ओडिशा 25वर्षांनंतर एक नवा इतिहास रचणार असल्याचे तुमचा उत्साहच सांगत आहे: पंतप्रधान मोदी कटक येथे

May 20th, 10:56 am

कटक येथील आपल्या दुसऱ्या जाहीर सभेत पंतप्रधानांनी बीजेडीवर टीका केली आणि ते म्हणाले, ओडिशाची जनता त्यांच्या भ्रष्टाचाराला कंटाळली आहे. ते घोटाळे करून गरिबांची फसवणूक करत आहेत. बीजेडीने काय दिले? त्यांच्या आमदारांच्या आणि मंत्र्याच्या आश्रयाखाली जमीन, वाळू, कोळसा आणि खाण माफियांचा सुळसुळाट झाला. अशी परिस्थिती असतानाे पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि नोकऱ्यांमध्ये कशी काय वाढ होईल?

बीजेडीचे मामुली नेतेही आता करोडपती झाले आहेत: पंतप्रधान मोदी ढेंकनालमध्ये

May 20th, 10:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाच्या ढेंकनाल येथे एका मोठ्या जाहीर सभेला संबोधित केल्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीबरोबरच राज्य विधानसभा निवडणुकांच्याही प्रचाराला वेग आला. त्यानंतर पंतप्रधानांनी मोठ्या जनसमुदायाला संबोधित केले आणि म्हणाले, “बीजेडीने ओडिशाला काहीही दिलेले नाही. शेतकरी, तरुण आणि आदिवासी अजूनही जीवनमान अधिक चांगले व्हावे यासाठी झगडत आहेत. ज्या लोकांनी ओडिशाचा नाश केला त्यांना माफ करता कामा नये.

पंतप्रधान मोदींचे ओडिशामधील ढेंकनाल आणि कटक येथील भव्य प्रचार सभांमध्ये भाषण

May 20th, 09:58 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाच्या ढेंकनाल येथे एका मोठ्या जाहीर सभेला संबोधित केल्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीबरोबरच राज्य विधानसभा निवडणुकांच्याही प्रचाराला वेग आला. त्यानंतर पंतप्रधानांनी मोठ्या जनसमुदायाला संबोधित केले आणि म्हणाले, “बीजेडीने ओडिशाला काहीही दिलेले नाही. शेतकरी, तरुण आणि आदिवासी अजूनही जीवनमान अधिक चांगले व्हावे यासाठी झगडत आहेत. ज्या लोकांनी ओडिशाचा नाश केला त्यांना माफ करता कामा नये.

ओडिशातील काही रेल्वे प्रकल्पांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

May 18th, 01:00 pm

ओदिशाचे राज्यपाल श्री गणेशी लाल जी, मुख्यमंत्री श्री नवीन पटनायक जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव जी, धर्मेंद्र प्रधान जी, बिश्वेश्वर टुडू जी, इतर सर्व मान्यवर आणि पश्चिम बंगाल तसेच ओदिशामधील माझ्या सर्व बंधू-भगिनींनो!

पंतप्रधानांनी ओदिशा येथे 8,000 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या अनेक रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी केली तर काही प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले

May 18th, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ओदिशामधील 8,000 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या विविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी केली आणि काही प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. पुरी आणि हावडा दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखवून रवाना करणे , पुरी आणि कटक रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी पायाभरणी, ओदिशातील रेल्वेच्या जाळ्याचे 100% विद्युतीकरण, संबलपूर-तितलागड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, अंगुल - सुकिंदा दरम्यान नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग; मनोहरपूर - रुरकेला - झारसुगुडा - जामगा यांना जोडणारी तिसरी लाईन आणि बिच्छुपली - झरतरभा दरम्यान नवीन ब्रॉडगेज लाईन यांचा या प्रकल्पांमध्ये समावेश आहे.

कटक येथील प्राप्तिकर अपिलीय न्यायाधिकरणाच्या अत्याधुनिक कार्यालय आणि निवासी संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

November 11th, 05:01 pm

ओदिशाचे मुख्यमंत्री, आमचे ज्येष्ठ सहकरी, श्री नवीन पटनायक जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी रविशंकर प्रसाद जी, ओदिशाचे भूमिपुत्र आणि मंत्रिमंडळातले माझे सहकारी धर्मेंद्र प्रधान जी, अध्यक्ष माननीय न्यायमूर्ती पी पी भट्ट जी, ओदिशातले खासदार, आमदार, कार्यक्रमाला उपस्थित इतर मान्यवर आणि मित्रांनो,

India has Moved from Tax-Terrorism to Tax-Transparency: Prime Minister

November 11th, 05:00 pm

Prime Minister Shri Narendra Modi inaugurated Office-cum-Residential Complex of Cuttack Bench of Income Tax Appellate Tribunal through video conference today. Speaking on the occasion, the Prime Minister said this bench would now provide modern facilities not only to Odisha, but to millions of taxpayers of Eastern and North Eastern India and help in disposing off all the pending cases in this region.

पंतप्रधानांच्या हस्ते आयकर अपीलीय न्यायाधिकरणाच्या कटक खंडपीठाच्या कार्यालय-सह-निवासी संकुलाचे बुधवारी उद्घाटन होणार

November 09th, 08:02 pm

ओडिशतल्या कटक इथल्या प्राप्तीकर अपीलीय न्यायाधिकरणाच्या (आयटीएटी) अत्याधुनिक कार्यालय आणि निवासी संकुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी साडेचार वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे

पहिल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

February 22nd, 06:12 pm

व्यासपीठावर उपस्थित ओदिशाचे मुख्यमंत्री श्री. नवीन पटनायक महोदय, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री धर्मेंद्र प्रधान, श्री किरण रिजीजू, ओदिशा सरकारमधील मंत्री श्री. अरुण कुमार साहू, श्री तुषारकांती बेहेरा आणि देशभरातून आलेल्या माझ्या युवा मित्रांनो, मी तुमच्याशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संपर्क साधत आहे, पण तिथे जे वातावरण आहे, उत्साह आहे, खेळाविषयीची जी ओढ आहे, उर्जा आहे, त्याची मी कल्पना करू शकतो.

पहिल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

February 22nd, 06:09 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन ओडिशा येथे आज व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून करण्यात आले. पंतप्रधान म्हणाले की, हे केवळ क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन नाही, तर भारतातील आगामी क्रीडा चळवळीची सुरूवात आहे. इथे तुम्ही केवळ एकमेकांचे स्पर्धक नाही तर ही स्पर्धा तुमच्या स्वतःशी सुद्धा आहे.

आमच्यासाठी उत्तम राजकारण म्हणजे विकास आणि सुशासन : कटक येथे पंतप्रधान मोदी

May 26th, 06:16 pm

राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या चार वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशातील कटकमध्ये एका विशाल जनसभेला संबोधित केले. या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, गेल्या चार वर्षांत भाजप पंचायत स्तरापासून संसदेपर्यंत पोहोचला आहे. 'साफ नियत, सही विकास' च्या माध्यमातून देशाला विकासाच्या मार्गावर पुढे नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

PM Modi addresses public meeting at Cuttack Odisha

May 26th, 06:15 pm

Upon completion of four years of the NDA Government, PM Narendra Modi today addressed a huge public meeting in Cuttack, Odisha. Speaking at the event, he said that in last four years, the BJP had become a party which had presence from Panchayat to Parliament. With ‘Saaf Niyat, Sahi Vikas’, the PM remarked that the country would continue to march on the path of development.