महाराष्ट्रातील वर्धा येथे राष्ट्रीय ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 20th, 11:45 am
दोन दिवस आधीच आपण सगळ्यांनी विश्वकर्मा पुजेचा सण साजरा केला. आणि आज वर्ध्याच्या पावन भूमीवर आपण प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या यशाचा उत्सव साजरा करत आहोत. आजचा दिवस यासाठीही विशेष आहे कारण 1932 मध्ये याच दिवशी महात्मा गांधी यांनी अस्पृश्यतेविरोधात मोहीमेला सुरुवात केली होती. अशा परिस्थितीत विश्वकर्मा योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्याचा हा उत्सव, विनोबा भावे यांच्या साधनेचे ठिकाण, महात्मा गांधी यांची कर्मभूमी, वर्ध्याची ही भूमी, हे यश आणि प्रेरणेचा असा काही संगम आहे, जो विकसित भारताच्या आपल्या संकल्पाला नवी ऊर्जा देईल. विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून आपण कष्टातून समृद्धीचा, या कौशल्याने एक चांगल्या उद्याचा जो संकल्प केला आहे, वर्ध्यातील बापूंची प्रेरणा या संकल्पांना सिद्धीस नेण्याचे माध्यम ठरतील. मी या योजनेशी संबंधित सर्व लोकांचे, देशभरातील सर्व लाभार्थ्यांचे या निमित्ताने अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वर्धा येथे राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमाला केले संबोधित
September 20th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील वर्धा येथे राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास’ योजना आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’ सुरू केली. त्यांनी पीएम विश्वकर्मा लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि कर्जे जारी केली आणि पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत वर्षभरातील प्रगतीचे प्रतीक म्हणून समर्पित तिकिटाचे अनावरणदेखील केले. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील अमरावती येथे पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपरेल (पीएम मित्र) पार्कची पायाभरणी केली.यावेळी आयोजित प्रदर्शनालाही पंतप्रधानांनी भेट दिली.अरुणाचल प्रदेशामधील विकसित भारत - विकसित (नॉर्थ ईस्ट) ईशान्य प्रदेश कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 09th, 11:09 am
अरुणाचल प्रदेश, मणिपुर, मेघालय, नागालैंड, सिक्किम आणि त्रिपुराचे राज्यपाल महोदय आणि मुख्यमंत्री गण, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, राज्यांमधील मंत्रीगण, संसदेतील सहकारी, सर्व उपस्थित आमदार, इतर उपस्थित लोकप्रतिनिधी आणि या सर्व राज्यांमधील माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो!अरुणाचल प्रदेशमध्ये इटानगर येथे पंतप्रधानांनी केले विकसित भारत विकसित ईशान्य प्रदेश कार्यक्रमात मार्गदर्शन
March 09th, 10:46 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे विकसित भारत विकसित ईशान्य प्रदेश कार्यक्रमाला संबोधित केले. मोदी यांनी मणिपूर, मेघालय, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशात सुमारे 55,600 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी केली. त्यांनी सेला बोगद्याचे लोकार्पण केले आणि सुमारे 10,000 कोटी रुपयांच्या उन्नती योजनेचा शुभारंभ केला. आजच्या विकास प्रकल्पांमध्ये रेल्वे, रस्ते, आरोग्य, गृहनिर्माण, शिक्षण, सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, तेल आणि वायू यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे.बिहारमधील बेगुसराय येथे विविध प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
March 02nd, 08:06 pm
बिहारचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकरजी, मुख्यमंत्री नितीश कुमारजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी गिरीराज सिंहजी, हरदीप सिंह पुरीजी, उपमुख्यमंत्री विजय सिन्हाजी, सम्राट चौधरीजी, व्यासपीठावर उपस्थित इतर सर्व मान्यवर आणि बेगूसराय मधून आलेल्या उत्साही माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील बेगुसराय येथे अनेक विकास प्रकल्पांचे केले लोकार्पण आणि पायाभरणी
March 02nd, 04:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील बेगुसराय येथे आज देशभरातील सुमारे 1.48 लाख कोटी रुपयांच्या तेल आणि वायू क्षेत्रातील प्रकल्पांची तसेच बिहारमधील 13,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले.पश्चिम बंगाल मधल्या आरामबाग इथे विविध प्रकल्पांचा प्रारंभ करताना पंतप्रधानांचे संबोधन
March 01st, 03:15 pm
पश्चिम बंगालचे राज्यपाल सी व्ही आनंदबोस जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी शांतनु ठाकुर जी, पश्चिम बंगाल विधानसभेतले विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी जी, खासदार अपरूपा पोद्दार जी, सुकांता मजूमदार जी, सौमित्र खान जी, इतर मान्यवर आणि उपस्थित स्त्री - पुरुष हो,पंतप्रधानांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील आरामबाग, हुगळी येथे 7,200 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी
March 01st, 03:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील हुगळी स्थित आरामबाग येथे 7,200 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. आजचे विकासात्मक प्रकल्प रेल्वे, बंदरे, तेल पाईपलाईन, एलपीजी पुरवठा आणि सांडपाणी प्रक्रिया यासारख्या क्षेत्रांशी संबंधित आहेत.पंतप्रधान 2 आणि 3 जानेवारी 2024 रोजी तामिळनाडू, लक्षद्वीप आणि केरळला भेट देणार
December 31st, 12:56 pm
2 जानेवारी 2024 रोजी, सकाळी 10:30 वाजता, पंतप्रधान तिरुचिरापल्ली, तामिळनाडू येथे पोहोचतील. तिरुचिरापल्ली येथील भारतीदासन विद्यापीठाच्या 38 व्या दीक्षांत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. पंतप्रधान दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तिरुचिरापल्ली येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात विमान वाहतूक, रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू, नौवहन तसेच उच्च शिक्षण क्षेत्राशी संबंधित 19,850 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन तसेच लोकार्पण करतील. दुपारी 3.15 च्या सुमारास पंतप्रधान लक्षद्वीप मधील अगत्ती येथे पोहोचतील. तिथे ते एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करतील. 3 जानेवारी, 2024 रोजी, दुपारी 12 वाजता, पंतप्रधान लक्षद्वीपमधील कवरत्ती येथे पोहोचतील. लक्षद्वीपशी येथील कार्यक्रमात ते दूरसंचार, पेयजल, सौर ऊर्जा आणि आरोग्य यासारख्या इतर क्षेत्रांशी संबंधित अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील.केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘राष्ट्रीय खाद्यतेल अभियान- पाम तेल’ च्या अंमलबजावणीला मान्यता दिली
August 18th, 11:54 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय खाद्य तेल अभियान – पाम तेल (NMEO-OP) या नावाच्या पाम तेलविषयक अभियानाची सुरुवात करण्यास मंजुरी दिली. ही केंद्र पुरस्कृत योजना असून ईशान्येकडील राज्ये आणि अंदमान निकोबार बेटांवर या योजनेची अंमलबजावणी करण्याकडे विशेष लक्ष पुरविण्यात येणार आहे. आयात केलेल्या खाद्यतेलावरील देशाचे मोठ्या प्रमाणात अवलंबित्व असल्यामुळे, खाद्यतेलांचे देशांतर्गत उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि यात पामच्या लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादकता यांच्यात वाढ करण्याची महत्त्वाची भूमिका आहे.