पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल ऍथलिट प्रवीण कुमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन.

September 06th, 05:22 pm

फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या उंच उडी T64 मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल ऍथलिट प्रवीण कुमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल ज्युडोका कपिल परमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन.

September 05th, 10:26 pm

फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅराऑलिम्पिक मध्ये पुरुषांच्या 60kg J1 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल क्रिडापटू कपिल परमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.

भारतीय पॅरालिम्पिक चमूने आतापर्यंतचा सर्वोच्च पदकांचा विक्रम नोंदवल्याबद्दल पंतप्रधानांकडून प्रचंड अभिमान आणि आनंदाची भावना व्यक्त

September 04th, 04:33 pm

पॅरालिम्पिकमध्ये भारतीय पॅरालिम्पिक दलाने आपल्या देशासाठी आतापर्यंतचा सर्वोच्च पदकांचा विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिमान आणि आनंद व्यक्त केला आहे. मोदी यांनी खेळाडूंच्या समर्पण आणि जिद्दीची प्रशंसा केली आणि प्रत्येक खेळाडूचे त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुवर्ण पदकाला गवसणी घालणारा बॅडमिंटनपटू नितेश कुमारचे केले अभिनंदन

September 02nd, 08:16 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पॅरा बॅडमिंटन पुरुष एकेरी SL3 स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या नितेश कुमार याचे अभिनंदन केले.

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये दुसरे पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रीती पाल हिचे अभिनंदन केले.

September 02nd, 10:50 am

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये दुसरे पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रीती पाल हिचे अभिनंदन केले.

पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T47 प्रकारात रौप्य पदक मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषाद कुमारचे अभिनंदन केले.

September 02nd, 10:50 am

पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T47 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज निषाद कुमारचे अभिनंदन केले.

पॅरिस पॅरालिंपिक 2024 मध्ये पी2 - महिला 10 मीटर एअर पिस्टल एसएच1 स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल रुबिना फ्रान्सिसचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

August 31st, 08:19 pm

पॅरिस पॅरालिंपिक 2024 मध्ये पी2 - महिला 10 मीटर एअर पिस्टल एसएच1 स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल रुबिना फ्रान्सिस हीचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

मनीष नरवालने P1 पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल SH1 प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त

August 30th, 08:55 pm

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील P1 पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल SH1 प्रकारात मनीष नरवालने रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 मी T35 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल भारतीय क्रीडापटू प्रीती पाल हिचे केले अभिनंदन

August 30th, 06:42 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरीस पॅरालिम्पिक्स 2024 मध्ये भारतीय क्रीडापटू प्रीती पाल हिने 100 मी T35 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

पॅरिस पॅरालिम्पिक मध्ये R2 महिला 10 मीटर एअर रायफल SH1 स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल भारतीय नेमबाज मोना अग्रवालचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

August 30th, 04:57 pm

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये R2 महिला 10 मीटर एअर रायफल SH1 या स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नेमबाज मोना अग्रवाल हिचे अभिनंदन केले आहे.

ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल मनू भाकर आणि सरबजोत सिंह यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

July 30th, 01:38 pm

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील 10 मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल, भारतीय नेमबाज मनू भाकर आणि सरबजोत सिंह यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केल्याबद्दल मनू भाकर हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

July 28th, 04:31 pm

पॅरिस ऑलिम्पिक 2024 क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या मनू भाकर हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

'हर घर तिरंगा अभियान' तिरंग्याचे वैभव टिकवून ठेवणारा एक अनोखा उत्सव झाला आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

July 28th, 11:30 am

मित्रांनो, क्रीडाविश्वातील या ऑलिम्पिकपेक्षा वेगळे असलेले गणिताच्या जगातील ऑलिम्पिक काही दिवसांपूर्वीच पार पाडले. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड. या ऑलिम्पियाड मध्ये भारतातील विद्यार्थ्यांनी फार उत्तम कामगिरी करून दाखवली. या स्पर्धेत आपल्या भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी करत चार सुवर्णपदके आणि एक रौप्य पदक जिंकले आहे. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड या स्पर्धेत जगातील 100 हून अधिक देशांचे संघ सहभागी होतात आणि एकंदर पदकतालिकेचा विचार करता आपला संघ पहिल्या पाच सर्वोत्तम संघांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. या स्पर्धेत देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आहेत- पुण्याचा आदित्य वेंकट गणेश, पुण्याचाच सिद्धार्थ चोप्रा, दिल्लीचा अर्जुन गुप्ता, ग्रेटर नोईडाचा कणव तलवार, मुंबईचा ऋषील माथुर आणि गुवाहाटीचा आनंदो भादुरी.

संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवर पुनश्च आपला अढळ विश्वास दाखवल्याबद्दल देशवासीयांचे आभार: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये

June 30th, 11:00 am

मित्रांनो, फेब्रुवारीपासून आतापर्यंत जेव्हा महिन्याचा शेवटचा रविवार यायचा, तेव्हा मला तुमच्या सोबतच्या या संवादाची उणीव जाणवायची. पण या कालावधीमध्ये देखील तुम्ही मला लाखो पत्र पाठवलीत हे पाहून मला खूप छान वाटले. 'मन की बात' हा रेडिओ कार्यक्रम जरी काही महिने प्रसारित झाला नसला तरीदेखील, 'मन की बात' ची भावना ही इतकी सखोल आहे की देशात, समाजात, दररोज होणाऱ्या कामांमध्ये, निस्वार्थ भावनेने केलेली कामे, समाजावर सकारात्मक परिणाम घडवणाऱ्या कामांमध्ये ती निरंतर दिसून आली. निवडणुकीच्या बातम्यांदरम्यान, अशा हृदयस्पर्शी बातम्यांनी नक्कीच तुमचे लक्ष वेधून घेतले असले.