तीन परम महासंगणक आणि उच्च-कार्यक्षमता युक्त संगणकीय प्रणाली यांचे लोकार्पण करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 26th, 05:15 pm
आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगात भारतासाठी एका फार मोठ्या कामगिरीचा दिवस आहे. एकविसाव्या शतकातील भारत कशा पद्धतीने विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच संशोधनाला प्राधान्य देत आगेकूच करत आहे याचे प्रतिबिंब आजच्या दिवसात दिसते आहे. आजचा भारत, संभाव्यतेच्या अमर्याद आकाशात नवनव्या संधी घडवतो आहे. आपल्या वैज्ञानिकांनी आणि अभियंत्यांनी तीन ‘परम रुद्र महासंगणक’ तयार केले आहेत. हे तीन महासंगणक देशात दिल्ली, पुणे आणि कोलकाता या शहरांमध्ये बसवण्यात आले आहेत. आजच्या दिवशीच देशासाठी अर्का आणि अरुणिक या दोन उच्च-कार्यक्षमतायुक्त संगणकीय प्रणालींचे देखील उद्घाटन करण्यात आले आहे. या प्रसंगी मी देशातील वैज्ञानिक समुदाय, अभियंते आणि सर्व देशवासियांचे खूप खूप अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे तीन परम रुद्र महासंगणकांचे केले लोकार्पण
September 26th, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे सुमारे 130 कोटी रुपयांच्या तीन परम रुद्र महासंगणकांचे लोकार्पण केले. राष्ट्रीय महासंगणक अभियान अंतर्गत स्वदेशी पद्धतीने विकसित केलेले हे महासंगणक पुणे, दिल्ली आणि कोलकाता येथे वैज्ञानिक संशोधनासाठी तैनात करण्यात आले आहेत. हवामान आणि हवामान संशोधनासाठी तयार केलेल्या उच्च कार्यक्षमतेच्या कॉम्प्यूटिंग प्रणालीचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले.