ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसमवेत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन
March 10th, 12:50 pm
सर्वप्रथम,पंतप्रधान अल्बानीस यांच्या पहिल्या भारत भेटीबद्दल मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो. पंतप्रधान स्तरावर वार्षिक शिखर परिषद घेण्याचा निर्णय गेल्या वर्षी दोन्ही देशांनी घेतला आणि पंतप्रधान अल्बानीस यांच्या या भेटीने या मालिकेचा प्रारंभ झाला आहे. होळीच्या दिवशी त्यांचे भारतात आगमन झाले आणि त्यानंतर आम्ही क्रिकेटच्या मैदानावर काही वेळ एकत्र आलो. रंग, संस्कृती आणि क्रिकेट यांचा हा उत्सव म्हणजे उत्साह आणि भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या मित्रत्वाच्या भावनेचेच प्रतिक आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचे भारतासाठी विशेष व्यापार दूत टोनी ॲबॉट यांच्यात बैठक
August 05th, 06:19 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट यांची भेट घेतली. ते 2-6 ऑगस्ट 2021 दरम्यान भारताच्या दौऱ्यावर असून ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचे विशेष व्यापार दूत म्हणून आले आहेत.