
Prime Minister speaks with Prime Minister of Mauritius.
June 24th, 09:54 pm
PM Modi had a telephone conversation with Mauritius PM Dr. Ramgoolam. They discussed the ongoing cooperation across a broad range of areas, including development partnership, capacity building, defence, maritime security, digital infrastructure, and people-to-people ties between the two countries. PM Modi appreciated PM Ramgoolam for his participation in the 11th International Day of Yoga.
The ideals of Sree Narayana Guru are a great treasure for all of humanity: PM Modi
June 24th, 11:30 am
PM Modi addressed the centenary celebration of the historic conversation between Sree Narayana Guru and Mahatma Gandhi in New Delhi. The PM stated that the meeting which took place 100 years ago, remains inspirational and relevant even today for collective goals of a developed India. He emphasised that the government is working in this Amrit Kaal to take the teachings of Sree Narayana Guru to every citizen.
PM Modi addresses the centenary celebration of conversation between Sree Narayana Guru & Gandhi Ji
June 24th, 11:00 am
PM Modi addressed the centenary celebration of the historic conversation between Sree Narayana Guru and Mahatma Gandhi in New Delhi. The PM stated that the meeting which took place 100 years ago, remains inspirational and relevant even today for collective goals of a developed India. He emphasised that the government is working in this Amrit Kaal to take the teachings of Sree Narayana Guru to every citizen.पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 जून, 2025 रोजी श्री नारायण गुरु आणि महात्मा गांधी यांच्यातील संभाषणाच्या शताब्दी सोहळ्याचे उद्घाटन करणार
June 23rd, 05:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 जून 2025 रोजी सकाळी सुमारे 11 वाजता विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे भारताचे दोन महान आध्यात्मिक आणि नैतिक नेते श्री नारायण गुरु आणि महात्मा गांधी यांच्यातील ऐतिहासिक संभाषणाच्या शतकमहोत्सवी समारंभाचे उद्घाटन करतील. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करतील.ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे केले अभिनंदन
May 06th, 02:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अँथनी अल्बानीज यांना दूरध्वनी करून त्यांच्याशी संवाद साधला आणि ऑस्ट्रेलियाचे 32 वे पंतप्रधान म्हणून अल्बानीज यांची पुन्हा निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.For me, the nation itself is divine and mankind is a reflection of the divine: PM Modi in Lex Fridman Podcast
March 16th, 11:47 pm
PM Modi interacted with Lex Fridman in a podcast about various topics ranging from fasting to his humble beginnings to AI and more. He stressed on the unifying power of sports and said that they connect people on a deeper level and energize the world. He remarked that the management of Indian elections should be studied worldwide.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टमध्ये लेक्स फ्रिडमन यांच्याशी साधला संवाद
March 16th, 05:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टच्या माध्यमातून आज अमेरिकी संगणक शास्त्रज्ञ लेक्स फ्रिडमन यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. या मनमोकळ्या संभाषणादरम्यान जेव्हा पंतप्रधानांना विचारण्यात आले की ते उपवास का करतात आणि कशा पद्धतीने करतात तेव्हा मोदी यांनी पंतप्रधानांप्रती आदराचे प्रतीक म्हणून स्वतः उपवास धरण्याच्या लेक्स फ्रिडमन यांच्या कृतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “भारतात धार्मिक परंपरा दैनंदिन जीवनासोबत खोलवर रुजलेल्या आहेत ,” असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या अर्थानुसार, हिंदुत्व हे केवळ धार्मिक रीतीभातीविषयीचे तत्व नसून जीवनाला मार्गदर्शन करणारे तत्वज्ञान आहे असे त्यांनी सांगितले. उपवास हे शिस्त अंगी बाणवण्यासाठीचे तसेच आंतरिक आणि बाह्य आत्म्याचा समतोल साधण्यासाठीचे साधन आहे यावर मोदी यांनी अधिक भर दिला. उपवास केल्यामुळे आपल्या जाणीवा अधिक संवेदनशील तसेच जागरूक होऊन अधिक प्रखर बनतात असे त्यांनी नमूद केले. उपवासाच्या काळात कोणाकोणाला सूक्ष्म सुगंध आणि तपशील अधिक स्पष्टपणे जाणवतात असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. उपवासामुळे विचार प्रक्रियेला वेग येऊन नवीन दृष्टीकोन सापडत जातात आणि चौकटीबाहेरच्या विचारांना प्रोत्साहन मिळते असे देखील पंतप्रधानांनी अधोरेखित केले. उपवास म्हणजे केवळ अन्न वर्ज्य करणे नव्हे तर त्यामध्ये मनाची तसेच शरीराची तयारी आणि विषारी तत्वांचे निःसारण करण्याची शास्त्रीय प्रक्रिया समाविष्ट आहे असे त्यांनी स्पष्ट केले. कितीतरी दिवस आधीच ते आयुर्वेदिक आणि योग प्रक्रियांचे अनुसरण करून ते उपवासासाठी त्यांच्या शरीराला सज्ज करतात यावर अधिक भर देऊन पंतप्रधान मोदी यांनी या काळात पाणी पीत राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की एकदा उपवास सुरु झाला की त्यानंतर ते त्याला भक्ती आणि स्वयंशिस्तीची कृती मानतात आणि त्या काळात सखोल आत्मचिंतन आणि लक्ष एकाग्र करण्यावर भर देतात. पंतप्रधान म्हणाले की त्यांच्या उपवासाचे मूळ वैयक्तिक अनुभवामध्ये असून त्यांच्या शालेय जीवनादरम्यान महात्मा गांधी यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या चळवळीदरम्यान उपवास धरण्याची सुरुवात त्यांनी केली. त्यांच्या पहिल्याच उपवासादरम्यान त्यांना उर्जा आणि जागरुकता यामध्ये मोठी वाढ होत असल्याची अनुभूती आली आणि त्यातून उपवासाच्या परिवर्तनशील सामर्थ्याबद्दल त्यांची खात्री झाली असा अनुभव पंतप्रधानांनी सर्वांना सांगितला. उपवासामुळे त्यांच्या क्रिया मंद होत नाहीत तर उलट बहुतेकदा त्यांची उत्पादकता वाढते असे त्यांनी आवर्जून नमूद केले. ते म्हणाले की उपवासादरम्यान त्यांच्या विचारांचा ओघ अधिक मुक्तपणे आणि सर्जकतेसह वाहतो आणि त्यांच्यासाठी तो स्वतःला व्यक्त करण्याचा एक अतुलनीय अनुभव होऊन जातो.पंतप्रधानांनी लेक्स फ्रिडमन यांच्याशी साधला ज्ञानवर्धक संवाद
March 15th, 07:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच प्रसिद्ध पॉडकास्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधक लेक्स फ्रिडमन यांच्याशी एक आकर्षक आणि विचारप्रवर्तक संवाद साधला. तीन तास चाललेल्या या चर्चेत पंतप्रधान मोदी यांचे बालपण, त्यांनी हिमालयात घालवलेले सुरुवातीची वर्षे आणि सार्वजनिक जीवनातील त्यांचा प्रवास यासह विविध विषयांवर चर्चा झाली. प्रसिद्ध कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधक आणि पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांच्यासोबतचा हा बहुप्रतिक्षित तीन तासांचा पॉडकास्ट उद्या 16 मार्च 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. लेक्स फ्रिडमन यांनी या संभाषणाचे वर्णन त्यांच्या आयुष्यातील सर्वात शक्तिशाली संभाषणांपैकी एक असे केले आहे.उद्योजक निखील यांच्यासमवेत पंतप्रधानांनी साधलेल्या संवादाचा मराठीतील अनुवाद
January 10th, 02:15 pm
निखिल कामत – दर महिन्याला मी एक दिवस एक पॉडकास्ट करतो आणि उरलेला महिना काहीच करत नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या पॉडकास्टमध्ये उद्योजक निखिल कामत यांच्यासोबत साधला संवाद
January 10th, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये उद्योजक आणि गुंतवणूकदार निखिल कामत यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. अतिशय मोकळेपणाने झालेल्या या संवादात त्यांना त्यांच्या बालपणाबद्दल विचारले असता, पंतप्रधानांनी त्यांच्या जीवनातील सुरुवातीच्या काळातील अनुभव आणि उत्तर गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर या छोट्याशा शहराशी त्यांचे फार पूर्वीपासून असलेले संबंध अधोरेखित केले.. त्यांनी नमूद केले की, गायकवाड राज्यातील वडनगर हे गाव तलाव, पोस्ट ऑफिस आणि लायब्ररी यांसारख्या अत्यावश्यक सुविधांसह शिक्षणाच्या बांधिलकीसाठी ओळखले जात होते. गायकवाड राज्य प्राथमिक शाळा आणि भागवताचार्य नारायणाचार्य हायस्कूलमधील शालेय दिवसांच्या आठवणींना पंतप्रधानांनी उजाळा दिला. वडनगरमध्ये बराच काळ व्यतीत करणारा चिनी तत्ववेत्ता झुआंगझांग यांच्यावरील चित्रपटाबद्दल त्यांनी एकदा चिनी दूतावासाला कसे लिहिले याची एक मनोरंजक कथा त्यांनी सामाईक केली. त्यांनी 2014 मध्ये आलेल्या एका अनुभवाचाही उल्लेख केला, ज्यावेळी ते भारताचे पंतप्रधान झाले आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी झु आंग झांग आणि त्यांच्या दोन मूळ शहरांमधील ऐतिहासिक संबंधाचा हवाला देत गुजरात आणि वडनगरला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की हे बंध दोन्ही देशांमधील सामायिक वारसा आणि मजबूत संबंधांना अधोरेखित करत आहेत.