India is not a follower but a first mover: PM Modi in Bengaluru

April 20th, 04:00 pm

Prime Minister Narendra Modi addressed public meetings in Bengaluru, Karnataka. Speaking to a vibrant crowd, he highlighted the achievements of the NDA government and outlined plans for the future.

PM Modi addresses public meetings in Chikkaballapur & Bengaluru, Karnataka

April 20th, 03:45 pm

Prime Minister Narendra Modi addressed public meetings in Chikkaballapur and Bengaluru, Karnataka. Speaking to a vibrant crowd, he highlighted the achievements of the NDA government and outlined plans for the future.

श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये यु पी आय सेवांची सुरूवात करताना पंतप्रधानांच्या संबोधनाचा मजकूर

February 12th, 01:30 pm

सन्माननीय राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे जी, सन्माननीय पंतप्रधान प्रविंद जुगनौथ जी, भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर जयशंकर जी, श्रीलंका, मॉरीशस आणि भारत यांच्या मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर आणि आज या महत्वपूर्ण कार्यक्रमाशी संबंधित सर्व सहकारी

पंतप्रधानांनी मॉरिशसचे पंतप्रधान आणि श्रीलंकेच्या अध्यक्षांसोबत संयुक्तपणे केले युपीआय सेवांचे उद्‌घाटन

February 12th, 01:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांच्यासोबत संयुक्तपणे श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये यूनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) सेवांचे आणि मॉरिशसमधील रुपे कार्ड सेवांचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्‌घाटन केले.

G20 डिजिटल अर्थव्यवस्था मंत्रीस्तरीय बैठकीमध्ये पंतप्रधानांनी दिलेला व्हिडिओ संदेश

August 19th, 11:05 am

गेल्या नऊ वर्षांमध्ये भारतात घडून आलेले डिजिटल परिवर्तन अभूतपूर्व आहे. 2015 साली आम्ही सुरु केलेल्या डिजिटल इंडिया उपक्रमापासून हा प्रवास सुरु झाला. या प्रवासाला आमच्या नवोन्मेषावरील अढळ विश्वासाचे बळ लाभले आहे. आमच्या जलद अंमलबजावणीच्या वचनबद्धतेने आणि, आमच्या सर्वसमावेशकता, कोणालाही मागे न सोडण्याच्या भावनेने ते प्रेरित आहे. या परिवर्तनाचे प्रमाण, वेग आणि व्याप्ती कल्पनेपलीकडची आहे. आज, भारतात 850 दशलक्ष इंटरनेट वापरकर्ते आहेत, जे जगातील सर्वात स्वस्त डेटाचा उपभोग घेत आहेत. प्रशासनामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी, ते अधिक कार्यक्षम, सर्वसमावेशक, जलद आणि पारदर्शक बनवण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. डिजिटल ओळख असलेले आधार, हे अनोखे व्यासपीठ, आमच्या एक अब्ज तीस कोटी पेक्षा जास्त जनतेला सामावून घेत आहे. भारतात आर्थिक समावेशकतेची क्रांती घडवून आणण्यासाठी आम्ही आमच्या JAM, अर्थात जनधन बँक खाती, आधार आणि मोबाईल या त्रिसूत्रीच्या सामर्थ्याचा वापर केला आहे. युपीआय (UPI), या आमच्या तत्काळ पेमेंट प्रणाली द्वारे महिन्याला, जवळजवळ 10 अब्ज व्यवहार होतात. जगातील थेट पेमेंटपैकी 45% पेक्षा जास्त व्यवहार भारतात होतात. सरकारच्या थेट लाभ हस्तांतरण योजनेने सरकारी निधीची गळती थांबवली असून, जवळजवळ 33 अब्ज डॉलर्सची बचत केली आहे. कोविन (CoWIN) पोर्टलने भारताच्या कोविड लसीकरण मोहिमेला बळ दिले. यामुळे डिजिटल पडताळणीयोग्य प्रमाणपत्रांसह 2 अब्ज पेक्षा जास्त लस मात्रा वितरित करता आल्या. गती-शक्ती व्यासपीठ, पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिकचा अंदाज घेण्यासाठी तंत्रज्ञान आणि विशेष नियोजनाचा वापर करते. नियोजन, खर्च कमी करणे आणि वितरणाचा वेग वाढवणे, यामध्ये ते उपयोगी ठरत आहे. आमचे ऑनलाइन सार्वजनिक खरेदी व्यासपीठ, गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस’ ने खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता आणली आहे. डिजिटल वाणिज्य व्यवहारांसाठीचे खुले नेटवर्क, ई-कॉमर्सचे लोकशाहीकरण करत आहे. पूर्णत: डिजीटल करप्रणाली पारदर्शकतेला आणि ई-प्रशासनाला चालना देत आहे. भाषिणी, हे कृत्रिम बुद्धीमत्तेची जोड असलेले एक भाषांतर व्यासपीठ आम्ही निर्माण करत आहोत. हे व्यासपीठ भारतातील सर्व वैविध्यपूर्ण भाषांचे डिजिटल समावेशन सुलभ करेल.

G20 डिजिटल अर्थव्यवस्था मंत्र्यांच्या बैठकीला पंतप्रधानांनी केले संबोधित

August 19th, 09:00 am

केले. देशातील अतुल्य विविधतेचा उल्लेख करत पंतप्रधानांनी भारतामध्ये डझनभर भाषा आणि शेकडो बोली आहेत यावर भर दिला. ते पुढे म्हणाले की जगभरातील प्रत्येक धर्म आणि असंख्य सांस्कृतिक प्रथा भारतात आहेत. प्राचीन परंपरांपासून ते अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत, भारतामध्ये प्रत्येकासाठी काहीतरी आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. अशा विविधतेमुळे भारत ही संशोधनासाठी एक आदर्श चाचणी प्रयोगशाळा आहे, असे ते म्हणाले. भारतात यशस्वी होणारे संशोधन जगात कुठेही सहज वापरता येऊ शकते असे त्यांनी अधोरेखित केले. भारत आपले अनुभव जगासोबत सामायिक करण्यास तयार असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले आणि कोविड महामारीच्या काळात जागतिक कल्याणासाठी कोविन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याचे उदाहरण दिले. भारताने इंडिया स्टॅक हे ऑनलाइन ग्लोबल डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर रिपॉझिटरी तयार केले आहे जेणेकरून कोणीही विशेषतः ग्लोबल साउथमधील देश मागे राहणार नाहीत.

जी20 आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधानांनी दिलेला व्हिडिओ संदेश

August 18th, 02:15 pm

गांधीजींनी आरोग्य हा इतका महत्त्वाचा मुद्दा मानला की त्यांनी या विषयावर 'की टू हेल्थ' (आरोग्याची गुरुकिल्ली) या नावाचे पुस्तक लिहिले. निरोगी असणे म्हणजे मन आणि शरीर सुसूत्र आणि समतोल स्थितीत असणे म्हणजेच आरोग्य हा जीवनाचा मोठा पाया आहे, असे त्यांनी सांगितले होते. आपल्याकडे संस्कृतमध्ये एक श्लोक आहे:

जी 20 आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीला पंतप्रधानांनी केले संबोधित

August 18th, 01:52 pm

या बैठकीला संबोधित करताना पंतप्रधानांनी, भारतातील आरोग्य सेवा क्षेत्रातील 2.1 दशलक्ष डॉक्टर, 3.5 दशलक्ष परिचारिका, 1.3 दशलक्ष निमवैद्यकीय कर्मचारी, 1.6 दशलक्ष औषध उत्पादक आणि विक्रेते तसेच इतर लाखो लोकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

पंतप्रधानांनी घेतली बिल गेट्स यांची भेट

March 04th, 12:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथे बिल गेट्स यांची भेट घेतली.

'तंत्रज्ञानाचा उपयोग करुन लोकांचे जीवनमान सुखकर करणे' या विषयावर आयोजित अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

February 28th, 10:05 am

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिवशी आजच्या अर्थसंकल्पीय वेबिनारचा विषय अतिशय महत्वपूर्ण आहे. 21व्या शतकातील बदलता भारत, आपल्या नागरिकांचे तंत्रज्ञानाच्या शक्तीने सातत्याने सक्षमीकरण करत आहे. गेल्या काही वर्षांत आमच्या सरकारने प्रत्येक अर्थसंकल्पात तंत्रज्ञानाच्या मदतीने देशवासियांची जगण्यातील सुलभता वाढविण्यावर भर दिला आहे. या अर्थसंकल्पात देखील तंत्रज्ञान तर आहेच, मात्र त्या सोबतच मानवी भावनांना प्राथमिकता देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

‘तंत्रज्ञानाचा उपयोग करुन राहणीमान सुलभता’ या विषयावर अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला पंतप्रधानांनी केले संबोधित

February 28th, 10:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘तंत्रज्ञानाचा उपयोग करून राहणीमान सुलभता’ या विषयावर अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित केले. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये घोषित केलेल्या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कल्पना आणि सूचना प्राप्त करण्यासाठी सरकारने आयोजित केलेल्या 12 अर्थसंकल्पोत्तर वेबिनारच्या मालिकेतील हा पाचवा भाग आहे. 21व्या शतकातील भारत सातत्याने तंत्रज्ञानाचा उपयोग करुन आपल्या नागरिकांना सक्षम बनवत आहे असे पंतप्रधानांनी वेबिनारला संबोधित करताना सांगितले. गेल्या काही वर्षांतील प्रत्येक अर्थसंकल्पात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लोकांचे जीवन सुलभ करण्यावर भर देण्यात आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात तंत्रज्ञान आणि मानवी स्पर्शाला प्राधान्य देण्यात आले आहे यावर त्यांनी भर दिला. मागील सरकारांच्या प्राधान्यक्रमातील विरोधाभास पंतप्रधानांनी अधोरेखित केला. त्यांनी आठवण करून दिली की लोकांचा एक विशिष्ट वर्ग नेहमीच लोकांचे भले व्हावे यासाठी सरकारी हस्तक्षेपाची अपेक्षा करत राहिला. मात्र, या सुविधांअभावी त्यांचे संपूर्ण आयुष्य व्यतीत झाल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी लोकांचा आणखी एक भाग अधोरेखित केला ज्यांना पुढे जायचे होते परंतु दबाव आणि सरकारी हस्तक्षेपामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे ते खालीच ओढले गेले. पंतप्रधानांनी घडलेल्या बदलांची नोंद घेत सांगितले की जीवन सोपे बनवताना आणि राहणीमान सुलभता वाढवताना अत्यंत आवश्यक असलेल्या परिस्थितीत धोरणे आणि त्यांचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. सरकारी हस्तक्षेप कमी झाला असून नागरिक सरकारला अडथळा मानत नाहीत, असेही त्यांनी नमूद केले. त्याऐवजी, पंतप्रधान म्हणाले की नागरिक सरकारकडे एक उत्प्रेरक म्हणून पाहत आहेत. इथे तंत्रज्ञानाने खूप मोठी भूमिका बजावली आहे. एक राष्ट्र एक शिधापत्रिका

लोकसभेत राष्ट्रपतींनी केलेल्या अभिभाषणावरील आभार दर्शक प्रस्तावावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

February 08th, 04:00 pm

सर्वप्रथम, मी राष्ट्रपतींचे त्यांच्या अभिभाषणासाठी आभार मानू इच्छितो आणि हे माझं सद्भाग्य आहे की मला यापूर्वीही अनेकदा राष्ट्रपतींचे त्यांच्या अभिभाषणासाठी आभार मानण्याची संधी मिळाली आहे. मात्र यावेळी आभाराबरोबरच राष्ट्पती महोदयांचं मला अभिनंदन देखील करायचं आहे. आपल्या दूरदर्शी भाषणात राष्ट्रपतींनी आपल्या सर्वांना आणि कोट्यवधी देशवासियांना मार्गदर्शन केलं आहे. प्रजासत्ताकाच्या प्रमुख म्हणून त्यांची उपस्थिती ऐतिहासिक आहे आणि देशातील कोट्यवधी भगिनी आणि मुलींना प्रेरणा देणारा खूप मोठा सुयोग आहे.

लोकसभेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर पंतप्रधानांनी केलेले निवेदन

February 08th, 03:50 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर दिले.

केरळची जनता आता भाजपकडे नवीन आशा म्हणून पाहत आहे: पंतप्रधान मोदी

September 01st, 04:31 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमध्ये कोची येथे जाहीर सभेला संबोधित केले. ओणम निमित्त केरळच्या जनतेला शुभेच्छा देत पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. “ओणमच्या खास मुहूर्तावर मी केरळमध्ये आलो ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. तुम्हा सर्वांना ओणमच्या खूप खूप शुभेच्छा,” , पंतप्रधान मोदी म्हणाले.

केरळमधील कोची येथे पंतप्रधान मोदींचे जाहीर सभेत भाषण

September 01st, 04:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमध्ये कोची येथे जाहीर सभेला संबोधित केले. ओणम निमित्त केरळच्या जनतेला शुभेच्छा देत पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. “ओणमच्या खास मुहूर्तावर मी केरळमध्ये आलो ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. तुम्हा सर्वांना ओणमच्या खूप खूप शुभेच्छा,” , पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी गांधीनगर, गुजरात येथे डिजिटल इंडिया सप्ताह 2022 च्या उद्घाटनाप्रसंगी केलेले भाषण

July 04th, 10:57 pm

आजचा हा कार्यक्रम 21 व्या शतकात अधिकाधिक आधुनिक होत असलेल्या भारताची झलक घेऊन आला आहे.संपूर्ण मानवतेसाठी तंत्रज्ञानाचा वापर किती क्रांतिकारी आहे याचे उदाहरण भारताने डिजिटल इंडिया मोहिमेच्या रूपात संपूर्ण जगासमोर ठेवले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल इंडिया सप्ताह 2022 चे गांधीनगर इथे उद्‌घाटन

July 04th, 04:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गांधीनगर इथे डिजिटल इंडिया सप्ताह 2022 चे उद्घाटन केले. नव भारताची तंत्रज्ञान प्रेरणा ही याची संकल्पना आहे. जीवन सुखकर करण्यासाठी आणि स्टार्ट अप्सना चालना देण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर आणि सेवा प्रदान करणे अधिक सुव्यवस्थित करण्यासाठी विविध डिजिटल उपक्रमांचा प्रारंभ पंतप्रधानांनी यावेळी केला. चिप्स टू स्टार्ट अप्स (C2S) कार्यक्रमाअंतर्गत पहिल्या 30 संस्थांच्या समूहाची पंतप्रधानांनी घोषणा केली. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल,केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर, लोकप्रतिनिधी, स्टार्ट अप्सचे प्रतिनिधी आणि या क्षेत्रातले संबंधित यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधान 4 जुलैला भीमावरम आणि गांधीनगरला भेट देणार

July 01st, 12:16 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 जुलै 2022 रोजी आंध्रप्रदेशातील भीमावरम आणि गुजरातेतील गांधीनगर येथे भेट देणार आहेत. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास, पंतप्रधान भीमावरम येथे प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक आलुरी सीताराम राजू यांच्या वर्षभर चालणाऱ्या 125 व्या जन्मशताब्दी सोहळ्याचे उद्घाटन करतील. त्यानंतर दुपारी 4-30 वाजता पंतप्रधान गांधीनगर येथे डिजिटल इंडिया सप्ताहाचे उद्घाटन करतील.

दावोस येथील जागतिक आर्थिक मंचाच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘जागतिक परिस्थिती’ या विषयावरील भाषण

January 17th, 08:31 pm

जागतिक आर्थिक मंचाच्या शिखर परिषदेनिमित्त एकत्र आलेल्या जगभरातील मान्यवरांचे 130 कोटी भारतीयांच्या वतीनं मी स्वागत करतो. आज मी आपल्याशी बोलत आहे, तेव्हा भारत कोरोनाच्या आणखी एका लाटेचा जागरूकतेने आणि सावधपणे सामना करत आहे. त्यासोबतच आर्थिक क्षेत्रातील अनेक आशादायी परिणाम मिळवत पुढे वाटचाल करत आहे. भारतात स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण होत असल्याचा उत्साह देखील आहे आणि भारताला आज केवळ एका वर्षात 160 कोटी कोरोना लसी देण्याचा आत्मविश्वास देखील मिळाला आहे.

PM Modi's remarks at World Economic Forum, Davos 2022

January 17th, 08:30 pm

PM Modi addressed the World Economic Forum's Davos Agenda via video conferencing. PM Modi said, The entrepreneurship spirit that Indians have, the ability to adopt new technology, can give new energy to each of our global partners. That's why this is the best time to invest in India.