लाइव्ह बुद्धिबळ मानांकनामध्ये 2800 गुणांचा आकडा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जुन एरिगैसीला दिल्या शुभेच्छा
October 27th, 11:08 am
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर अर्जुन एरिगैसी याचे लाइव्ह बुद्धिबळ मानांकनामध्ये 2800 गुणांचा आकडा पार केल्याबद्दल अभिनंदन केले.45व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये खुला आणि महिला गट या दोन्हीमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारतीय चमूचे पंतप्रधान मोदी यांनी केले कौतुक
September 23rd, 01:15 am
45व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये खुला आणि महिला गट या दोन्हीमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारतीय चमूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कौतुक केले. अतिशय उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांनी पुरुषांच्या आणि महिलांच्या असामान्य बुद्धिबळ संघांचे अभिनंदन केले.संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवर पुनश्च आपला अढळ विश्वास दाखवल्याबद्दल देशवासीयांचे आभार: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
June 30th, 11:00 am
मित्रांनो, फेब्रुवारीपासून आतापर्यंत जेव्हा महिन्याचा शेवटचा रविवार यायचा, तेव्हा मला तुमच्या सोबतच्या या संवादाची उणीव जाणवायची. पण या कालावधीमध्ये देखील तुम्ही मला लाखो पत्र पाठवलीत हे पाहून मला खूप छान वाटले. 'मन की बात' हा रेडिओ कार्यक्रम जरी काही महिने प्रसारित झाला नसला तरीदेखील, 'मन की बात' ची भावना ही इतकी सखोल आहे की देशात, समाजात, दररोज होणाऱ्या कामांमध्ये, निस्वार्थ भावनेने केलेली कामे, समाजावर सकारात्मक परिणाम घडवणाऱ्या कामांमध्ये ती निरंतर दिसून आली. निवडणुकीच्या बातम्यांदरम्यान, अशा हृदयस्पर्शी बातम्यांनी नक्कीच तुमचे लक्ष वेधून घेतले असले.पंतप्रधानांनी राष्ट्रीय बाल पुरस्कार प्राप्त मुलांशी साधला संवाद
January 23rd, 06:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 7 लोककल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) पुरस्कार प्राप्त मुलांशी संवाद साधला.तमिळनाडूत चेन्नई इथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन समारंभातले पंतप्रधानांचे संबोधन
January 19th, 06:33 pm
13 व्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धामध्ये मी सर्वांचे स्वागत करतो.भारतीय क्रीडा विश्वासाठी 2024 ची सुरवात करण्याचा हा उत्तम मार्ग आहे.इथे जमलेले माझे युवा मित्र युवा भारत,नव भारताचे प्रतिनिधित्व करतात. यांची ऊर्जा आणि उत्साह क्रीडा विश्वात आपल्या देशाला नव्या शिखरावर नेत आहे.देशभरातून चेन्नईला आलेल्या सर्व खेळाडूंना आणि क्रीडा प्रेमींना माझ्या शुभेच्छा.आपण सर्वजण एकत्रितपणे खऱ्या अर्थाने एक भारत श्रेष्ठ भारत चे दर्शन घडवत आहात.तामिळनाडूचे स्नेह पूर्ण लोक,लालित्यपूर्ण तमिळ भाषा,संस्कृती आणि खाद्य संस्कृती यामुळे आपणा सर्वांना आपुलकीचा प्रत्यय येईल.त्यांचे आदरातिथ्य आपणा सर्वांची मने जिंकेल याचा मला विश्वास आहे. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा आपल्यातल्या कौशल्याचे दर्शन घडवण्याची संधी नक्कीच देईल.त्याचबरोबर आपल्याला आयुष्य भर साथ देणारी नवी मैत्रीही जोडण्यासाठी मदत करेल.पंतप्रधानांच्या हस्ते तमिळनाडूतील चेन्नई येथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 चे उद्घाटन
January 19th, 06:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूत चेन्नई येथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 सोहळ्याचे उद्घाटन केले. मोदी यांनी प्रसारण क्षेत्राशी संबंधित सुमारे 250 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उदघाटन आणि पायाभरणीही केली. यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमालाही ते उपस्थित राहिले. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाचे प्रतीक म्हणून त्यांनी दोन खेळाडूंनी दिलेली स्पर्धेची मशाल एका मोठ्या भांड्यात (cauldron) ठेवली.मन की बात, डिसेंबर 2023
December 31st, 11:30 am
नमस्कार, माझ्या प्रिय देशवासियांनो. ‘मन की बात’ म्हणजे तुम्हां सगळ्यांना भेटण्याची एक शुभ संधीच, आणि जेव्हा आपण आपल्या कुटुंबियांना भेटतो तो क्षण खूपच आनंददायी आणि समाधानकारक असतो. ‘मन की बात’ च्या माध्यमातून मी जेव्हा तुम्हाला भेटतो तेव्हा मला देखील हाच अनुभव येतो, आणि आज आपल्या एकत्रित प्रवासाचा हा 108 वा भाग आहे. आपल्याकडे 108 या अंकाचे महत्व, त्याचे पावित्र्य हा एक सखोल अध्ययनाचा विषय आहे. जपमाळेतील 108 मणी, 108 वेळा होणारा जप, 108 दिव्य क्षेत्र, मंदिरांच्या 108 पायऱ्या, 108 घंटा, 108 हा आकडा अपार श्रद्धेशी निगडीत आहे. म्हणूनच ‘मन की बात’ चा हा 108 वा भाग माझ्यासाठी अजूनच खास झाला आहे. या 108 भागांमध्ये आपण लोकसहभागाची अनेक उदाहरणे पहिली आहेत, त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे. आता या टप्प्यावर पोहोचल्यानंतर, आपल्याला नवीन जोमाने, नवीन उर्जेसह आणि अधिक वेगाने आगेकूच करण्याचा संकल्प केला पाहिजे. उद्याचा सूर्योदय हा 2024 चा पहिला सूर्योदय असणार आहे हा किती सुखद योगायोग आहे; आपण 2024 मध्ये प्रवेश केला असेल. तुम्हां सर्वाना 2024 च्या हार्दिक शुभेच्छा.फिडे ग्रँड स्विस ओपन बुद्धिबळ स्पर्धेत भारताने पटकावले अव्वल स्थान
November 06th, 08:23 pm
फिडे ग्रँड स्विस ओपनमध्ये विदित गुजराथी आणि वैशाली यांच्या शानदार विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बुद्धिबळात कांस्यपदक जिंकल्याबद्दल किशन गांगोलीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
October 28th, 08:48 pm
हांगझोऊ येथे दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या बुद्धिबळ B2 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल किशन गंगोलीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बुद्धिबळात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी हिमांशी राठी, संस्कृती मोरे, वृती जैन यांचे केले अभिनंदन
October 28th, 08:45 pm
हांगझोऊ येथे सुरू असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला बुद्धिबळ B1 गटात आज कांस्य पदक जिंकल्याबद्दल हिमांशी राठी, संस्कृती मोरे आणि वृत्ती जैन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बुद्धिबळात कांस्यपदक जिंकणाऱ्या किशन गांगोली, आर्यन जोशी, सोमेंद्र यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
October 28th, 08:44 pm
हांगझोऊ येथे सुरू असलेल्या दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या बुद्धिबळ B2 सांघिक प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल किशन गंगोली, आर्यन जोशी आणि सोमेंद्र यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बुद्धिबळात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी अश्विन मकवाना याचे केले अभिनंदन
October 28th, 08:38 pm
हांगझोऊ येथे सुरू असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज पुरुषांच्या बुद्धिबळ B1 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल अश्विन मकवाना याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बुद्धिबळ क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल दर्पण इनानी यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
October 28th, 11:50 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हांगझो आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या बुद्धिबळ क्रीडा प्रकारात आज सुवर्णपदक जिंकल्याबद्दल दर्पण इनानी यांचे अभिनंदन केले.दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बुद्धिबळ क्रीडा प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी सौंदर्य प्रधानचे केले अभिनंदन
October 28th, 11:46 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हांगझोऊ येथे सुरू असलेल्या दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत, पुरुषांच्या बुद्धिबळ क्रीडा प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल सौंदर्य प्रधान याचे अभिनंदन केले.दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत, बुद्धिबळ क्रीडा प्रकारात सुवर्ण जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी दर्पण इनानी, सौंदर्य प्रधान, अश्विन यांचे केले अभिनंदन
October 28th, 11:44 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हांगझोऊ येथे सुरू असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या बुद्धिबळ क्रीडा प्रकारात आज सुवर्णपदक जिंकल्याबद्दल दर्पण इनानी, सौंदर्य प्रधान आणि अश्विन यांचे अभिनंदन केले आहे.जागतिक अव्वल बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनवर विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधानांनी कार्तिकेयन मुरलीची केली प्रशंसा
October 19th, 06:27 pm
कतार मास्टर्स 2023 स्पर्धेत मॅग्नस कार्लसन या जगात अव्वल स्थानावर असलेल्या बुद्धिबळपटूवर विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधानांनी कार्तिकेयन मुरली याची प्रशंसा केली आहे.आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या (FIDE) जागतिक ज्युनिअर रैपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत मिळवलेल्या विजयाबद्दल रौनक साधवानीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
October 14th, 01:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने (FIDE) आयोजित केलेल्या जागतिक ज्युनिअर रैपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा 2023 मध्ये मिळवलेल्या उल्लेखनीय विजयाबद्दल रौनक साधवानीचे अभिनंदन केले आहे.आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केले बुद्धिबळ पुरुष संघाचे अभिनंदन
October 07th, 10:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हँगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल बुद्धिबळ पुरुष संघाचे अभिनंदन केले आहे.बुद्धीबळ स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला संघाचे केले अभिनंदन
October 07th, 10:23 pm
हांगझाऊ इथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत, रौप्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला बुद्धीबळ संघाचे अभिनंदन केले आहे.फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत प्रज्ञानानंद याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पंतप्रधानांकडून प्रशंसा
August 24th, 07:01 pm
फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंद याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची प्रशंसा केली आहे.