झेकोस्लोव्हाकिया चे पंतप्रधान पेट्र फियाला यांनी दहाव्या व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषद 2024 च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

January 10th, 07:09 pm

झेक प्रजासत्ताकचे (झेकोस्लोव्हाकिया) पंतप्रधान पेट्र फियाला, व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषद 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी 9-11 जानेवारी 2024 दरम्यान भारत भेटीसाठी आले असून, त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी विशेषतः माहिती (ज्ञान), तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक क्षेत्रांसह विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय संबंध पुढे नेण्याच्या मार्गांवर चर्चा केली. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत अनेक झेक कंपन्यांनी संरक्षण, रेल्वे आणि विमान वाहतूक क्षेत्रात भारतीय उत्पादकांशी भागीदारी केल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी असेही अधोरेखित केले की भारताची विकास गाथा आणि झेक प्रजासत्ताकचा मजबूत औद्योगिक पाया हे दोन जागतिक पुरवठा साखळीतील आदर्श भागीदार आहेत.

पेत्र फिएला यांचे चेक रिपब्लिकच्या पंतप्रधानपदी झालेल्या नेमणुकीबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन

November 28th, 09:11 pm

पेत्र फिएला यांची चेक रिपब्लिकच्या पंतप्रधानपदी नेमणूक झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

लखनौमधे उत्तर प्रदेश गुंतवणुकदार शिखर परिषदेचे 21 फेब्रुवारीला पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

February 20th, 07:34 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या लखनौ येथे दोन दिवसीय उत्तर प्रदेश गुंतवणुकदार शिखर परिषद 2018 चे उद्‌घाटन करणार आहेत. राजनाथ सिंह, अरुण जेटली, निर्मला सीतारमण, नितीन गडकरी, सुरेश प्रभू, स्मृती इराणी, रवी शंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन, व्ही.के.सिंग, धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री या परिषदेत सहभागी होऊन राज्यासाठी गुंतवणूक आणण्यासाठी वेगवेगळ्या सत्रांचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. पंतप्रधान 21 फेब्रुवारीला शिखर परिषदेचे उद्‌घाटन करतील तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद समारोपाच्या सत्राला उपस्थित राहतील.