पश्चिम बंगाल, कोलकाता येथे G20 भ्रष्टाचार विरोधी मंत्री स्तरीय बैठकीसाठी पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश

August 12th, 10:21 am

पहिल्यावहिल्या G20 भ्रष्टाचार विरोधी मंत्रीस्तरीय बैठकीत आपणा सर्वांचे मी स्वागत करतो. तुम्ही जमला आहात ते कोलकाता येथे , नोबेल पारितोषिक प्राप्त गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या शहरात. त्यांच्या लेखनात त्यांनी आपल्याला सत्य आकलन न होऊ देणाऱ्या लोभ या स्वभावविशेषाच्या बाबतीत सावध केले होते. पुरातन भारतीय उपनिषदांमध्ये ‘मा ग्रिध’ म्हणजे लोभाचे नामोनिशाण उरू नये अशी प्रार्थना केली आहे.

जी20 भ्रष्टाचार विरोधी मंत्रीस्तरीय बैठकीला पंतप्रधानांनी केले संबोधित

August 12th, 09:00 am

भ्रष्टाचाराचा सर्वाधिक फटका गरीब आणि उपेक्षितांना बसत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. याचा संसाधनांच्या वापरावर परिणाम होतो, बाजार मनमानी होतो, सेवा वितरणावर परिणाम होतो आणि शेवटी लोकांच्या जीवनाची गुणवत्ता कमी होते असे ते म्हणाले. अर्थशास्त्रातील कौटिल्याचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की, राज्यातील लोकांचे कल्याण करण्यासाठी राज्याच्या संसाधनांमध्ये वाढ करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भ्रष्टाचाराचा सामना करण्याची गरज व्यक्त करत, हे सरकारचे लोकांप्रतीचे पवित्र कर्तव्य आहे असे त्यांनी सांगितले.

सीबीआयच्या हीरक महोत्सवी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

April 03rd, 03:50 pm

काही शहरांमधली सीबीआयची नवीन कार्यालये असोत, ट्विटर हँडल्स असोत, आज सुरू करण्यात आलेल्या इतर प्रणाली असो, सीबीआयला अधिक बळकट करण्यात या बाबी नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावतील. सीबीआयने आपल्या कामातून, कौशल्याने सर्वसामान्यांना विश्वास दिला आहे. आजही जेव्हा एखाद्याला एखादी केस असाध्य आहे असे वाटत असेल तेव्हा ते प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी मागणी हिरिरीने केली जाते. लोक आंदोलन करतात की त्यांच्याकडून प्रकरण काढून ते सीबीआयकडे सोपवा. पंचायत स्तरावरही एखादे प्रकरण समोर आले की, ‘अरे, हे तर सीबीआयकडे सोपवावे’ असे लोक म्हणतात. सीबीआय न्यायाचा ब्रँड म्हणून प्रत्येकाच्या ओठावर आहे.

केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या हीरक महोत्सवी समारंभाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत उद्घाटन

April 03rd, 12:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत विज्ञान भवन इथे सीबीआय म्हणजेच केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या ठरावानुसार, एक एप्रिल 1963 रोजी सीबीआयची स्थापना करण्यात आली होती.

नवी दिल्ली मधील विज्ञान भवनात दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले संबोधन

November 03rd, 01:29 pm

हा दक्षता सप्ताह सरदार साहेबांच्या जयंती दिनी सुरु झाला आहे. सरदार साहेबांचं संपूर्ण जीवन प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि त्याने प्रेरित सार्वजनिक सेवांच्या निर्मितीसाठी समर्पित राहिलं आहे. आणि याच आश्वासनासह आपण दक्षतेबाबत जनजागृतीसाठी हे अभियान आयोजित केलं आहे. या वेळी आपण सर्वजण ‘विकसित भारतासाठी भ्रष्टाचार मुक्त भारत’ या संकल्पनेवर दक्षता सप्ताह साजरा करत आहोत. हा संकल्प आजच्या दिवसाची गरज आहे, समयोचित आहे आणि देशवासीयांसाठीही तेवढाच महत्वाचा आहे.

PM addresses programme marking Vigilance Awareness Week in New Delhi

November 03rd, 01:18 pm

PM Modi addressed the programme marking Vigilance Awareness Week of Central Vigilance Commission. The Prime Minister stressed the need to bring in common citizens in the work of keeping a vigil over corruption. No matter how powerful the corrupt may be, they should not be saved under any circumstances, he said.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रगती’ ही 32 वी पायाभूत सुविधाविषयक बैठक संपन्न

January 22nd, 05:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्ष 2020 मधील पहिली प्रगती बैठक झाली. प्रगती म्हणजेच कार्यक्षम प्रशासन आणि कालबद्ध अंमलबजावणीसाठी आयसीटी आधारित बहुस्तरीय व्यासपीठ या बैठकीचे हे 32 वे सत्र होते. यात केंद्र आणि राज्य सरकार यांचा समावेश असतो.

प्रगती द्वारे पंतप्रधानांचा संवाद

May 24th, 05:28 pm

प्रगती बैठकीत पंतप्रधान मोदींनी टपालसेवा आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. विविध राज्यातल्या रेल्वे, रस्ते, आणि उर्जा क्षेत्रातल्या महत्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा पंतप्रधानांनी आढावा घेतला. पंतप्रधानांनी गुन्हा आणि गुन्हेगार शोध नेटवर्क आणि प्रणालीचा आढावा घेतला.