संविधान दिनानिमित्त संविधान सदनमध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान झाले सहभागी
November 26th, 02:46 pm
संविधान दिनानिमित्त संविधान सदन येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे पंतप्रधान मोदी यांनी प्रशंसा केली आणि ते अंतदृष्टी देणारे असल्याचे म्हटले आहे.पंतप्रधानांनी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात संसद सदस्यांना उद्देशून केलेले भाषण
September 19th, 11:50 am
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मी तुम्हाला आणि संपूर्ण देशाला हार्दिक शुभेच्छा देतो. आज, नवीन संसद भवनात आपण एकत्रितपणे उज्वल भविष्याच्या दिशेने एक नवीन प्रवास सुरू करत आहोत. आज, नवीन इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी आम्ही विकसित भारताप्रती आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करत आहोत आणि पूर्ण समर्पण तसेच दृढनिश्चयाने हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वतःला समर्पित करत आहोत. माननीय सदस्यांनो, ही इमारत आणि विशेषतः हे केंद्रीय सभागृह आपल्या भावनांनी ओतप्रोत आहे. हे सभागृह गहन भावना जागृत करते आणि सोबतच आम्हाला आपल्या कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित देखील करते. स्वातंत्र्यापूर्वी, ही वास्तू एक प्रकारचे वाचनालय म्हणून वापरली जात होते. परंतु स्वातंत्र्यानंतर, ती संविधान सभांच्या सभांचे ठिकाण बनली. इथेच आयोजित बैठकांमध्ये आपल्या राज्यघटनेवर बारकाईने विचार केला गेला आणि आजच्या संविधानाने आकार घेतला. याच वास्तूत ब्रिटिश सरकारने भारताकडे सत्ता हस्तांतरित केली. या हस्तांतरणाचा केंद्रीय सभागृह साक्षीदार आहे. याच केंद्रीय सभागृहात भारतीय तिरंग्याला स्विकृती देण्यात आली आणि आपले राष्ट्रगीत स्वीकारण्यात आले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही दोन्ही सभागृहे या केंद्रीय सभागृहात अनेक ऐतिहासिक प्रसंगी चर्चा करण्यासाठी, सहमती दर्शवण्यासाठी आणि भारताच्या भविष्याला आकार देणारे निर्णय घेण्यासाठी एकत्र आली आहेत.विशेष अधिवेशनात संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात पंतप्रधानांचे खासदारांना संबोधन
September 19th, 11:30 am
सभागृहात उपस्थितांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देऊन पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. नव्या संसद भवनात कामकाजाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. “भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या संकल्प आणि निश्चयासह आपण नव्या संसद भवनात चाललो आहोत,” असे पंतप्रधान म्हणाले.