राष्ट्रकुल विधी शिक्षण संघटना -राष्ट्रकुल ऍटॉर्नी आणि सॉलिसिटर जनरल्स परिषदेतील पंतप्रधानांचे भाषण

February 03rd, 11:00 am

प्रतिष्ठित कायदेतज्ञ , जगभरातील विविध देशांमधील अतिथी आणि उपस्थित मान्यवर सदस्यगण, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सीएलईए - कॉमनवेल्थ ॲटर्नी एंड सॉलिसिटर जनरल परिषद 2024 चे उद्घाटन

February 03rd, 10:34 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे, कॉमनवेल्थ लीगल एज्युकेशन असोसिएशन (सीएलईए) - कॉमनवेल्थ ॲटर्नी एन्ड सॉलिसिटर जनरल कॉन्फरन्स (सीएएसजीसी) 2024, अर्थात राष्ट्रकुल कायदे शिक्षण संघटना- राष्ट्रकुल विधिज्ञ आणि महा न्याय अधिकर्ता परिषदेचे उद्घाटन केले. ‘न्याय वितरणापुढील सीमापार आव्हाने’, ही या परिषदेची संकल्पना असून, यामध्ये कायदा आणि न्याय विषयक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल. न्याय प्रक्रियेतील संक्रमण आणि वकिली व्यवसायाचे नैतिक पैलू, कामकाजातील उत्तरदायित्व, आणि आधुनिक काळातील कायदे विषयक शिक्षणाची पुनर्रओळख या आणि अन्य विषयांचा यात समावेश असेल.

3 फेब्रुवारी रोजी सी. एल. ई. ए.- राष्ट्रकुल देशांच्या विधीज्ञ आणि महाधिवक्ता परिषद 2024 चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार.

February 02nd, 11:10 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात आयोजित राष्ट्रकुल कायदे शिक्षण संघटना (सी. एल. ई. ए.)- राष्ट्रकुल देशांच्या विधीज्ञ आणि महाधिवक्ता परिषद (सी. ए. एस. जी. सी.) 2024 चे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान यावेळी उपस्थितांना संबोधितही करतील.