मेसर्स चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून 540 मेगावॅट क्वार जलविद्युत प्रकल्प बांधण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

April 27th, 09:11 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित, मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत, चिनाब नदीवर 540 मेगावॅटचा क्वार जलविद्युत प्रकल्प बांधण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. जम्मू-कश्मीरच्या किश्तवाड़ जिल्हयात, हा जलविद्युत प्रकल्प उभारला जाणार असून, त्यासाठी 4526.12 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीलाही मंजूरी देण्यात आली आहे. मेसर्स चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड (M/s. CVPPL) ही कंपनी हा प्रकल्प उभारेल. ही कंपनी एनएचपीसी आणि जेकेएसपीडीसी यांच्या संयुक्त भागीदारीतली असून, त्यात त्यांची अनुक्रमे 51 आणि 49 टक्के भागीदारी आहे.