केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली मेट्रो टप्पा-IV प्रकल्पाच्या रिठाला-कुंडली कॉरिडॉरला मंजुरी दिली
December 06th, 08:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली मेट्रोच्या टप्पा - IV प्रकल्पाच्या रिठाला - नरेला - नाथुपूर (कुंडली) या 26.463 किलोमीटर कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे,ज्यामुळे राष्ट्रीय राजधानी आणि शेजारील हरियाणा यांच्यातील संचारसंपर्क आणखी वाढेल.हा कॉरिडॉर मंजूर झाल्यापासून 4 वर्षात पूर्ण होणार आहे.देशातील ज्या जिल्ह्यांमध्ये नवोदय विद्यालये नाहीत, अशा 28 जिल्ह्यांमध्ये नवोदय विद्यालये स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
December 06th, 08:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या आर्थिकविषयक व्यवहार समितीने नवोदय विद्यालय योजने (केंद्रीय क्षेत्र योजना) अंतर्गत देशात ज्या जिल्ह्यांमध्ये नवोदय विद्यालये नाहीत, अशा 28 जिल्ह्यांमध्ये ती स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. या सूची मध्ये महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे.देशात नव्याने स्थापण्यात येणाऱ्या 28 नवोदय विद्यालयांची सूची जोडण्यात आली आहे.देशभरात नागरी/संरक्षण क्षेत्रां अंतर्गत 85 नवीन केंद्रीय विद्यालये (KVs) उघडण्यास आणि सर्व वर्गांमध्ये 2 अतिरिक्त विभाग जोडून विद्यमान एक KV म्हणजेच KV शिवमोग्गा, कर्नाटकच्या विस्तारास, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
December 06th, 08:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली, मंत्रिमंडळाच्या आर्थिक घडामोडी विषयक समितीने, देशभरात नागरी/संरक्षण क्षेत्रा अंतर्गत 85 नवीन केंद्रीय विद्यालये (KVs) उघडायला आणि कर्नाटकात शिवमोग्गा जिल्ह्यात विद्यमान एक KV चा विस्तार करायला मान्यता दिली आहे.केंद्रीय विद्यालय योजना (केंद्रीय क्षेत्र योजना) अंतर्गत सर्व वर्गांमध्ये दोन अतिरिक्त विभाग जोडून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची वाढलेली संख्या सामावून घेण्यासाठी, हा निर्णय घेण्यात आला आहे . या 86 केंद्रीय विद्यालयांची यादी सोबत जोडली आहे.भारतीय रेल्वेच्या तीन ‘मल्टीट्रॅकिंग’ प्रकल्पांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी : संपर्क यंत्रणा प्रदान करणे , प्रवास सुलभ करणे,वाहतूक खर्च कमी करणे, तेल आयात कमी करणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे उद्दिष्ट्य
November 25th, 08:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीची आज बैठक झाली. यामध्ये रेल्वे मंत्रालयाच्या एकूण अंदाजे 7,927 कोटी रूपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.अटल इनोव्हेशन मिशन सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
November 25th, 08:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने नीती आयोगाच्या अखत्यारीतील अटल इनोव्हेशन मिशन (AIM) या प्रमुख उपक्रमाला कामाच्या वाढीव व्याप्तीसह आणि 2,750 कोटी रुपये तरतुदीसह 31 मार्च 2028 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाची वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजनेला मंजुरी
November 25th, 08:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने विद्वत्तायुक्त संशोधन लेख आणि पत्रिका प्रकाशनांची देशव्यापी उपलब्धता निर्माण करणाऱ्या वन नेशन वन सबस्क्रिप्शन या केंद्रीय योजनेला मंजुरी दिली. एका साध्या, वापरकर्ता स्नेही आणि संपूर्णपणे डिजिटल प्रक्रियेद्वारे ही योजना राबवली जाईल. सरकारी उच्च शिक्षण संस्था आणि केंद्र सरकारच्या संशोधन आणि विकास प्रयोगशाळांसाठी ही एक ‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ सुविधा असेल. वन नेशन वन सबस्क्रिप्शनसाठी 2025,2026 आणि 2027 या तीन कॅलेंडर वर्षांकरिता एक नवी केंद्रीय योजना म्हणून सुमारे 6,000 कोटी रुपयांची एकूण तरतूद केली आहे. वन नेशन वन सबस्क्रिप्शन भारतातील तरुणांना दर्जेदार उच्च शिक्षण जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी, शिक्षण क्षेत्रात गेल्या दशकभरात भारत सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमांची व्याप्ती आणि पोहोच वाढवेल. यामुळे संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी आणि संशोधनाची आणि नवोन्मेषाची संस्कृती सरकारी विद्यापीठे, महाविद्यालये, संशोधन संस्था आणि संशोधन आणि विकास प्रयोगशाळा या सर्वच ठिकाणी निर्माण करण्यासाठी हाती घेतलेल्या एएनआरएफ उपक्रमाला पूरक बळ मिळेल.नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय मिशनचा शुभारंभ
November 25th, 08:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालया अंतर्गत, केंद्र प्रायोजित स्वतंत्र योजना म्हणून, नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग (एनएमएनएफ), अर्थात नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय मिशनचा शुभारंभ करायला मंजुरी दिली.भारतीय अन्न महामंडळात 2024 -25 आर्थिक वर्षात 10,700 कोटी रुपयांच्या समभाग गुंतवणूकीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
November 06th, 03:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली.या बैठकीत आर्थिक व्यवहार विषयक समितीने भारतीय अन्न महामंडळाला (FCI) खेळते भांडवल उपलब्ध होण्यासाठी 2024 - 25 या आर्थिक वर्षात 10,700 कोटी रुपये इतक्या समभाग गुंतवणूकीला मान्यता दिली आहे.कृषी क्षेत्राला चालना देता यावी तसेच देशभरातील शेतकऱ्यांचे कल्याण सुनिश्चित करता यावे, या उद्देशाने मंत्रिमडळाने या निर्णयाला मान्यता दिली.केंद्र सरकार सरकारने उचललेल्या या धोरणात्मक पावलामुळे,सरकार शेतकऱ्यांना पाठबळ देण्याच्या दृष्टीने तसेच भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सरकारची वचनबद्धता दृढ असल्याचे दिसून येते.प्रतिभावान विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षण घेताना येणाऱ्या आर्थिक अडचणी टाळण्यासाठी पीएम-विद्यालक्ष्मी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
November 06th, 03:14 pm
प्रतिभावान विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षण मिळवण्यात आर्थिक अडचणी येऊ नयेत म्हणून आर्थिक पाठबळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम-विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी दिली आहे. पीएम विद्यालक्ष्मी हा राष्ट्रीय शिक्षण धोरण, 2020 चा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आहे, ज्या धोरणात प्रतिभावान विद्यार्थ्यांना सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी विविध उपायांच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जावे, अशी शिफारस करण्यात आली होती. ज्या विद्यार्थ्याला दर्जेदार उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळेल तो विद्यार्थी, त्याच्या अभ्यासक्रमाचे शुल्क आणि या अभ्यासक्रमाशी संबंधित इतर खर्चाची गरज भागवण्यासाठी पीएम विद्यालक्ष्मी योजने अंतर्गत कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्थांमधून तारण विरहित, हमीदार विरहित कर्ज मिळवण्यासाठी पात्र असेल. एका साध्या, पारदर्शक, विद्यार्थी स्नेही प्रणालीच्या माध्यमातून राबवली जाणारी ही योजना आंतर-परिचालनक्षम आणि संपूर्णपणे डिजिटल असेल.IN-SPACE च्या देखरेखीखाली अंतराळ क्षेत्रासाठी 1,000 कोटी रुपयांचा व्हेंचर कॅपिटल फंड स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
October 24th, 03:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने इन-स्पेस (IN-SPACE) च्या देखरेखीखाली, अंतराळ क्षेत्रासाठी समर्पित 1000 कोटी व्हेंचर कॅपिटल फंड स्थापन करायला मंजुरी दिली.केंद्रीय मंत्रिमंडळाने 6,798 कोटी रुपये अंदाजे खर्चाच्या दोन रेल्वे प्रकल्पांना दिली मंजुरी
October 24th, 03:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने रेल्वे मंत्रालयाच्या एकूण 6,798 कोटी रुपये (अंदाजे) खर्चाच्या दोन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याच्या तीन टक्के अतिरिक्त हप्ता आणि निवृत्तिवेतनधारकांना महागाई दिलासा देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
October 16th, 03:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा (डीए) अतिरिक्त हप्ता आणि निवृत्तिवेतनधारकांना महागाई दिलासा (डीआर) मंजूर केला आहे. दिनांक 01.07.2024 पासून हे लागू असून भाववाढीची भरपाई करण्यासाठी जाहीर करण्यात आलेली ही सवलत मूळ वेतन/निवृत्तिवेतनाच्या 50% च्या विद्यमान दरापेक्षा तीन टक्के (3%) वाढ दर्शविते.वाराणसी - पंडित दीनदयाळ उपाध्याय (DDU) जंक्शन रेल्वे मार्गावर अतिरिक्त रेल्वे मार्गिका उभारण्यासह, गंगा नदीवरील नवीन रेल्वे तसेच रस्ते मार्ग पूल (rail-cum-road bridge) उभारण्याच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
October 16th, 03:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत रेल्वे मंत्रालयाद्वारे प्रस्तावित 2,642 कोटी रुपये (अंदाजे) इतक्या एकूण अंदाजित खर्चाच्या एका प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. आज मंजुरी दिलेला प्रस्तावित प्रकल्प बहुपदरी - मार्गिकांविषयीचा (multi - tracking) असून, या प्रकल्पामुळे रेल्वेचे परिचालन सुलभ होणार असून, त्यामुळे गर्दीचे प्रमाणही कमी होऊ शकणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत भारतीय रेल्वेमार्गावरील सर्वाधिक वर्दळ असलेल्या विभागांमधील आवश्यक पायाभूत सोयी सुविधांचा विकास केला जाणार आहे. हा प्रकल्प उत्तर प्रदेशातील वाराणसी आणि चंदौली जिल्ह्यांतर्गत राबवला जाणार आहे.विपणन हंगाम 2025-26 साठी रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत मूल्याला (एमएसपी) केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
October 16th, 03:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडी विषयक मंत्रिमंडळ समितीने (CCEA) विपणन हंगाम 2025-26 मध्ये सर्व अनिवार्य रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत मूल्यात (एमएसपी) वाढ करायला मंजुरी दिली.प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणि इतर कल्याणकारी योजना अंतर्गत पोषणमूल्ययुक्त तांदळाचा मोफत पुरवठा जुलै, 2024 ते डिसेंबर 2028 या कालावधीत सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
October 09th, 03:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणि इतर कल्याणकारी योजनासह सरकारच्या सर्व योजनांअंतर्गत पोषणमूल्ययुक्त तांदळाचा सार्वत्रिक पुरवठा सध्याच्या स्वरूपात जुलै 2024 ते डिसेंबर 2028 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे.चंद्र आणि मंगळ मोहिमेपाठोपाठ भारताची शुक्र ग्रहाची वैज्ञानिक अभ्यास मोहीम
September 18th, 04:37 pm
शुक्र, हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह असून, पृथ्वीच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत ठरलेली परिस्थिती या ग्रहाच्या उत्पत्ती मागे देखील असल्याचे समजले जाते, तसेच ग्रहांवरील वातावरण अतिशय वेगळ्या पद्धतीने कसे विकसित होऊ शकते हे जाणून घेण्याची अनोखी संधी देतो.भारत पुन्हा चंद्रावर उतरणार: यावेळी चंद्रावर उतरून पुन्हा पृथ्वीवर परतण्याची मोहीम
September 18th, 04:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने चांद्रयान-4 या मोहिमेला मंजुरी दिली आहे. चंद्रावर यशस्वीरीत्या उतरल्यावर पृथ्वीवर परतण्यात वापरलेले तंत्रज्ञान प्रदर्शित करणे तसेच चंद्रावरून नमुने आणून पृथ्वीवर त्यांचे विश्लेषण करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. चांद्रयान-4 मोहीम भारताच्या चंद्रावर उतरण्यासाठी (वर्ष 2040 पर्यंत नियोजित) आणि पृथ्वीवर सुरक्षित परतण्यासाठी मूलभूत तंत्रज्ञान क्षमता प्राप्त करेल. डॉकिंग/अनडॉकिंग, लँडिंग, पृथ्वीवर सुरक्षित परतणे आणि चंद्रावरील नमुना संकलन आणि विश्लेषण पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमुख तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवले जाईल.देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याबाबत उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी मंत्रिमंडळाने स्वीकारल्या
September 18th, 04:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या एकाचवेळी निवडणुका घेण्याबाबतच्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी स्वीकारल्या आहेत.माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र मोठी झेप घेण्यासाठी सज्ज
September 18th, 04:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने कंपनी कायदा 2013 अंतर्गत, कलम 8 कंपनी म्हणून भारतात ऍनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्स्टेंडेड रिॲलिटी (AVGC-XR) साठी नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स (एनसीओई), अर्थात राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राची स्थापना करायला मान्यता दिली. यामध्ये भारतीय वाणिज्य आणि उद्योग संघटना आणि भारतीय उद्योग महासंघ भारत सरकारचे भागीदार म्हणून उद्योग संस्थांचे प्रतिनिधित्व करतील. भारतात मुंबईमध्ये एनसीओई ची स्थापना केली जाईल. हा निर्णय, देशात AVGC टास्क फोर्स (कृती दल) स्थापन करण्याबाबत केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्र्यांनी 2022-23 साठीच्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेला अनुसरून आहे.जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगत संशोधन आणि विकासाला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने केंद्रीय मंत्रिमंडळाची बायो राईड योजनेला मंजुरी
September 18th, 03:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने जैवतंत्रज्ञान विभागाच्या दोन योजनांचे विलीनीकरण करून ‘जैवतंत्रज्ञान संशोधन नवकल्पना आणि उद्योजकता विकास (बायो-राइड)’ या योजनेला जैव-उत्पादन आणि जैव-प्रक्रिया या नवीन घटकांसह मंजुरी दिली.