पंतप्रधानांना डॉमिनिकाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान प्रदान
November 21st, 05:39 am
कॉमनवेल्थ ऑफ डॉमिनिकाच्या राष्ट्रपती सिल्व्हानी बर्टन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉमिनिकाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर प्रदान केला. हा सन्मान त्यांच्या उत्कृष्ट नेतृत्वासाठी, कोविड-19 महामारीच्या काळात डॉमिनिकाला केलेल्या मदतीसाठी आणि भारत-डॉमिनिका संबंध बळकट करण्याच्या त्यांच्या कटिबद्धतेसाठी दिला गेला. डॉमिनिकाचे पंतप्रधान रूझवेल्ट स्केरिट या कार्यक्रमाला उपस्थित होते.