कोविड परिस्थितीसंबंधी पूर्वोत्तर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांनी साधलेला संवाद
July 13th, 03:53 pm
श्री मनसुखभाई मांडवीय हे आता आपले नवीन आरोग्य मंत्री आहेत. त्यांच्याबरोबर राज्यमंत्री म्हणून जबाबदारी असलेल्या डॉक्टर भारती पवार या बसलेल्या आहेत. त्या आपल्या आरोग्य मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून काम करत आहेत. आणखी दोन व्यक्तींबरोबर तुमचा सतत संबंध येणार आहे. ते आहेत DONER मंत्रालयाचे नवीन मंत्री किशन रेड्डी जी, आणि त्यांच्याबरोबर बसले आहेत ते राज्यमंत्री बी. एल. वर्मा जी. यांचा परिचय करून घेणेसुद्धा आपल्याला आवश्यक आहे.कोविड -19 परिस्थितीबाबत ईशान्येकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद
July 13th, 01:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविड -19 परिस्थितीबाबत ईशान्येकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या संभाषणामध्ये नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम, मेघालय, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला. कोविड महामारीची परिस्थिती हाताळताना वेळेवर केलेल्या कार्यवाहीबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांनी ईशान्येकडील राज्यांबद्दलच्या पंतप्रधानांच्या विशेष आस्थेबद्दल आणि काळजीबद्दल त्यांचे कौतुक केले. या संभाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त केंद्रीय गृह, संरक्षण, आरोग्य, ईशान्य प्रांत विकास व अन्य मंत्री उपस्थित होते.देशभरात ऑक्सिजन पुरवठा वाढवण्याच्या बाबत आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन
July 09th, 01:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑक्सिजन वाढीच्या प्रगतीचा आणि देशभरातील उपलब्धतेचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना देशभरात पीएसए ऑक्सिजन संयंत्र बसविण्याच्या प्रगतीबद्दल माहिती दिली. देशभरात 1,500 हून अधिक पीएसए ऑक्सिजन सयंत्र बसवण्यात येणार असून त्यात पीएम केअर्स तसेच विविध मंत्रालये व सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांचे योगदान आहे.महान योद्धे आणि नेत्यांना योग्य तो सन्मान आणि आदर न देणाऱ्या इतिहासातल्या चुकांची दुरुस्ती करण्यात येत असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
February 16th, 02:45 pm
स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रवेश करताना, देशासाठी बहुमोल योगदान दिलेल्या थोर नेत्यांचे स्मरण अतिशय महत्वाचे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. भारत आणि भारतीयत्व यासाठी सर्वस्वाचे बलिदान देणाऱ्यांना, इतिहासाच्या पुस्तकात योग्य ते महत्व दिले गेले नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. भारताचा इतिहास घडवणाऱ्याप्रती, इतिहास लेखकांची ही अनियमितता आणि अन्याय आता दूर करण्यात येत आहे. आपल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात आपण प्रवेश करत असून या टप्यावर या महान व्यक्तीत्वांच्या योगदानाचे स्मरण अधिकच महत्वाचे ठरत असल्याचे ते म्हणाले. उत्तर प्रदेशातल्या बहराइच इथे महाराजा सुहेलदेव स्मारक आणि चित्तौरा तलावाच्या विकास कामाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे पायाभरणी केल्यानंतर ते आज बोलत होते.उत्तर प्रदेशातील बहराईच येथे महाराजा सुहेलदेव स्मारक आणि चित्तौरा तलावाच्या विकासकामांच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 16th, 11:24 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या बहराइच इथे महाराजा सुहेलदेव स्मारक आणि चित्तौरा तलावाच्या विकास कामाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे पायाभरणी केली. महाराजा सुहेलदेव यांच्या नावाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचेही पंतप्रधानांनी उद्घाटन केले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.महाराजा सुहेलदेव स्मारक आणि चित्तौरा तलावाच्या विकास कामाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी
February 16th, 11:23 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या बहराइच इथे महाराजा सुहेलदेव स्मारक आणि चित्तौरा तलावाच्या विकास कामाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे पायाभरणी केली. महाराजा सुहेलदेव यांच्या नावाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचेही पंतप्रधानांनी उद्घाटन केले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.2% Interest Subvention approved on prompt repayment of Shishu Loans under Pradhan Mantri MUDRA Yojana for a period of 12 months
June 24th, 04:02 pm
Union Cabinet chaired by PM Narendra Modi approved a scheme for interest subvention of 2% for a period of 12 months, to all Shishu loan accounts under Pradhan Mantri Mudra Yojana (PMMY) to eligible borrowers. The scheme will help small businesses brace the disruption caused due to COVID-19.