The BJP government in Gujarat has prioritised water from the very beginning: PM Modi in Amreli

October 28th, 04:00 pm

PM Modi laid the foundation stone and inaugurated various development projects worth over Rs 4,900 crores in Amreli, Gujarat. The Prime Minister highlighted Gujarat's remarkable progress over the past two decades in ensuring water reaches every household and farm, setting an example for the entire nation. He said that the state's continuous efforts to provide water to every corner are ongoing and today's projects will further benefit millions of people in the region.

PM Modi lays foundation stone and inaugurates various development projects worth over Rs 4,900 crore in Amreli, Gujarat

October 28th, 03:30 pm

PM Modi laid the foundation stone and inaugurated various development projects worth over Rs 4,900 crores in Amreli, Gujarat. The Prime Minister highlighted Gujarat's remarkable progress over the past two decades in ensuring water reaches every household and farm, setting an example for the entire nation. He said that the state's continuous efforts to provide water to every corner are ongoing and today's projects will further benefit millions of people in the region.

'मन की बात'चे श्रोते हेच या कार्यक्रमाचे खरे आधारस्तंभ: पंतप्रधान मोदी

September 29th, 11:30 am

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा एकत्र येण्याची संधी मिळाली आहे. आजचा हा भाग मला भावूक करणारा आहे, अनेक जुन्या आठवणी माझ्याभोवती रुंजी घालत आहेत याचं कारण असं की आपल्या या ‘मन की बात’ च्या प्रवासाला आता 10 वर्षे पूर्ण होत आहेत.दहा वर्षांपूर्वी 3 ऑक्टोबर रोजी, विजयादशमीच्या दिवशी ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. आणि पवित्र योगायोग असा की या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी ‘मन की बात’ ला 10 वर्षे पूर्ण होतील तेव्हा नवरात्रीचा पहिला दिवस असेल. ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या वाटचालीत असे अनेक प्रसंग आले आहेत ज्यांना मी कधीच विसरू शकत नाही. ‘मन की बात’ कार्यक्रमाचे कोट्यवधी श्रोते, आपल्या या प्रवासातील असे सहकारी आहेत ज्यांचा सहयोग मला निरंतर लाभत राहिला आहे. देशाच्या काना-कोपऱ्यातून त्यांनी मला माहिती उपलब्ध करून दिली. ‘मन की बात’चे श्रोतेच या कार्यक्रमाचे खरे सूत्रधार आहेत. सहसा असं मानलं जातं की जोपर्यंत एखाद्या कार्यक्रमात चटपटीत बाबींची चर्चा नसेल किंवा काही नकारात्मक बाबी समाविष्ट नसतील तर अशा कार्यक्रमाकडे श्रोते फारसे लक्ष देत नाहीत. पण ‘मन की बात’ या कार्यक्रमाने हे सिध्द करून दाखवले आहे की देशातील लोकांना सकारात्मक माहितीची किती ओढ आहे. सकारात्मक विचार, प्रेरणात्मक उदाहरणे, धैर्य वाढवणाऱ्या कहाण्या लोकांना फारच आवडतात. ‘चकोर’ नावाच्या पक्षाबद्दल असं म्हटलं जातं की तो पक्षी फक्त आकाशातून पडणारे पावसाचे थेंबच पितो. ‘मन की बात’ या कार्यक्रमात आपण पाहिलं की लोक देखील तशाच प्रकारे, चकोर पक्ष्याप्रमाणेच देशाची कामगिरी इतरांच्या सामुहिक यशोगाथा अत्यंत अभिमानाने ऐकतात. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 10 वर्षांच्या वाटचालीने एक अशी श्रुंखला तयार केली आहे ज्याच्या प्रत्येक भागात नव्या कहाण्या, नव्या सफलतेच्या गाथा आणि नवी व्यक्तिमत्वे यांची ओळख होते.आपल्या समाजात सामुदायिकतेच्या भावनेने जे जे कार्य केलं जात आहे त्या कार्याचा ‘मन की बात’ मध्ये गौरव केला जातो. जेव्हा मी ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी आलेली लोकांची पत्रे वाचतो तेव्हा माझं मन देखील अभिमानाने फुलून येतं. आपल्या देशात कितीतरी प्रतिभावंत आहेत आणि त्यांच्यामध्ये देश आणि समाजाची सेवा करण्याची उत्कट इच्छा आहे. असे लोक निःस्वार्थ भावनेनं सेवा करण्यात स्वतःचं संपूर्ण जीवन समर्पित करतात. अशा लोकांचं कार्य जाणून घेतल्यानंतर माझ्यात देखील उर्जेचा संचार होतो. ‘मन की बात’ ची ही संपूर्ण प्रक्रिया माझ्यासाठी एखाद्या मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेण्याप्रमाणे आहे. ‘मन की बात’ मधील प्रत्येक विषय, प्रत्येक घटना आणि प्रत्येक पत्राची मी आठवण काढतो तेव्हा असं वाटतं की माझ्यासाठी देवाचं रूप असलेली ही सर्वसामान्य जनता, तिचं जणूकाही दर्शन मी घेत आहे.

No power can stop the country whose youth is moving ahead with the resolve of Nation First: PM Modi

January 28th, 01:37 pm

Prime Minister Narendra Modi addressed the National Cadet Corps Rally at Cariappa Ground in New Delhi. The PM talked about the steps being taken to strengthen the NCC in the country in a period when the country is moving forward with new resolutions. He elaborated on the steps being taken to open the doors of the defence establishments for girls and women.

पंतप्रधानांनी करिअप्पा मैदान येथे राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) मेळाव्याला संबोधित केले

January 28th, 01:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज करिअप्पा मैदानावर राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) मेळाव्याला संबोधित केले. पंतप्रधानांनी मानवंदना स्वीकारली, एनसीसीच्या तुकड्यांनी केलेल्या मार्च पास्टचे निरीक्षण केले. यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रसैनिकांनी लष्करी कारवाई, स्लिथरिंग, मायक्रोलाइट फ्लाइंग, पॅरासेलिंग तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामधून आपले कौशल्य दाखवले. सर्वोत्कृष्ट छात्रसैनिकांना पंतप्रधानांच्या हस्ते पदक आणि बॅटनही देऊन गौरवण्यात आले.

छोट्या प्रयत्नांतूनच मोठे बदल घडतातः पंतप्रधान मोदी

September 26th, 11:30 am

आता अशी परंपरा तर नाही राहिली पण पूर्वीच्या काळी अशी परंपरा होती की घरात जरी स्नान करत असलो तरी नद्यांचे स्मरण करण्याची परंपरा, भलेही आज लुप्त झाली असेल किंवा क्वचितच कुठे अगदी लहान प्रमाणात, उरली असेल. पण एक खूप मोठी परंपरा होती जी प्रातःकाळी स्नान करतानाच विशाल भारताची एक यात्रा घडवत असे, मानसिक यात्रा!

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

June 05th, 11:05 am

केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी नितीन गडकरी जी, नरेंद्र सिंह तोमर जी, प्रकाश जावडेकर जी, पीयूष गोयल जी, धमेंद्र प्रधान जी, गुजरातमधल्या खेडा इथले खासदार देवुसिंग जेसिंगभाई चैहान जी, उत्तर प्रदेशमधल्या हरदोईचे खासदार जयप्रकाश रावत जी, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ जी, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या महापौर भगिनी उषा जी, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले इतर मान्यवर आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,

जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमात पंतप्रधानांचे मार्गदर्शन

June 05th, 11:04 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त केले. सेंद्रीय शेती आणि कृषी क्षेत्रात बायोइंधनाचा वापर याबाबत पुण्यामधील एका शेतकऱ्याचे अनुभव पंतप्रधानांनी जाणून घेतले.

‘‘कॅच द रेन’’ मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

March 22nd, 12:06 pm

जागतिक जल दिनाचे औचित्य साधत ‘जल शक्ती अभियान: कॅच द रेन’ अर्थात ‘वर्षा जल संचय’ अभियानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूर दृश्य प्रणाली द्वारे शुभारंभ केला. केन बेतवा जोड प्रकल्प या, नद्या जोडण्यासाठीच्या राष्ट्रीय दृष्टीकोन आराखड्याच्या पहिल्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी, पंतप्रधानांच्या उपस्थितीत केंद्रीय जल शक्ती मंत्रालय, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. राजस्थान, उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांचे सरपंच आणि वॉर्ड पंच यांच्याशी पंतप्रधानांनी संवाद साधला.

जागतिक जल दिनाचे औचित्य साधत ‘जल शक्ती अभियान: वर्षा जल संचय’ अभियानाचा पंतप्रधानांनी केला प्रारंभ

March 22nd, 12:05 pm

जागतिक जल दिनाचे औचित्य साधत ‘जल शक्ती अभियान: कॅच द रेन’ अर्थात ‘वर्षा जल संचय’ अभियानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूर दृश्य प्रणाली द्वारे शुभारंभ केला. केन बेतवा जोड प्रकल्प या, नद्या जोडण्यासाठीच्या राष्ट्रीय दृष्टीकोन आराखड्याच्या पहिल्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी, पंतप्रधानांच्या उपस्थितीत केंद्रीय जल शक्ती मंत्रालय, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. राजस्थान, उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांचे सरपंच आणि वॉर्ड पंच यांच्याशी पंतप्रधानांनी संवाद साधला.

पंतप्रधान 22 मार्च रोजी ‘जल शक्ती अभियान: कॅच द रेन’ अर्थात वर्षासंचय या अभियानाचे उद्घाटन करणार

March 21st, 12:54 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक जल दिनाच्या दिवशी म्हणजेच 22 मार्च 2021 रोजी दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ‘जलशक्ती अभियान: कॅच द रेन’ अर्थात वर्षासंचय या अभियानाचे उद्घाटन करणार आहेत. नद्या जोडणीचा राष्ट्रीय दृष्टीकोन योजनेचा पहिला प्रकल्प केन बेतवा लिंक प्रकल्प राबविण्यासाठी पंतप्रधानांच्या उपस्थितीत केंद्रीय जलशक्ती मंत्री आणि मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांदरम्यान ऐतिहासिक करारनाम्यावर स्वाक्षऱ्या देखील होतील.