भारत पुन्हा चंद्रावर उतरणार: यावेळी चंद्रावर उतरून पुन्हा पृथ्वीवर परतण्याची मोहीम
September 18th, 04:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने चांद्रयान-4 या मोहिमेला मंजुरी दिली आहे. चंद्रावर यशस्वीरीत्या उतरल्यावर पृथ्वीवर परतण्यात वापरलेले तंत्रज्ञान प्रदर्शित करणे तसेच चंद्रावरून नमुने आणून पृथ्वीवर त्यांचे विश्लेषण करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. चांद्रयान-4 मोहीम भारताच्या चंद्रावर उतरण्यासाठी (वर्ष 2040 पर्यंत नियोजित) आणि पृथ्वीवर सुरक्षित परतण्यासाठी मूलभूत तंत्रज्ञान क्षमता प्राप्त करेल. डॉकिंग/अनडॉकिंग, लँडिंग, पृथ्वीवर सुरक्षित परतणे आणि चंद्रावरील नमुना संकलन आणि विश्लेषण पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमुख तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवले जाईल.