मैसुरू इथल्या ‘प्रोजेक्ट टायगर’ ला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात पंतप्रधानांचे संबोधन

April 09th, 01:00 pm

केंद्रीय मंत्रीमंडळातील माझे सहकारी श्री भूपेंद्र यादव जी, श्री अश्विनी कुमार चौबे जी, इतर देशांमधून आलेले मंत्रीगण, राज्यांचे मंत्री, इतर प्रतिनिधी, बंधू आणि भगिनींनो.

पंतप्रधानांनी कर्नाटकातील म्हैसूर येथे ‘प्रोजेक्ट टायगरच्या 50 व्या वर्षपूर्ती’निमित्त आयोजित कार्यक्रमाचे केले उद्घाटन

April 09th, 12:37 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातील म्हैसूर येथील म्हैसूर विद्यापीठात ‘प्रोजेक्ट टायगर’च्या 50 व्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्स (IBCA) म्हणजेच, मार्जार कुळातील मोठ्या वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठीचे आंतरराष्ट्रीय सहकार्य या मोहिमेचा देखील प्रारंभ केला. यावेळी त्यांनी विविध साहित्य प्रकाशित केले. ‘अमृत काल का व्हिजन फॉर टायगर कॉन्झर्वेशन’ हे पुस्तक तसेच व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यमापनाच्या पाचव्या फेरीचा सारांश अहवाल आणि अखिल भारतीय व्याघ्र अंदाज (पाचवी फेरी)चा सारांश अहवाल प्रसिद्ध केला. यासोबतच त्यांनी भारतातील वाघांची संख्या घोषित केली. व्याघ्र प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी एक विशेष नाणेही जारी केले.

सुझुकी कंपनीला भारतामध्ये 40 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल गुजरातमधल्या गांधीनगर येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

August 28th, 08:06 pm

गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल, उपमुख्यमंत्री भाई श्रीकृष्ण चौटाला, संसदेतले माझे सहकारी सी.आर पाटील, सुझुकी मोटार कॉर्पोरेशनचे वरिष्ठ अधिकारी मंडळी, भारतातील जपानचे राजदूत, मारूती-सुझुकीचे वरिष्ठ अधिकारी, आणि इतर मान्यवर तसेच बंधू आणि भगिनींनो,

भारतात सुझुकीला 40 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गांधीनगर मधील महात्मा मंदिर येथे आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधानांनी केले संबोधित

August 28th, 05:08 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गांधीनगर मधील महात्मा मंदिर येथे भारतात सुझुकीला 40 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. जपानचे भारतातील राजदूत सातोशी सुझुकी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, खासदार सी आर पाटील, राज्याचे मंत्री जगदीश पांचाळ, सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष ओ सुझुकी, सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष टी सुझुकी आणि मारुती-सुझुकीचे अध्यक्ष आर सी भार्गव यावेळी उपस्थित होते. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले तर जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांचा व्हिडिओ संदेश देखील यावेळी दाखवण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रोटरी इंटरनॅशनल जागतिक परिषदेत भाषण

June 05th, 09:46 pm

जगभरातील रोटरीयन्सचा विशाल परिवार, प्रिय मित्रांनो, नमस्ते! मला रोटरी इंटरनॅशनल परिषदेला संबोधित करताना अतिशय आनंद होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर रोटरीशी संबंधित लोकांचा हा मेळावा एका अर्ध-जागतिक सभेसारखाच आहे. यामध्ये विविधता आणि चेतना आहे. रोटरीशी संबंधित तुम्ही सर्व लोक आपापल्या क्षेत्रात यशस्वी झाला आहात तरी देखील तुम्ही लोकांनी स्वतःला केवळ कामापुरते मर्यादित ठेवलेले नाही. आपल्या पृथ्वीला अधिक चांगले बनवण्याच्या तुमच्या इच्छेने तुम्हा सर्वांना या मंचावर एकत्र आणले आहे. यश आणि सेवेचे हे खऱ्या अर्थाने योग्य मिश्रण आहे.

रोटरी इंटरनॅशनलच्या जागतिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन

June 05th, 09:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका चित्रफितीच्या माध्यमातून दिलेल्या संदेशाद्वारे रोटरी इंटरनॅशनलच्या जागतिक परिषदेला संबोधित केले. इतक्या मोठ्या प्रमाणातील प्रत्येक रोटरी मेळावा हा एखाद्या छोट्या -जागतिक परिषदेसारखा आहे, तिथे विविधता आणि चैतन्य आहे असे सांगत रोटेरियन्स म्हणजे रोटरीचे सदस्य हे 'खऱ्या अर्थाने यश आणि सेवेचे मिश्रण' आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

लाइफ मूव्हमेंट उपक्रमाची सुरुवात करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

June 05th, 07:42 pm

आजचा प्रसंग आणि आजची तारीख, दोन्ही खूप समर्पक आहेत. आपण लाईफ म्हणजे लाइफस्टाइल फॉर द एनवायरन्मेन्ट या पर्यावरण संरक्षण चळवळीचा प्रारंभ करत आहोत. यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या मोहिमेचे घोषवाक्य आहे- ''केवळ एक पृथ्वी''. आणि लक्षित क्षेत्र आहे - ''निसर्गाशी सुसंवाद राखत एकरूप होत जगणे''. या वाक्यामध्ये महत्व आणि उपाय सुंदरपणे मांडले आहेत.

PM launches global initiative ‘Lifestyle for the Environment- LiFE Movement’

June 05th, 07:41 pm

Prime Minister Narendra Modi launched a global initiative ‘Lifestyle for the Environment - LiFE Movement’. He said that the vision of LiFE was to live a lifestyle in tune with our planet and which does not harm it.

पंतप्रधान 5 जून रोजी लाईफ चळवळ हा जागतिक पुढाकार सुरू करणार

June 04th, 02:08 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 जून रोजी सायंकाळी 6 वाजता पर्यावरणासाठी जीवनशैली (लाईफ) या जागतिक पुढाकाराची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरूवात करणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरणविषयक जीवनशैली जगभरातील व्यक्ती, समुदाय आणि संघटना यांनी स्वीकारावे, यासाठी प्रभावी आणि पाठपुरावा कसा करायचा, यासंदर्भात शिक्षणतज्ञ, विद्यापीठे आणि संशोधन संस्था आदींकडून नवनवीन कल्पना आणि सूचना मागवण्यासाठी लाईफ ग्लोबल कॉल फॉर पेपर्स या उपक्रमाने सुरूवात होणार आहे. याच कार्यक्रमात पंतप्रधानांचे मुख्य भाषणही होणार आहे.

आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्रात पंतप्रधानांनी केलेले भाषण

May 04th, 12:15 pm

आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या चौथ्या पर्वात सहभागी होताना मला आनंद होत आहे. सुरुवातीला, आपण स्वतःला हे स्मरण करून द्यायला हवे की, शाश्वत विकास उद्दिष्टांचे वचन कोणालाही मागे न ठेवण्याचे आहे. म्हणूनच आपण अत्यंत गरीब आणि सर्वात असुरक्षित लोकांच्या आकांक्षा पूर्ततेसाठी, अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करून त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहोत. आणि, पायाभूत सुविधा म्हणजे केवळ भांडवली संपत्ती निर्माण करणे आणि गुंतवणुकीवर दीर्घकालीन परतावा निर्माण करणे असे नाही. ही आकडेवारी नाही.

पंतप्रधानांनी आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसंदर्भातील चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्राला केले संबोधित

May 04th, 10:29 am

आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या चौथ्या पर्वाच्या उद्घाटन सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित केले. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट महामहिम मॉरिसन एमपी, घानाचे राष्ट्राध्यक्ष महामहिम नाना अड्डो डंकवा अकुफो-अड्डो, जपानचे पंतप्रधान महामहिम फ्युमियो किशिदा, आणि मादागास्करचे राष्ट्राध्यक्ष महामहिम एंड्री निरिना राजोएलिना यांनीही या सत्राला संबोधित केले.

डेन्मार्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माध्यमांना दिलेले निवेदन

May 03rd, 07:11 pm

आपले आणि आपल्या चमूला हार्दिक धन्यवाद! आपल्या या सुंदर देशाला मी पहिल्यांदाच भेट देत आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये भारतामध्ये आपले स्वागत करण्याची संधी मला प्राप्त झाली होती. या दोन्ही दौर्‍यांमुळे आपण आपले संबंध अधिक घनिष्ठ बनवून त्यांना गती देऊ शकलो. आपल्या दोन्ही देशात लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आणि कायद्याचे राज्य यासारखी सामायिक मुल्ये आहेत. त्याचबरोबर आपल्या दोन्ही देशांमध्ये अनेक पूरक बलस्थानेही आहेत.

भारत- जर्मनी 6 व्या सरकारी चर्चेसंबंधी संयुक्त निवेदन

May 02nd, 08:28 pm

आज जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्ड्ज आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली आंतर-सरकारी चर्चेची सहावी फेरी पार पडली. या दोन नेत्यांव्यतिरिक्त, दोन्ही शिष्टमंडळात मंत्री आणि इतर संबंधित मंत्रालयांच्या उच्चपदस्थ प्रतिनिधींचा समावेश होता, ज्यांचा उल्लेख परिशिष्टात करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांसमवेत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केलेले निवेदन

April 22nd, 12:22 pm

पंतप्रधान म्हणून त्यांचा हा पहिला भारत दौरा असला तरी भारताचा जुना मित्र म्हणून ते भारताला अतिशय उत्तम जाणतात.गेली अनेक वर्षे भारत आणि ब्रिटन यांच्यातले संबंध दृढ करण्यात पंतप्रधान जॉन्सन यांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावली आहे.

India-Australia Virtual Summit

March 17th, 08:30 pm

Prime Minister Shri Narendra Modi and Prime Minister of Australia H.E. Mr. Scott Morrison will hold the second India-Australia Virtual Summit on 21 March 2022. The Summit follows the historic first Virtual Summit of 4 June 2020 when the relationship was elevated to a Comprehensive Strategic Partnership.

‘शाश्वत विकासासाठी ऊर्जेची गरज’ या विषयावरील अर्थसंकल्प पश्चात वेबिनार मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

March 04th, 11:05 am

‘शाश्वत विकासासाठी ऊर्जा’ याची प्रेरणा आपण आपल्या पुरातन परंपरांमधून तर आपल्या मिळतेच, शिवाय आपल्या भविष्यातील आशा-आकांक्षांच्या पूर्ततेचाही तो मार्ग आहे. शाश्वत विकास केवळ शाश्वत ऊर्जा स्त्रोतांमुळेच शक्य होऊ शकतो, असा भारताचा स्वच्छ आणि स्पष्ट विचार आहे. ग्लासगो परिषदेत आम्ही भारताला 2070 पर्यंत ‘शून्य कार्बन उत्सर्जनापर्यन्त’ पोहोचवण्याचे वचन दिले आहे.

पंतप्रधानांनी 'शाश्वत विकासासाठी ऊर्जा' वेबिनारला केले संबोधित

March 04th, 11:03 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'शाश्वत विकासासाठी ऊर्जा' या वेबिनारला संबोधित केले. पंतप्रधानांनी संबोधित केलेला अर्थसंकल्पानंतरच्या वेबिनार मालिकेतील हा नववा वेबिनार आहे.

उद्योगजगताच्या विविध क्षेत्रांतील कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद

December 20th, 09:07 pm

उद्योगजगताच्या विविध क्षेत्रांतील कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोक कल्याण मार्ग येथे संवाद साधला. आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी उद्योग प्रतिनिधींशी साधलेला अशाप्रकारचा हा दुसरा संवाद होता.

ग्लासगो येथे कॉप-26 शिखर परिषदेमध्ये ‘स्वच्छ तंत्रज्ञान नवोन्मेष आणि वापराला गती’ या विषयावर आयोजित सत्रात पंतप्रधानांचे भाषण

November 02nd, 07:45 pm

आज ‘वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीड’ चा प्रारंभ करताना तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. ‘ वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीड’ या माझ्या मनात अनेक वर्षांपासून असलेल्या संकल्पनेला आज आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि यूकेच्या ग्रीन ग्रीड उपक्रमामुळे एक ठोस रुप मिळाले आहे. महामहिम, औद्योगिक क्रांतीला जीवाश्म इंधनांमुळे उर्जा मिळाली होती. जीवाश्म इंधनांच्या वापरामुळे एकीकडे अनेक देश समृद्ध झाले खरे पण आपली पृथ्वी, आपल्या पर्यावरणाने समृद्धी गमावली आहे. जीवाश्म इंधनाच्या चढाओढीमुळे भौगोलिक- राजकीय तणाव देखील निर्माण झाले. आज तंत्रज्ञानाने आपल्याला एक चांगला पर्याय दिला आहे.

युकेमधील ग्लासगो येथे काॅप-26 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांची इस्रायलच्या पंतप्रधानांसोबत भेट

November 02nd, 07:16 pm

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 2 नोव्हेंबर 2021 रोजी ग्लासगो, युनायटेड किंगडम येथे काॅप-26 शिखर परिषदेच्या निमित्ताने इस्रायलचे पंतप्रधान श्री. नफ्ताली बेनेट यांची भेट घेतली. दोन्ही पंतप्रधानांची ही पहिलीच भेट होती.