People of Bihar have decided that there will be no entry for Jungle Raj: PM Modi

November 01st, 04:01 pm

PM Narendra Modi while addressing the election rally in Bagaha, Bihar said, The trends in the first phase clearly indicate that people of Bihar have put up a no entry board for Jungle Raj in the state. He said that in the ongoing elections, the people have made up their minds to elect a stable NDA government under Nitish Ji's leadership.

PM Modi campaigns in Chhapra, Samastipur, Motihari and Bagaha in Bihar

November 01st, 03:54 pm

Continuing his election campaigning spree, PM Modi addressed public meetings in Chhapra, Samastipur, Motihari and Bagaha today. He said, “It is clear after the first phase polls itself that Nitish Babu will head the next govt in Bihar. The opposition is totally rattled, but I would ask them not to vent their frustration on the people of Bihar.”

Jungle Raj made sure all the industries and sugar mills which were the hallmark of Bihar were shut down: PM

November 01st, 02:55 pm

PM Modi, in his poll rally in Motihari, cautioned people against the jungle raj that would return if the Congress-RJD alliance came to power. He said Jungle Raj made sure all the industries and sugar mills which were the hallmark of Bihar were shut down.

एनडीए बिहारमध्ये डबल-डबल युवराजांना पराभूत करेलः पंतप्रधान मोदी

November 01st, 10:50 am

छप्रा येथील प्रचारसभेत महागठबंधनवर जोरदार हल्ला चढवत पंतप्रधान मोदी यांनी चांगल्या भवितव्यासाठी अशा स्वार्थी मंडळींना दूर ठेवण्याचे लोकांना आवाहन केले. राज्य विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात झालेले मतदान एनडीए बिहारमध्ये पुन्हा सत्तेवर येणार असल्याचे दर्शवणारे, असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

आज बिहारमध्ये पेट्रोलियम क्षेत्राशी संबंधित तीन महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

September 13th, 12:01 pm

कार्यक्रमाच्या प्रारंभीच मला आपल्याबरोबर एक दुःखद बातमी सामायिक करायची आहे. बिहारचे दिग्गज नेते रघुवंश प्रसाद सिंह आता आपल्यामध्ये नाहीत. त्यांना मी वंदन करतो. रघुवंशबाबू यांच्या जाण्याने बिहार आणि देशाच्या राजकीय क्षेत्रामध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे. अगदी तळागाळातल्या समाजाशी जोडले गेलेले व्यक्तिमत्व, गरीबी म्हणजे नेमके काय हे समजणारे व्यक्त्वि, त्यांनी संपूर्ण जीवन बिहारसाठी संघर्ष करण्यामध्ये घालवले. ज्या विचारधारेमध्ये ते वाढले- मोठे झाले, जीवनभर त्याच तत्वांनुसार जगाण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

पंतप्रधानांनी बिहारमधील पेट्रोलियम क्षेत्राशी संबंधित तीन प्रमुख प्रकल्प देशाला केले समर्पित

September 13th, 12:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बिहारमधील पेट्रोलियम क्षेत्राशी संबंधित तीन प्रमुख प्रकल्प देशाला समर्पित केले. या प्रकल्पांमध्ये पारादीप-हल्दिया-दुर्गापूर पाईपलाईन विस्तार प्रकल्पाचा दुर्गापूर-बांका हा भाग आणि दोन एलपीजी बॉटलिंग प्लांटचा समावेश आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अखत्यारीतील इंडियन ऑइल आणि एचपीसीएल, या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी हे प्रकल्प उभारले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील पेट्रोलियम क्षेत्रातील तीन प्रमुख प्रकल्प 13 सप्टेंबर रोजी राष्ट्राला समर्पित करणार

September 11th, 06:35 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील पेट्रोलियम क्षेत्रातील तीन प्रमुख प्रकल्प 13 सप्टेंबर रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून राष्ट्राला समर्पित करणार आहेत. यात पॅराद्वीप-हल्दीया-दुर्गापूर पाईपलाईन विस्तार प्रकल्पाचा दुर्गापूर-बांका विभाग आणि दोन एलपीजी बॉटलिंग प्रकल्प आहेत. हे प्रकल्प पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयांतर्गत असलेल्या इंडियन ऑईल आणि एचपीसीएल या दोन पीएसयुकडून या प्रकल्पांचे संचलन केले जात आहे. बिहारच्या मुख्यमंत्र्यांची याप्रसंगी उपस्थित असणार आहे.

बिहारमधील मोतीहारी येथे चंपारण्य सत्याग्रहाच्या शतक महोत्सवाच्या सांगता समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

April 10th, 01:32 pm

चंपारण्यच्या पवित्र धरतीवर देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले स्वच्छग्रही बंधू-भगिनी, सर्व स्नेही, सर्व मान्यवरांना मी प्रणाम करतो. सर्वाना माहित आहे की, चंपारण्याच्या याच पवित्र भूमीवरून बापूंनी सत्याग्रह आंदोलनाला सुरुवात केली. इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्ती मिळावी यासाठी अहिंसक शस्त्रात्रे सत्याग्रहाच्या रूपात आपल्याला मिळाले. सत्याग्रहाला शंभर वर्षे पूर्ण झाली. ‘सत्याग्रह ते स्वच्छाग्रह’ आजच्या काळाची गरज होती.

पंतप्रधानांचे राष्ट्रीय स्वच्छाग्रही परिषदेला संबोधन

April 10th, 01:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोतिहारी येथे राष्ट्रीय स्वच्छाग्रही परिषदेला संबोधित केले. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चंपारण्यात सुरू केलेल्या सत्याग्रह कार्यक्रमाच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छाग्रहींना उद्या चंपारण्य येथे मार्गदर्शन करणार

April 09th, 02:57 pm

बिहारमधील चंपारण सत्याग्रहाच्या शताब्दी वर्ष समारोप कार्यक्रम उद्या होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार असून स्वच्छाग्रहींना मार्गदर्शन करणार आहेत.

ईशान्य प्रांताचा विकास करण्याला आम्ही प्राधान्य देतो : पंतप्रधान मोदी

May 07th, 01:15 pm

पंतप्रधानांनी शिलॉंग इथल्या भारत सेवाश्रम संघाच्या शतकपूर्ती समारंभात व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे भाषण केले. स्वामी प्रणवानंद ह्यांच्या योगदानाचे स्मरण करून श्री मोदी म्हणाले की,”स्वामी प्रणवानंदांनी आपल्या शिष्यांना सेवा आणि अध्यात्मिक विचारांची शिकवण दिली.” ते म्हणाले की, स्वामी प्रणवानंदांनी भक्ती, शक्ती आणि जनशक्तीच्या माध्यमातून सामाजिक विकास घडवून आणला. ईशान्य भागात लोकांनी स्वच्छतेसाठी काम करावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. ईशान्य प्रांताचा विकास करण्याला आम्ही प्राधान्य देतो असंही ती म्हणाले.

सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 10 एप्रिल 2017

April 10th, 08:29 pm

तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !

चंपारण्य सत्याग्रहाच्या शतकपूर्ती निमित्त संवादात्मक डिजीटल प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

April 10th, 06:21 pm

आज आपण २०व्या शतकातील एका महान घटनेच्या समारंभाचा शुभारंभ करण्यासाठी एकत्रित जमलो आहोत. १०० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी गांधीजींनी पाटणा येथून आपल्या चंपारण्याच्या प्रवासाला सुरवात केली होती. चंपारण्याच्या ज्या भूमीला भगवान बुद्धांच्या प्रवचनाचा आशिर्वाद मिळाला होता, जी भूमी सीता मातेचे पिता जनक यांच्या राज्याचा भाग होती; तिथले शेतकरी कठोर परिस्थितीचा सामना करत होते. गांधीजींनी केवळ चंपारण्यातील शेतकऱ्यांना, शोषितांना, पीडितांनाच मार्ग दाखविला नाही तर संपूर्ण देशाला हे दाखवून दिले की शांतीपूर्ण सत्याग्रामध्ये किती ताकत आहे.

चंपारण्य सत्याग्रहाची 100 वर्षे, पंतप्रधानांच्या हस्ते उद्या स्वच्छताग्रह प्रदर्शनाचे उद्‌घाटन

April 09th, 08:07 pm

चंपारण्य येथे सत्याग्रहाचा पहिला प्रयोग महात्मा गांधीजींनी केला, त्याला उद्या 100 वर्षे पूर्ण होत आहे, त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत “स्वच्छाग्रह – बापू को कार्यांजली – एक अभियान, एक प्रदर्शनी” या नावाच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे. राष्ट्रीय संग्रहालयातर्फे आयोजित “ऑनलाईन इंटरॲक्टिव्ह क्वीझ” या प्रश्नमंजुषा उपक्रमाचेही पंतप्रधान उद्या उद्‌घाटन करतील.