पंतप्रधानांनी नवी दिल्लीत प्रगती मैदानात भारत मंडपम येथे अखिल भारतीय शिक्षण समागम कार्यक्रमात केलेले भाषण

July 29th, 11:30 am

शिक्षण ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये देशाला सफल करण्याची, देशाचे भाग्य बदलण्याची, ज्यामध्ये सर्वाधिक ताकद आहे ते म्हणजे शिक्षणच. एकविसाव्या शतकातील भारत, जी उद्दिष्टे घेऊन पुढे जात आहे त्यात आपल्या शिक्षण व्यवस्थेचं महत्त्व खूप आहे. आपण सर्व या व्यवस्थेचे प्रतिनिधी आहात, ध्वजवाहक आहात. म्हणूनच ‘अखिल भारतीय शिक्षण समागम’ चा भाग व्हायला मिळाले हा माझ्यासाठीसुद्धा महत्त्वाचा क्षण आहे.

पंतप्रधानांनी दिल्लीतील भारत मंडपम् येथे अखिल भारतीय शिक्षा समागमचे केले उद्घाटन

July 29th, 10:45 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत भारत मंडपम् येथे अखिल भारतीय शिक्षा समागम् चे उद्घाटन केले. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या औचित्याने या कार्यक्रमाचे आयोजन झाले. यावेळी त्यांनी पीएम श्री या योजनेचा पहिला हप्ता देखील जारी केला. 6207 शाळांना एकूण 630 कोटी रुपयांचा पहिला हप्ता मिळाला. यावेळी त्यांना 12 भारतीय भाषांमध्ये भाषांतरित झालेल्या शिक्षण आणि कौशल्यविषयक पुस्तकांचे देखील प्रकाशन केले. तसेच यावेळी आयोजित करण्या आलेल्या प्रदर्शनाच्या ठिकाणी फेरफटका मारून पाहणी केली.

सीबीएसई बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्‍यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

May 12th, 04:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीएसई बारावीच्या परीक्षेत यशस्वीपणे उत्तीर्ण झालेल्या सर्व #ExamWarriors चे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान 7 सप्टेंबर रोजी शिक्षक पर्वच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करणार

September 05th, 02:32 pm

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 7 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शिक्षक पर्वच्या उद्घाटन कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान ते शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रमुख उपक्रमांचाही प्रारंभ करतील. भारतीय सांकेतिक भाषा शब्दकोश (श्रवणदोष असलेल्यांसाठी ध्वनी आणि मजकूर अंतर्भूत असलेली सांकेतिक भाषा चित्रफीत ,शिकण्याच्या सार्वत्रिक रचनेच्या अनुरूप), बोलणारी पुस्तके (दृष्टिहीनांसाठी ध्वनी पुस्तके), सीबीएसईचा शालेय गुणवत्ता हमी आणि मूल्यांकन आराखडा ,निपुण भारत आणि विद्यांजली पोर्टलसाठी निष्ठा (NISHTHA) शिक्षकांचा प्रशिक्षण कार्यक्रम (शालेय विकासासाठी शिक्षण स्वयंसेवक/ देणगीदार/ सामाजिक उत्तरदायित्व योगदान देणाऱ्यांच्या सोयीसाठी) आदींचे पंतप्रधान उद्घाटन करतील. गुणवत्ता आणि शाश्वत शाळा: भारतातील शाळांमधील शिक्षण ही 'शिक्षक पर्व -2021' ची संकल्पना आहे. सर्व स्तरांवर केवळ शिक्षणाच्या सातत्यासह देशभरातील शाळांमध्ये गुणवत्ता, सर्वसमावेशक पद्धती आणि शाश्वत सुधारणा सुनिश्चित करण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धतींना हा शिक्षण पर्व उत्सव प्रोत्साहन देईल . या कार्यक्रमाला केंद्रीय शिक्षण मंत्री आणि केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री देखील उपस्थित राहतील.

इयत्ता दहावी यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे केले अभिनंदन

August 03rd, 09:11 pm

इयत्ता दहावी यशस्वीपणे उत्तीर्ण केल्याबदद्ल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ-सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सीबीएसई परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्याबद्दल इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

July 30th, 04:04 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीएसई परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्याबद्दल बारावीच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांना युवा मित्र म्हणून संबोधित करत पंतप्रधानांनी त्यांना उज्ज्वल, आनंदी आणि निरोगी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

इयत्ता बारावीचे विद्यार्थी आणि पालक यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अचानक साधलेला संवाद

June 03rd, 09:42 pm

मोदीजी: बरं, मी तर अगदी अचानक तुमच्यामध्ये सहभागी झालो आहे. मात्र तुम्हा मंडळींना ‘डिस्टर्ब’ करावं, असं मला काही वाटत नाही. कारण तुम्ही अतिशय हसत-मजेत अगदी खेळकर वातावरण अनुभवत आहात आणि मला वाटायला लागलंय की, तुम्हा लोकांना परीक्षेचा तणाव आता अजिबातच नाहीए. त्यामुळंही तुमच्या आनंदाला पारावार उरलेला नाही, असंही दिसून येत होतं. दुसरं म्हणजे घरामध्ये बंद असल्यामुळे ऑनलाईन कॅलरी बर्न कशा प्रकारे करता येतात, हेही तुम्ही शिकला आहात.

इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या आभासी सत्रामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत पंतप्रधानांनी दिला आश्चर्याचा सुखद धक्का

June 03rd, 09:41 pm

शिक्षण मंत्रालयाच्या वतीने इयत्ता 12 वीचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्यासाठी आयोजित केलेल्या आभासी सत्रामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी आश्चर्याचा सुखद धक्का दिला. सीबीएसईच्या 12 वीच्या परीक्षा रद्द केल्याच्या दृष्टिकोनातून शिक्षण मंत्रालयाने हे सत्र आयोजित केले होते. पंतप्रधानांनी आपल्या बोलण्याची सुरुवात करताना सांगितले की, “आशा आहे की मी तुमच्या ऑनलाईन चर्चेत व्यत्यय आणलेला नाही” यामुळे पंतप्रधान आपल्यामध्ये आश्चर्यकारकरित्या सहभागी झाल्याचे पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. त्यानंतर श्री. मोदी यांनी, परीक्षेचा दबाव नसलेल्या आणि परीक्षेपासून सुटका झाल्यामुळे आरामात असलेल्या विद्यार्थ्यांसमवेत हलकेफुलके क्षण व्यतीत केले. त्यांनी वैयक्तिक किस्से सांगून विद्यार्थ्यांना चिंतामुक्त केले. जेव्हा पंचकुला येथील एका विद्यार्थ्याने गेल्या अनेक दिवसांपासून असलेल्या परीक्षेच्या ताणतणावाबद्दल सांगितले, तेव्हा पंतप्रधानांनी त्याला त्याच्या निवासस्थानाच्या क्षेत्राबद्दल विचारले आणि सांगितले की, ते ही बराच काळ या क्षेत्रामध्ये राहिले आहेत.

पंतप्रधानांनी इयत्ता 12 वीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी साधला संवाद

June 03rd, 06:15 pm

आश्चर्याचा सुखद धक्का देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीएसईच्या इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला. शिक्षण मंत्रालयाने हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि विद्यार्थ्यांचे पालक देखील या कार्यक्रमात उपस्थित होते.

सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द

June 01st, 07:25 pm

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या वर्गांच्या परीक्षांसंबंधीची पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा बैठक झाली. याविषयाबाबत झालेल्या सविस्तर चर्चा तसेच राज्य सरकारे आणि आणि इतर संबंधितांची मत मतांतरे याबद्दल एक दृक्श्राव्य सादरीकरण यावेळी अधिकाऱ्यांकडून करण्यात आले.

Prime Minister wishes Students, Parents and Teachers

February 15th, 08:48 pm

Prime Minister Shri Narendra Modi has expressed his best wishes to students appearing for CBSE Board Exams, their parents and teachers.

आपली संस्कृती, परंपरा आणि भाषा संपूर्ण जगाला विविधतेतील एकतेचा संदेश देतातः मन की बातमध्ये पंतप्रधान

November 24th, 11:30 am

‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ कॅम्प सर्वात चांगला अनुभव होता. हा कॅम्प ऑगस्टमध्ये झाला होता आणि त्याला नॉर्थ इस्ट रिजन म्हणजेच ईशान्य प्रदेशातील छात्रपण आले होते. त्या छात्रसैनिकांबरोबर आम्ही दहा दिवस राहिलो. आम्ही त्यांच्या जीवनशैली विषयी जाणून घेतले.. आम्ही पाहिलं की त्यांची भाषा कशी आहे, त्यांची परंपरा कशी आहे, त्यांची संस्कृती कशी आहे.. अशा अनेक गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या जसं, त्या भाषेत नमस्कार ला काय म्हणतात? तसेच आमचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला होता तेव्हा त्यांनी आम्हाला आपले नृत्य शिकवले.

Social Media Corner 14th December

December 14th, 07:21 pm

Your daily dose of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!

PMs statement on Gearing up for the 3rd India Africa Forum Summit 2015

October 17th, 06:31 pm



PM congratulates the students, who passed CBSE Class X exams

May 28th, 05:10 pm



PM congratulates students who successfully passed the CBSE Class XII Board Exam

May 25th, 05:56 pm



Narendra Modi congratulates students who cleared CBSE exams

May 29th, 12:40 pm

Narendra Modi congratulates students who cleared CBSE exams