मणीपूरमध्ये इंफाळ येथे राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांच्या चिंतन शिबिरामध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 24th, 10:10 am
देशाच्या क्रीडामंत्र्यांची ही परिषद, हे चिंतन शिबिर मणीपूरच्या भूमीवर होत आहे याचा मला अतिशय आनंद होत आहे. ईशान्येमधून उदयाला आलेल्या कित्येक खेळाडूंनी तिरंग्याचा मान वाढवला आहे, देशासाठी पदके जिंकली आहेत. देशाची क्रीडा परंपरा पुढे नेण्यामध्ये ईशान्य भागाचे आणि मणीपूरचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. येथील सगोल कांगजई, थांग-ता, युबी लाक्पी, मुक्ना आणि हियांग तान्नबा सारखे स्वदेशी खेळ, जे स्वतःच खूपच आकर्षक आहेत. म्हणजे जेव्हा आपण मणीपूरचा ऊ-लावबी पाहतो त्यावेळी आपल्याला त्यामध्ये कबड्डीची झलक दिसते. येथील हियांग तान्नबा केरळच्या बोट रेसची आठवण करून देतो आणि पोलो या खेळाशी देखील मणीपूरचा ऐतिहासिक संबंध राहिला आहे. म्हणजेच, ज्या प्रकारे ईशान्य भाग देशाच्या सांस्कृतिक विविधतेमध्ये नवे रंग भरत असतो, त्याच प्रकारे देशाच्या क्रीडा विविधतेला देखील नवे आयाम देत आहे. देशभरातून आलेले क्रीडामंत्री मणीपूरकडून बरेच काही शिकून जातील अशी मला अपेक्षा आहे आणि मणीपूरच्या लोकांचे प्रेम, त्यांचा पाहुणचार, तुमच्या प्रवासाला आणखी आनंददायी बनवेल, अशी मला खात्री आहे. मी या चिंतन शिबिरात सहभागी होत असलेल्या सर्व क्रीडामंत्र्यांचे, इतर मान्यवरांचे स्वागत करतो, अभिनंदन करतो.मणिपूरमधल्या इम्फाळ येथे राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांच्या चिंतन शिबिराला पंतप्रधानांनी केले संबोधित
April 24th, 10:05 am
मणिपूरमधल्या इम्फाळ येथे आयोजित राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांच्या ‘चिंतन शिबिराला ’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे मार्गदर्शन केले.