श्रीनगर इथे 'युवा सशक्तिकरण, जम्मू काश्मीरचा कायापालट' या कार्यक्रमातले पंतप्रधानांचे संबोधन

June 20th, 07:00 pm

जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल श्री मनोज सिन्हा जी,केंद्रीय मंत्री मंडळातले माझे सहकारी श्री प्रतापराव जाधव जी, इतर सर्व मान्यवर आणि जम्मू काश्मिरच्या काना कोपऱ्यातून जोडले गेलेले माझे युवा मित्र आणि सर्व बंधू भगिनींनो !

पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर येथे ‘युवकांचे सक्षमीकरण, जम्मू-काश्मीरमध्ये परिवर्तन’ कार्यक्रमाला केले संबोधित

June 20th, 06:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्र येथे ‘‘युवकांचे सक्षमीकरण, जम्मू-काश्मीरमध्ये परिवर्तन’ कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीर मध्ये 1,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी केली , ज्यामध्ये रस्ते, पाणीपुरवठा आणि उच्च शिक्षणातील पायाभूत सुविधा आदी क्षेत्रांचा समावेश आहे. त्यांनी 1,800 कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि संलग्न क्षेत्रातील स्पर्धात्मकता सुधारणा प्रकल्पाचे उद्‌घाटन देखील केले. मोदी यांनी सरकारी सेवेत नियुक्त झालेल्या 200 हून अधिक उमेदवारांना नियुक्ती पत्रे वितरित करण्याचा देखील प्रारंभ केला.या प्रसंगी, पंतप्रधानांनी प्रदर्शनाला भेट दिली आणि केंद्रशासित प्रदेशातील यशस्वी युवकांशी संवाद साधला.

पंतप्रधानांनी सामाईक केले देशभरात "हर घर तिरंगा" अभियानाचा उत्साह दर्शवणारे क्षण

August 14th, 02:34 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात हर घर तिरंगा अभियानाविषयी उत्साह दर्शवणारे उपक्रम ट्वीटरवरून सामाईक केले आहेत.

जगातील सर्वाधिक उंचीच्या रेल्वे पुलावरील कमानीचे बांधकाम पूर्णत्वाला नेल्याबद्दल पंतप्रधानांकडून गौरवोद्गार

April 05th, 08:51 pm

जम्मू कश्मीरमध्ये भारतीय रेल्वेकडून उभारल्या जात असलेल्या जगातील सर्वाधिक उंचीच्या चिनाब पुलावरील कमानीचे बांधकाम यशस्वीपणे पूर्णत्वाला नेल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुकोद्गार काढले आहेत.

महत्वाच्या संरचना क्षेत्रातल्या कामगिरीचा पंतप्रधानांकडून आढावा

April 26th, 12:25 pm

पंतप्रधान मोदी ह्यांनी रस्ते, रेल्वे, विमानतळे, बंदरे, डिजिटल आणि कोळशासाहित महत्वाच्या संरचना क्षेत्रातल्या कामगिरीचा आढावा घेतला. बऱ्याच प्रकल्पांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली. पंतप्रधानांनी ग्रामीण रस्तेबांधणी आणि त्यांच्या दर्जावर बारकाईने देखरेख ठेवण्यास सांगितले. रस्ते बांधणीमध्ये नवीन तंत्रज्ञान वापरण्याची सूचना देखील पंतप्रधानांनी केली.