ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केलेले संयुक्त निवेदन

April 10th, 02:15 pm

आपल्या पहिल्या वाहिल्या भारतभेटीत आपले स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. गेल्याच महिन्यात आपण दोन्ही देशांच्या बॉर्डर-गावस्कर क्रिकेट चषक स्पर्धेचा चित्तवेधक अनुभव घेतला.ऑस्ट्रेलियाच्या संसदेत २०१४ साली मी केलेल्या भाषणात मी सर ब्रडमन आणि तेंडुलकर या दोघांचा उल्लेख केला होता. आज भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीवन स्मिथ हे क्रिकेटमधल्या युवा खेळाडूना आकार देत आहेत. मला आशा आहे, की तुमचा भारतातील दौरा हा स्मिथच्या फलंदाजीसारखाच फलदायी ठरेल.