इटलीच्या पंतप्रधानांसोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन
March 02nd, 01:01 pm
पंतप्रधान मेलोनी यांच्या या पहिल्याच भारत दौऱ्यात मी त्यांचे आणि त्यांच्यासोबत आलेल्या प्रतिनिधीमंडळाचे हार्दिक स्वागत करतो. गेल्या वर्षीच्या निवडणुकांमध्ये, इटलीच्या नागरिकांनी त्यांना पहिल्या महिला आणि सर्वात युवा पंतप्रधान म्हणून निवडून दिले. या ऐतिहासिक यशाबद्दल मी सर्व भारतीयांच्या वतीने त्यांचे खूप खूप अभिनंदन करत, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. त्यांनी आपला कार्यभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांतच बाली इथल्या जी-20 शिखर परिषदेत आमची पहिली बैठक झाली होती.गुजरात मधील गुंतवणूकदारांच्या शिखर परिषदेत पंतप्रधानांचे भाषण
August 13th, 11:01 am
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री नितीन गडकरी जी, गुजरातचे मुख्यमंत्री श्री विजय रुपाणी जी, वाहन उद्योगाशी निगडित सर्व हितसंबंधधारक, वाहनांचे मूळ (अस्सल) सुटे भाग उत्पादकांच्या संघटनाचे प्रतिनिधी, धातू आणि भंगार उद्योगाशी निगडीत सर्व सदस्य, बंधू भगिनींनो!गुजरातमधील गुंतवणूकदारांच्या शिखर परिषदेत पंतप्रधानांचे भाषण
August 13th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये गुंतवणूकदार शिखर परिषदेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. स्वैच्छिक वाहन-गतिमान आधुनिकीकरण कार्यक्रम किंवा वाहन भंगारात काढण्याविषयीच्या धोरणाअंतर्गत वाहन भंगारात काढण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने, गुंतवणुकीला आमंत्रित करण्यासाठी ही शिखर परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत एकात्मिक स्क्रॅपिंग केंद्राच्या विकासासाठी अलंग येथील जहाज तोडण्याच्या उद्योगाने सादर केलेल्या प्रस्तावावर आणि समन्वयावर देखील विचारविनिमय केला जाईल. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि गुजरातचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते.जुनी वाहने भंगारात काढण्यासाठी आज सुरु करण्यात आलेले धोरण हा भारताच्या विकासाच्या वाटचालीतला महत्वाचा टप्पा – पंतप्रधान
August 13th, 10:22 am
वाहने भंगारात काढण्यासाठी आज सुरु करण्यात आलेले धोरण म्हणजे भारताच्या विकासाच्या वाटचालीतला महत्वाचा टप्पा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.गुजरात मध्ये 13 ऑगस्ट रोजी असलेल्या गुंतवणूकदार परिषदेला पंतप्रधान करणार संबोधित
August 11th, 09:35 pm
गुजरात मध्ये 13 ऑगस्ट 2021 रोजी गुंतवणूकदार परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता दूरदृष्टीच्या प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.