महालेखाकार आणि उप महालेखाकारांच्या परिसंवादात पंतप्रधानांचे भाषण

November 21st, 04:31 pm

मला पुन्हा एकदा महालेखापाल येथे येण्याची संधी मिळाली आहे. येथे चर्चा करायला फार संधी मिळत नाही परंतु कमी वेळात देखील थोडाफार अनुभव मिळतो. गांधीजींच्या 150 व्या जयंती वर्षात या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे, ही देखील एक सुखद घटना आहे. आणि गांधीजी नेहमी सांगायचे, जसे मनुष्य आपली पाठ पाहू शकत नाही त्याचप्रकारे स्वतःच्या कमतरता बघणे देखील खूप कठीण असते.

देशात कालबद्ध आणि फलश्रुती आधारीत कार्यव्यवस्था विकसित करण्यात महालेखापालांची भूमिका महत्वाची : पंतप्रधान

November 21st, 04:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत झालेल्या महालेखापाल आणि उपमहालेखापाल यांच्या परिषदेत भाषण केले. यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, देशात कालबद्ध आणि फलश्रुती आधारीत कार्यव्यवस्था विकसित करण्यात कॅग म्हणजेच महालेखापालांची भूमिका अतिशय महत्वाची आहे.

महालेखाकारांच्या परिषदेला पंतप्रधान करणार संबोधित

November 20th, 05:09 pm

नवी दिल्ली येथे उद्या होणाऱ्या महालेखाकार आणि उपमहालेखाकारांच्या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. भाषणापूर्वी पंतप्रधान नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या कार्यालयात महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करतील.