100 कोटी लसीकरण मात्रांचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केल्याबद्दल डॉक्टर आणि परिचारिकांप्रती पंतप्रधानांनी व्यक्त केली कृतज्ञता
October 21st, 11:59 am
पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी यांनी 100 कोटी लसीकरण मात्रांचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल डॉक्टर, परिचारिका आणि ज्यांनी लसीकरणाचे कार्य केले त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.नवी दिल्लीतल्या एम्सच्या झज्जर परिसरातल्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेमध्ये इन्फोसिस फाँडेशन विश्राम सदनाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
October 21st, 10:31 am
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवियाजी, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवारजी, हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विजजी, इन्फोसिस फाँडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती जी, संसदेमधले माझे सहकारी, आमदार आणि इतर माननीय,पंतप्रधानांनी नवी दिल्लीतील एम्सच्या झज्जर परिसरातील राष्ट्रीय कर्करोग संस्थेमधील इन्फोसिस फाउंडेशन विश्राम सदनाचे उद्घाटन केले
October 21st, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एम्स नवी दिल्लीच्या झज्जर परिसरातील राष्ट्रीय कर्करोग संस्थेत इन्फोसिस फाउंडेशन विश्राम सदनाचे उद्घाटन केले.वैश्विक कोविड-19 शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली टिपणी: महामारीचा अंत आणि भविष्यामध्ये उत्तम आरोग्य सुरक्षेसाठी सज्जता
September 22nd, 09:40 pm
कोविड-19 म्हणजे अभूतपूर्व आपत्ती आहे. ही महामारी अद्याप पूर्ण गेलेली नाही. जगातल्या बहुतांश लोकांचे लसीकरण अद्याप बाकी आहे. त्याअर्थाने राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी अतिशय योग्यवेळी या शिखर परिषदेचे आयोजित केली, ही स्वागतार्ह बाब आहे.ई-रुपी डिजिटल पेमेंट सुविधेच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 02nd, 04:52 pm
या महत्वपूर्ण कार्यक्रमात देशभरातून सहभागी झालेले सर्व राज्यपाल, नायब राज्यपाल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, राज्यांचे मुख्य सचिव, विविध औद्योगिक संस्थांशी संबंधित मित्रगण, स्टार्ट अप फिनटेकशी संबंधित युवा मित्र, बँकांचे वरिष्ठ अधिकारी गण, आणि माझ्या प्रिय बंधुभगिनींनो,पंतप्रधानांनी e-RUPI डिजिटल पेमेंट सुविधेचा केला प्रारंभ
August 02nd, 04:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे e-RUPI या व्यक्तिगत आणि उद्देश निश्चित डिजिटल पेमेंट सुविधेचा प्रारंभ केला. डिजिटल पेमेंटसाठी e-RUPI हे रोकडरहित आणि संपर्क विरहीत साधन आहे.कोविन जागतिक परिषद 2021 मध्ये पंतप्रधानांचे संबोधन
July 05th, 03:08 pm
कोविड-19 विरोधातल्या आपल्या लढ्यात तंत्रज्ञान हा अविभाज्य भाग आहे. सुदैवाने सॉफ्टवेअर हे असे एक क्षेत्र आहे ज्यामध्ये संसाधनांची मर्यादा नाही. म्हणूनच तांत्रिक दृष्ट्या साध्य झाल्यावर लगेचच आम्ही कोविड ट्रॅकिंगआणि ट्रेसिंग अॅप ओपन सोर्स केले. सुमारे 200 दशलक्ष वापरर्कर्त्यांसह हे आरोग्य सेतू अॅप, विकासकांसाठी सहज उपलब्ध पॅकेज आहे. भारतात वापर होत असल्याने वेग आणि प्रमाण यासाठी वास्तव जगात याची कसोटी झाली आहे याबाबत आपण निश्चिंत राहा.पंतप्रधानांनी केले कोविन जागतिक परिषदेला संबोधित, कोविन मंच म्हणजे कोविड-19 शी दोन हात करण्यासाठी भारताने जगाला प्रदान केलेली सार्वजनिक डिजिटल सामग्री असल्याचे प्रतिपादन
July 05th, 03:07 pm
कोविन मंच म्हणजे कोविड-19 शी दोन हात करण्यासाठी भारताने जगाला प्रदान केलेली सार्वजनिक डिजिटल सामग्री आहे, अश्या शब्दात कोविन मंचाचे वर्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविन जागतिक परिषदेला संबोधित करताना केले.डिजिटल भारत अभियानाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
July 01st, 11:01 am
आजचा दिवस भारताच्या सामर्थ्याला, भारताच्या संकल्पाला आणि भविष्यातल्या अगणित, अमर्याद शक्यतांना समर्पित आहे. एक राष्ट्र म्हणून अवघ्या 5-6 वर्षांमध्ये आपण डिजिटल क्षेत्रामध्ये किती उंच भरारी घेतली आहे, याचे, आजचा दिवस आपल्याला सदैव स्मरण देत राहील.पंतप्रधानांनी ‘डिजिटल भारताच्या’ लाभार्थ्यांशी साधला संवाद
July 01st, 11:00 am
‘डिजिटल भारत’ मोहिमेची सुरुवात झाल्याला सहा वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘डिजिटल भारता’च्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद आणि केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय शामराव धोत्रे हे उपस्थित होते.राज्ये आणि जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी कोविड-19 व्यवस्थापनाबाबतच्या चर्चेदरम्यान पंतप्रधानांनी साधलेला संवाद
May 18th, 11:40 am
आपण सगळ्यांनी कोविडच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतांना अत्यंत कठोर परिश्रम केले आहेत आणि सातत्याने करत आहात. आपल्यापैकी अनेक लोक असे आहेत, जे स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असूनही आपल्या जिल्ह्याची परिस्थिती सांभाळण्यासाठी सातत्याने काम करत आहेत. यामुळे जिल्ह्यातील इतर लोकांची उमेद वाढली आणि त्यांना आपल्यापासून प्रेरणा मिळाली.कोविड स्थितीविषयी चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी देशभरातील डॉक्टरांशी साधला संवाद
May 18th, 11:39 am
कोविड स्थितीविषयी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील डॉक्टरांच्या गटाशी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला.कोविड-19 विरुद्ध लसीकरण मोहिमेला यशस्वी प्रारंभ केल्याबद्दल शेजारी राष्ट्रांच्या नेत्यांकडून पंतप्रधान आणि भारत सरकारचे अभिनंदन
January 18th, 05:38 pm
भारताने कोविड –19 विरुद्ध लसीकरण मोहिमेला दि. 16 जानेवारी, 2021 रोजी यशस्वी प्रारंभ केल्याबद्दल शेजारी राष्ट्रांच्या नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारचे अभिनंदन केले आहे.कोविड-19 लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
January 16th, 10:31 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेचा दूरदृष्य प्रणाली द्वारे प्रारंभ केला. यावेळी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातली एकूण 3006 केंद्रे दूरदृश्य प्रणालीद्वारे जोडण्यात आली होती.कोविड -19 लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेचा पंतप्रधानांनी केला प्रारंभ
January 16th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेचा दूरदृष्य प्रणाली द्वारे प्रारंभ केला. यावेळी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातली एकूण 3006 केंद्रे दूरदृश्य प्रणालीद्वारे जोडण्यात आली होती.पंतप्रधान 16 जानेवारी रोजी देशभरात कोविड-19 लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करणार
January 14th, 07:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरात कोविड 19 लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करणार आहेत. हा संपूर्ण जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम असेल ज्याची व्याप्ती संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत असेल. याप्रसंगी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 3006 ठिकाणे आभासी पद्धतीने जोडली जातील. पहिल्या दिवशी प्रत्येक ठिकाणी सुमारे 100 लाभार्थ्यांचे लसीकरण केले जाईल.कोविड – 19 ची सद्यस्थिती आणि कोविड 19 च्या लसीकरणाचा पंतप्रधानांनी घेतला आढावा
January 09th, 05:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशभरातील कोविड – 19 ची सद्यस्थितीबरोबरच कोविड लसीकरणाबाबत राज्य/केंद्रशासित प्रदेशातील तयारीचा आढावा घेण्यासाठी आज एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, आरोग्य सचिव आणि अन्य संबंधित वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.