PM remembers heroes of freedom struggle on completion of hundred years of Chauri Chaura incident
February 04th, 07:40 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has remembered the heroes of our freedom struggle on completion of hundred years of Chauri Chaura incident. He also shared his last year's speech when the centenary celebrations of the incident began.महान योद्धे आणि नेत्यांना योग्य तो सन्मान आणि आदर न देणाऱ्या इतिहासातल्या चुकांची दुरुस्ती करण्यात येत असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
February 16th, 02:45 pm
स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रवेश करताना, देशासाठी बहुमोल योगदान दिलेल्या थोर नेत्यांचे स्मरण अतिशय महत्वाचे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. भारत आणि भारतीयत्व यासाठी सर्वस्वाचे बलिदान देणाऱ्यांना, इतिहासाच्या पुस्तकात योग्य ते महत्व दिले गेले नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. भारताचा इतिहास घडवणाऱ्याप्रती, इतिहास लेखकांची ही अनियमितता आणि अन्याय आता दूर करण्यात येत आहे. आपल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात आपण प्रवेश करत असून या टप्यावर या महान व्यक्तीत्वांच्या योगदानाचे स्मरण अधिकच महत्वाचे ठरत असल्याचे ते म्हणाले. उत्तर प्रदेशातल्या बहराइच इथे महाराजा सुहेलदेव स्मारक आणि चित्तौरा तलावाच्या विकास कामाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे पायाभरणी केल्यानंतर ते आज बोलत होते.उत्तर प्रदेशातील बहराईच येथे महाराजा सुहेलदेव स्मारक आणि चित्तौरा तलावाच्या विकासकामांच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 16th, 11:24 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या बहराइच इथे महाराजा सुहेलदेव स्मारक आणि चित्तौरा तलावाच्या विकास कामाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे पायाभरणी केली. महाराजा सुहेलदेव यांच्या नावाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचेही पंतप्रधानांनी उद्घाटन केले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.महाराजा सुहेलदेव स्मारक आणि चित्तौरा तलावाच्या विकास कामाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी
February 16th, 11:23 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या बहराइच इथे महाराजा सुहेलदेव स्मारक आणि चित्तौरा तलावाच्या विकास कामाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे पायाभरणी केली. महाराजा सुहेलदेव यांच्या नावाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचेही पंतप्रधानांनी उद्घाटन केले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.चौरी चौरातील शहिदांना योग्य महत्व दिले गेले नाहीः पंतप्रधान
February 04th, 05:37 pm
इतिहासाच्या पानांमध्ये चौरी चौराच्या शहिदांना योग्य महत्व दिले गेले नाही अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली. उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमधल्या चौरी चौरा येथे ‘चौरी चौरा’ शताब्दी समारंभाचे आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. ठळकपणे माहीत नसलेल्या शहीद आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या कथा देशासमोर आणण्याचे प्रयत्न म्हणजे त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे ते म्हणाले. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात देश प्रवेश करत असताना हे अधिक उचित ठरेल, असे त्यांनी सांगितले.उत्तर प्रदेशातल्या गोरखपुर येथे ‘चौरी- चौरा शताब्दी’ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 04th, 02:37 pm
भगवान महादेवाचे अवतार असलेल्या गोरक्षनाथाच्या भूमीला सर्वात प्रथम वंदन करतो. देवरहा बाबांच्या आशीर्वादामुळे या भागाचा खूप चांगला विकास होत आहे. देवरहा बाबांच्या या भूमीवर आपण चौरी-चौराच्या महान लोकांचे स्वागत करून तुम्हा सर्वांना नमस्कार करतो.पंतप्रधानांनी ‘चौरी चौरा’ शताब्दी समारंभांचे उद्घाटन केले
February 04th, 02:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील चौरी चौरा येथे ‘चौरी चौरा’ शताब्दी समारंभांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन केले. आजच्या दिवशी ‘चौरी चौरा’ घटनेला 100 वर्षे झाली आहेत, देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईतील ही ऐतिहासिक घटना आहे. पंतप्रधानांनी चौरी चौरा शताब्दी कार्यक्रमाला समर्पित टपाल तिकीटही प्रकाशित केले. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित होते.पंतप्रधान 4 फेब्रुवारी रोजी ‘चौरी चौरा’ शताब्दी समारंभांचे उद्घाटन करणार
February 02nd, 12:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील चौरी चौरा इथल्या चौरी चौरा शताब्दी समारंभाचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करतील. या दिवशी ‘चौरी चौरा’ घटनेला 100 वर्षे पूर्ण होत असून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील ही ऐतिहासिक घटना आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान चौरी चौरा शताब्दीला समर्पित टपाल तिकीटाचे प्रकाशनही करतील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहतील.