आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये पंतप्रधानांनी व्हिडीओ संदेशा द्वारे केलेले संबोधन
April 04th, 09:46 am
आपणा सर्वांना माझ्या शुभेच्छा. भारतामध्ये आपलं स्वागत आहे! सर्वात प्रथम, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी एकत्र आल्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो. पाचवी आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आंतरराष्ट्रीय परिषद, आयसीडीआरआय-2023 नक्कीच विशेष आहे.पंतप्रधानांनी आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील 5व्या आंतरराष्ट्रीय परिषदेला केले संबोधित
April 04th, 09:45 am
सारे जग एकमेकांशी जोडलेले असताना आपत्तींचा प्रभाव फक्त स्थानिक राहत नाही त्यामुळे जागतिक दृष्टीकोनातून सीडीआरआयची निर्मिती झाली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. त्यामुळे, आपला प्रतिसाद एकाकी न ठेवता एकीकृत केला पाहिजे,असे ते म्हणाले. अवघ्या काही वर्षांत, प्रगत आणि विकसनशील देशांतील, लहान-मोठे, जगाच्या दक्षिण किंवा उत्तर भागातले 40 हून अधिक देश सीडीआरआयचा भाग बनले आहेत असे त्यांनी नमूद केले. सरकार व्यतिरिक्त, जागतिक संस्था, खाजगी क्षेत्रे आणि तज्ञ देखील यात सहभागी आहेत हे उत्साहवर्धक असल्याचे त्यांनी सांगितले.‘यास’ चक्रीवादळाचा सामना करण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि नियोजनासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक
May 23rd, 01:43 pm
‘यास’ चक्रीवादळामुळे निर्माण परिस्थितीचा सामना करण्यासाठी संबंधित राज्ये आणि केंद्रीय मंत्रालये / संस्थांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली.