पंतप्रधांन नरेंद्र मोदींनी श्रीलंकेत दिकोया रुग्णालयाचे आज उद्घाटन केले

May 12th, 01:23 pm

पंतप्रधांन नरेंद्र मोदींनी, श्रीलंकेत भारताच्या मदतीने बांधलेल्या अत्त्याधुनिक दिकोया रुग्णालयाचे आज उद्घाटन केले. भारतीय वंशाच्या तमिळ समुदायापुढे बोलताना पंतप्रधांन म्हणाले की, “ जगात सुप्रसिद्ध असलेला सिलोन टी ह्या सुपीक जमिनीत होतो. ह्या प्रांतात जगातल्या सर्वात प्राचीन भाषांपैकी एक असणारी सिंहला भाषा बोलली जाते ही समाधानकारक गोष्ट आहे.” त्यांनी एकता आणि सलोख्याचे संबंध आणखी दृढ करण्याचे आवाहन केले.