत्येकाशी संवाद साधण्याची संधी मिळाली आणि ज्या प्रकारे सगळ्यांनी आपलं म्हणणं सांगितलं त्यांचे आभार व्‍यक्‍त करतो. मी संपूर्ण संघाचे आभार व्‍यक्‍त करतो. हिमाचलने एका संघाच्या रूपात काम करण्याची अद्भुत सिद्धि प्राप्‍त केली आहे. माझ्याकडून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा !!

पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशमधील कोविड लसीकरण मोहिमेच्या आरोग्य कर्मचारी आणि लाभार्थ्यांशी साधला संवाद

September 06th, 11:00 am

पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशमधील कोविड लसीकरण मोहिमेत सहभागी आरोग्य कर्मचारी आणि लाभार्थ्यांशी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. राज्यपाल, मुख्यमंत्री, जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर, खासदार, आमदार, पंचायत नेते या समारंभास उपस्थित होते.

दादरा नगर हवेलीला पंतप्रधान उद्या भेट देणार

January 18th, 06:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दादरा नगर हवेलीची राजधानी सिल्व्हासाला भेट देणार आहेत.

पंतप्रधान उद्या व्हायब्रंट गुजरात शिखर परिषद 2019 साठी गुजरातला भेट देणा

January 16th, 08:03 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 17 जानेवारी 2019 रोजी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते गांधीनगर, अहमदाबाद आणि हजीराला भेट देणार आहेत.

सिल्वासा येथे विविध सरकारी प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे वक्तव्य. (दादरा आणि नगर हवेली)

April 17th, 02:37 pm

मंचावर विराजमान दमण, दिव आणि दादरा नगर हवेलीचे प्रशासक श्री. प्रफुल्ल भाई पटेल, येथील खासदार श्री नटू भाई, शेजारचे दमणचे खासदार श्री लालू भाई, दादरा-नगर हवेली आणि जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष श्री. रमण ककुवा जी, सिल्वासाचे नगराध्यक्ष भाई राकेश चौहानजी आणि विशाल संख्येने येथे उपस्थित दादरा, नगर हवेलीच्या माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो, मराठीमध्ये बोलू, हिंदीमध्ये बोलू की गुजरातीमध्ये बोलू, बोला... बरं, एक काम करा. आपला मोबाईल बाहेर काढा आणि त्याची लाईट सुरू करून आजच्या या भव्य कार्यक्रमाचे आपण स्वागत करा.

पंतप्रधानांनी दादरा-नगर हवेलीत केला सरकारी प्रकल्पांचा शुभारंभ

April 17th, 02:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिल्वासा तसेच दादरा-नगर हवेलीत अनेक सरकारी प्रकल्पांचे उद्‌घाटन केले. यामध्ये सौर प्रणाली, जन औषधी केंद्रे आणि पासपोर्ट सेवा केंद्राचा समोवश होता.