गेल्या 7 वर्षात आपण सर्वांनी टीम इंडिया म्हणून काम केले: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

May 30th, 11:30 am

माझ्या प्रिय देशवासियांनो, आव्हान कितीही मोठं असो, भारतानं केलेला विजयाचा संकल्पही नेहमी तितकाच मोठा असतो. देशाची सामूहिक शक्ती आणि आपल्याकडे असलेली सेवा भावना, यांच्यामुळे देश प्रत्येक वादळातून बाहेर पडला आहे. अलिकडेच्या दिवसातूच आपण पाहिलं की, आमचे डॉक्टर्स, नर्स आणि आघाडीच्या फळीवर कार्यरत असलेले योद्धे, यांची स्वतःची चिंता न करता, रात्रंदिवस काम केलं आणि आजही ही मंडळी काम करीत आहेत. या सर्वांमध्ये कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये लढा देताना खूप मोठी भूमिका बजावणारेही काही लोक आहेत. या योद्ध्यांविषयी ‘मन की बात’ मध्ये चर्चा करावी, असा आग्रह मला ‘नमोअॅप’वर आणि पत्राच्या माध्यमातून केला गेलाय.

यास चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचा पंतप्रधानांकडून आढावा

May 28th, 03:56 pm

शुक्रवार, 28 मे 2019 रोजी म्हणजे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओदिशा आणि पश्चिम बंगालला भेट देऊन ‘यास’ चक्रीवादळामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. ओदिशाच्या भद्रक आणि बलेश्वर तसेच पश्‍चिम बंगालमधील पूर्बा मेदिनीपुर, या चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांची पंतप्रधानांनी हवाई पाहणी केली.

यास चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान उद्या ओदिशा आणि पश्चिम बंगालचा दौरा करणार

May 27th, 04:07 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 28 मे रोजी ओदिशा आणि पश्चिम बंगालचा दौरा करणार आहेत. यास चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली या दोन राज्यात आढावा बैठक होणार आहे. यास चक्रीवादळामुळे या दोन राज्यातील प्रभावित झालेल्या परिसराची पंतप्रधान हवाई पाहणी करणार आहेत.

यास चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचा पंतप्रधानांकडून आढावा

May 27th, 04:02 pm