स्वच्छ भारत मिशनच्या दशकपूर्तीनिमित्त, पंतप्रधान 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत दिवस 2024 कार्यक्रमामध्ये होणार सहभागी

September 30th, 08:59 pm

स्वच्छ भारत मिशन - स्वच्छतेसाठी सर्वात महत्त्वपूर्ण जनआंदोलनाला 10 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्‍त 2 ऑक्टोबर रोजी, महात्‍मा गांधी यांच्‍या 155 व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्‍यात आलेल्या स्वच्छ भारत दिवस 2024 कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होतील. हा कार्यक्रम नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे सकाळी 10 वाजता होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिशू आणि बालमृत्यू दर कमी करण्यासाठी स्वच्छ भारत मिशनच्या प्रभावाला अधोरेखित करणारा वैज्ञानिक अहवाल सामायिक केला

September 05th, 04:11 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील शिशू आणि बालमृत्यू दर कमी करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन सारख्या उपक्रमांच्या प्रभावाला अधोरेखित करणारा वैज्ञानिक अहवाल शेअर केला.

पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा दोन अंतर्गत उत्तर प्रदेशातील शंभर टक्के गावांनी प्राप्त केलेल्या ओडीएफ प्लस दर्जाचे केले कौतुक

September 29th, 10:56 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा दोन अंतर्गत उत्तर प्रदेशातील शंभर टक्के गावांनी प्राप्त केलेल्या ओडीएफ (हगणदारीमुक्त) प्लस दर्जाचे कौतुक केले आहे.

पंतप्रधानांनी नागरिकांना 1 ऑक्टोबर 2023 रोजी होणाऱ्या श्रमदान उपक्रमात सहभागी होण्याचे केले आवाहन

September 29th, 10:53 am

स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून येत्या 1 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होणाऱ्या श्रमदान या स्वच्छताविषयक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रोटरी इंटरनॅशनल जागतिक परिषदेत भाषण

June 05th, 09:46 pm

जगभरातील रोटरीयन्सचा विशाल परिवार, प्रिय मित्रांनो, नमस्ते! मला रोटरी इंटरनॅशनल परिषदेला संबोधित करताना अतिशय आनंद होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर रोटरीशी संबंधित लोकांचा हा मेळावा एका अर्ध-जागतिक सभेसारखाच आहे. यामध्ये विविधता आणि चेतना आहे. रोटरीशी संबंधित तुम्ही सर्व लोक आपापल्या क्षेत्रात यशस्वी झाला आहात तरी देखील तुम्ही लोकांनी स्वतःला केवळ कामापुरते मर्यादित ठेवलेले नाही. आपल्या पृथ्वीला अधिक चांगले बनवण्याच्या तुमच्या इच्छेने तुम्हा सर्वांना या मंचावर एकत्र आणले आहे. यश आणि सेवेचे हे खऱ्या अर्थाने योग्य मिश्रण आहे.

रोटरी इंटरनॅशनलच्या जागतिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन

June 05th, 09:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका चित्रफितीच्या माध्यमातून दिलेल्या संदेशाद्वारे रोटरी इंटरनॅशनलच्या जागतिक परिषदेला संबोधित केले. इतक्या मोठ्या प्रमाणातील प्रत्येक रोटरी मेळावा हा एखाद्या छोट्या -जागतिक परिषदेसारखा आहे, तिथे विविधता आणि चैतन्य आहे असे सांगत रोटेरियन्स म्हणजे रोटरीचे सदस्य हे 'खऱ्या अर्थाने यश आणि सेवेचे मिश्रण' आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी तीर्थक्षेत्रे स्वच्छ ठेवण्याच्या यात्रेकरूंमधील प्रेरणेचे केले कौतुक

May 30th, 08:30 pm

प्रार्थना स्थळे स्वच्छ ठेवण्याच्या यात्रेकरूंमधील वाढत्या प्रेरणेचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे.

Start-ups are reflecting the spirit of New India: PM Modi during Mann Ki Baat

May 29th, 11:30 am

During Mann Ki Baat, Prime Minister Narendra Modi expressed his joy over India creating 100 unicorns. PM Modi said that start-ups were reflecting the spirit of New India and he applauded the mentors who had dedicated themselves to promote start-ups. PM Modi also shared thoughts on Yoga Day, his recent Japan visit and cleanliness.

श्रीस्वामीनारायण मंदिरात 19 मे रोजी आयोजित 'युवा शिबिर'ला पंतप्रधान संबोधित करणार

May 18th, 07:50 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 मे 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता करेलीबाग, वडोदरा येथे आयोजित करण्यात आलेल्या 'युवा शिबिर'ला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करतील. श्री स्वामीनारायण मंदिर, कुंडलधाम आणि श्री स्वामीनारायण मंदिर करेलीबाग, वडोदरा हे या शिबिराचे आयोजन करत आहेत.

इंदूर येथे घन कचरा आधारित गोबर -धन संयंत्राच्या उदघाटन प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

February 19th, 04:27 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंदूर महानगरपालिकेच्या ‘गोबरधन (जैव-सीएनजी) प्रकल्पाचे” दूरदृश्य प्रणालीच्या आधारे लोकार्पण केले.मध्यप्रदेशचे राज्यपाल मधुभाई सी पटेल, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान; केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, डॉ विरेन्द्र कुमार आणि कौशल किशोर यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंदूर इथे घनकचरा आधारित ‘गोबर-धन’ या महापालिका प्रकल्पाचे उद्घाटन

February 19th, 01:02 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंदूर महानगरपालिकेच्या ‘गोबरधन (जैव-सीएनजी) प्रकल्पाचे” दूरदृश्य प्रणालीच्या आधारे लोकार्पण केले.मध्यप्रदेशचे राज्यपाल मधुभाई सी पटेल, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान; केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, डॉ विरेन्द्र कुमार आणि कौशल किशोर यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

उत्तरप्रदेशच्या शहाजहानपूर इथे गंगा द्रुतगति मार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

December 18th, 06:20 pm

श्री बाबा विश्वनाथ आणि भगवान परशुराम यांच्या चरणी माझा प्रमाण! हर हर गंगे! उत्तरप्रदेशचे कार्यक्षम आणि ऊर्जावान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी बी.एल. वर्मा जी, संसदेतले माझे सहकारी संतोष गंगवार जी, उत्तर प्रदेशचे मंत्री सुरेश कुमार खन्ना जी, सतीश महाना जी, जितीन प्रसाद जी, महेश चन्द्र गुप्ता जी, धर्मवीर प्रजापती जी, संसदेतले माझे इतर सहकारी, उत्तरप्रदेश विधानसभा आणि विधान परिषदेतील इतर सहकारी, पंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो!

पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर येथे गंगा द्रुतगती मार्गाची केली पायाभरणी

December 18th, 01:03 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर येथे गंगा द्रुतगती मार्गाची (एक्सप्रेस वे)ची पायाभरणी केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री बी. एल वर्मा. यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 29 ऑगस्ट 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन

August 29th, 11:30 am

आज मेजर ध्यानचंद जी यांची जयंती आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे, आणि आपला देश त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करीत आहे. माझ्या मनात विचार आला की, सध्या जिथं कुठं मेजर ध्यानचंद जी यांचा आत्मा असेल, तिथं त्यांना खूप प्रसन्न वाटत असणार. कारण संपूर्ण दुनियेमध्ये भारताच्या हॉकीचा डंका बजावण्याचं काम ध्यानचंद जी यांच्या हॉकीनं केलं होतं. आणि आज चार दशकांनंतर, जवळ-जवळ 41 वर्षांनी भारताच्या नवयुवकांनी, पुत्रांनी आणि कन्यांनी हॉकी खेळामध्ये पुन्हा एकदा प्राण फुंकले आहेत. देशानं कितीही पदकांची कमाई केली तरी जोपर्यंत हॉकीमध्ये देशाला पदक मिळत नाही, तोपर्यंत कोणाही भारतीयांना विजयाचा आनंद घेता येत नाही. आणि यावेळच्या ऑलिंपिकमध्ये भारताला चार दशकांनंतर हॉकीचं पदक मिळालं. भारताच्या या विजयामुळं मेजर ध्यानचंद जी यांच्या हृदयाला, आत्म्याला, ते जिथं कुठं असतील, तिथं त्यांना किती आनंद वाटला असेल, त्यांचा आत्मा किती प्रसन्न झाला असेल, याची कल्पना तुम्ही मंडळी करू शकता. ध्यानचंद जीं नी आपलं संपूर्ण जीवन खेळाला समर्पित केलं होतं. आणि म्हणूनच, आज ज्यावेळी देशाचे नवयुवक, आपली मुलं-मुली, यांच्यामध्ये खेळाविषयी जे आकर्षण दिसून येतं, त्याचबरोबर मुलं जर खेळामध्ये चांगलं प्रदर्शन करून पुढं जात असताना मुलांचे आई-वडीलही आनंद व्यक्त करीत असतील, तर मला वाटतं की, आज मुलांमध्ये खेळाविषयी जो उत्साह दिसून येतोय, तो पाहिल्यावर मला वाटतं की, हीच मेजर ध्यानचंद जी यांना खूप मोठी श्रद्धांजली आहे.

Lotus is blooming in Bengal because TMC spawned muck in the state: PM Modi at Brigade Ground rally

March 07th, 02:01 pm

Ahead of upcoming assembly elections, PM Modi attacked the ruling Trinamool Congress saying that it has disrupted West Bengal's progress. Addressing the Brigade Cholo Rally in Kolkata, PM Modi said people of Bengal want 'Shanti', 'Sonar Bangla', 'Pragatisheel Bangla'. He promised “Ashol Poribortan” in West Bengal ahead of the assembly elections.

PM Modi addresses public meeting at Brigade Parade Ground in Kolkata

March 07th, 02:00 pm

Ahead of upcoming assembly elections, PM Modi attacked the ruling Trinamool Congress saying that it has disrupted West Bengal's progress. Addressing the Brigade Cholo Rally in Kolkata, PM Modi said people of Bengal want 'Shanti', 'Sonar Bangla', 'Pragatisheel Bangla'. He promised “Ashol Poribortan” in West Bengal ahead of the assembly elections.

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावेळी पंतप्रधानांचे भाषण

February 10th, 04:22 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या संसदेतील अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर दिले. राष्ट्रपतींच्या भाषणातून भारतची संकल्प शक्ती सगळ्या जगाला जाणवली, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांच्या शब्दांनी देशातल्या लोकांमधला आत्मविश्वास जागृत केला, असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी सभागृहातील सर्व सदस्यांचेही आभार मानले. धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत अनेक महिला खासदारांनी सहभाग घेतल्याची नोंद घेत, त्यांनी आपल्या विचारांतून या सभागृहाची प्रतिष्ठा वाढवल्याबद्दल त्यां सर्व महिलांचे अभिनंदन केले.

राष्ट्रपतींच्या आभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले उत्तर

February 10th, 04:21 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या संसदेतील अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर दिले. राष्ट्रपतींच्या भाषणातून भारतची संकल्प शक्ती सगळ्या जगाला जाणवली, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांच्या शब्दांनी देशातल्या लोकांमधला आत्मविश्वास जागृत केला, असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी सभागृहातील सर्व सदस्यांचेही आभार मानले. धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत अनेक महिला खासदारांनी सहभाग घेतल्याची नोंद घेत, त्यांनी आपल्या विचारांतून या सभागृहाची प्रतिष्ठा वाढवल्याबद्दल त्यां सर्व महिलांचे अभिनंदन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 27 डिसेंबर, 2020 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन

December 27th, 11:30 am

देशातील सामान्यातील सामान्य माणसाला हा बदल जाणवला आहे. मी देखील देशात आशेचा एक अद्भुत प्रवाह पाहिला आहे. अनेक आव्हाने आली. बर्याच समस्याही आल्या. कोरोनामुळे जगातील पुरवठा साखळीत देखील अनेक अडथळे आले, परंतु आम्ही प्रत्येक संकटापासून नवीन धडे घेतले. देशात एक नवीन क्षमता देखील जन्माला आली. जर तुम्हाला हे शब्दांतच सांगायचे असेल तर या क्षमतेचे नाव आहे ‘आत्मनिर्भरता’.

जागतिक शौचालय दिनी ‘सर्वांसाठी शौचालय’ संकल्प आणखी दृढ करण्याचा भारताचा निश्चय : पंतप्रधान

November 19th, 01:41 pm

आज जागतिक शौचालय दिनाच्या दिवशी आपला देश, सर्वांसाठी शौचालय या संकल्पाला आणखी मजबूत करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.