जयपूर येथील सीआयपीईटी : पेट्रोकेमिकल्स तंत्रज्ञान संस्थेच्या उद्‌घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

September 30th, 11:01 am

राजस्थानच्या भूमीचे सुपुत्र आणि भारताची सर्वात मोठी पंचायत, लोकसभेचे अभिरक्षक, आपले आदरणीय सभापती श्रीमान ओम बिर्ला जी, राजस्थाने मुख्यमंत्री अशोक गहलोत जी, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे इतर सहकारी, गजेंद्रसिंह शेखावत, भूपेंद्र यादव, अर्जुन राम मेघवाल, कैलाश चौधरी, डॉ. भारती पवार, भगवंत खुबा, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री भगिनी वसुंधरा राजे जी, विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया, राजस्थान सरकारमधले इतर मंत्रिवर्ग, खासदारवर्ग, आमदार, कार्यक्रमाला उपस्थित असलेले इतर सर्व महनीय आणि राजस्थानच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,

पंतप्रधानांनी जयपूर येथील सीआयपीईटी : पेट्रोकेमिकल्स तंत्रज्ञान संस्थेचे उद्‌घाटन केले

September 30th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सीआयपीईटी : पेट्रोकेमिकल्स तंत्रज्ञान संस्थेचे उद्‌घाटन केले. त्यांनी राजस्थानमधील बांसवाडा, सिरोही, हनुमानगढ आणि दौसा जिल्ह्यात चार नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची पायाभरणीही केली. 4 नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि सीआयपीईटी संस्थेबद्दल पंतप्रधानांनी राजस्थानच्या जनतेचे अभिनंदन केले. ते म्हणाले की 2014 नंतर केंद्र सरकारने राजस्थानसाठी 23 वैद्यकीय महाविद्यालये मंजूर केली आहेत आणि 7 वैद्यकीय महाविद्यालये आधीच कार्यरत झाली आहेत.