पंतप्रधान मोदींना प्रदान करण्यात आलेले सर्वोच्च नागरी पुरस्कार
May 22nd, 12:14 pm
अनेक देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरव केला आहे. त्यांच्या या गौरवात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे आणि दूरदृष्टीचे प्रतिबिंब दिसून येते. या पुरस्कारांमुळे जागतिक स्तरावर होत असलेल्या भारताच्या उदयाला अधिक बळ मिळाले आहे. जगभरातील देशांबरोबर भारताचे वृद्धिंगत होत असलेले संबंधही त्यातून प्रतीत होतात.सेरावीक मध्ये पंतप्रधानांनी केलेले बीजभाषण
March 05th, 06:59 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सेरावीक 2021 मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बीजभाषण केले. त्यांना सेरावीक जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते म्हणाले, “मी अत्यंत नम्रतेने सेरावीक जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्कार स्वीकारतो. हा पुरस्कार मी आमची महान मातृभूमी, भारतातील लोकांना समर्पित करतो. पर्यावरणाची काळजी घेण्याचा मार्ग दाखवणाऱ्या आमच्या भूमीच्या गौरवशाली परंपरेला हा पुरस्कार मी अर्पण करतो.” शतकानुशतके पर्यावरणाची काळजी घेणारे भारतीय लोक हे नेते आहेत असे ते म्हणाले. आपल्या संस्कृतीत, निसर्ग आणि देवत्व यांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे असे ते म्हणाले.सेरावीक 2021 मध्ये पंतप्रधानांचे बीजभाषण
March 05th, 06:56 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सेरावीक 2021 मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बीजभाषण केले. त्यांना सेरावीक जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते म्हणाले, “मी अत्यंत नम्रतेने सेरावीक जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्कार स्वीकारतो. हा पुरस्कार मी आमची महान मातृभूमी, भारतातील लोकांना समर्पित करतो. पर्यावरणाची काळजी घेण्याचा मार्ग दाखवणाऱ्या आमच्या भूमीच्या गौरवशाली परंपरेला हा पुरस्कार मी अर्पण करतो.” शतकानुशतके पर्यावरणाची काळजी घेणारे भारतीय लोक हे नेते आहेत असे ते म्हणाले. आपल्या संस्कृतीत, निसर्ग आणि देवत्व यांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे असे ते म्हणाले.पंतप्रधान 5 मार्च रोजी केंब्रिज एनर्जी रिसर्च असोसिएट्स विकच्या जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्काराचा स्वीकार करतील आणि केंब्रिज एनर्जी रिसर्च असोसिएट्स वीक (CERAWeek) 2021 मध्ये बीजभाषण करतील
March 04th, 06:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंब्रिज एनर्जी रिसर्च असोसिएट्स वीक (CERAWeek) 2021 मध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सेरावीक ग्लोबल एनर्जी अँड एन्व्हायर्नमेन्ट लीडरशिप अवॉर्ड अर्थात जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्काराचा स्वीकार करतील आणि बीजभाषण करतील.