ऑस्ट्रेलियात भारताच्या कोव्हॅक्सिन लसीला मान्यता दिल्याबद्दल पंतप्रधानांनी स्काॅट माॅरीसन यांचे मानले आभार
November 01st, 10:40 pm
भारताच्या कोव्हॅक्सिन या लसीच्या प्रकाराला ऑस्ट्रेलियात मान्यता दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एच.ई.स्कॉट मॉरिसन यांचे आभार मानले आहेत.प्रत्येकाने लस घेणे आणि सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यकः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
April 25th, 11:30 am
मित्रांनो गेल्या काही दिवसात, या संकटाचा मुकाबला करण्यासंदर्भात माझी, वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या तज्ज्ञांबरोबर दीर्घ चर्चा झाली आहे. आमच्या औषध निर्माण उद्योगांच्या क्षेत्रातले लोक असोत की लस उत्पादनाशी संबंधित लोक असोत, ऑक्सिजनच्या निर्मितीशी संबंधित लोक असोत किंवा मग वैद्यकीय क्षेत्रातले जाणकार असोत, त्यांनी अत्यंत महत्वपूर्ण सूचना सरकारला केल्या आहेत. यावेळी, आम्हाला हे युद्ध जिंकण्यासाठी, तज्ज्ञ आणि वैज्ञानिक सल्ल्याला प्राधान्य द्यायचं आहे. राज्यसरकारांच्या प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी, भारत सरकार पूर्ण शक्तिनं त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं आहे. राज्य सरकारंही आपापली जबाबदारी निभावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत.कोविड – 19 ची सद्यस्थिती आणि कोविड 19 च्या लसीकरणाचा पंतप्रधानांनी घेतला आढावा
January 09th, 05:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशभरातील कोविड – 19 ची सद्यस्थितीबरोबरच कोविड लसीकरणाबाबत राज्य/केंद्रशासित प्रदेशातील तयारीचा आढावा घेण्यासाठी आज एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, आरोग्य सचिव आणि अन्य संबंधित वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.