पंतप्रधानांनी गुजरातमधील गांधीनगर येथे “जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष” शिखर परिषदेत केलेल्या भाषणाचा मजकूर

पंतप्रधानांनी गुजरातमधील गांधीनगर येथे “जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष” शिखर परिषदेत केलेल्या भाषणाचा मजकूर

April 20th, 03:53 pm

मॉरिशसचे आदरणीय पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस, गुजरातचे उत्साही मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी सर्बानंद सोनोवाल, मनसुख भाई मांडविया, महेंद्रभाई मुंजपरा, देश-विदेशातील सर्व राजनैतिक अधिकारी, शास्त्रज्ञ, उद्योजक आणि तज्ञ, आणि सभ्य स्त्री-पुरुषांनो !

पंतप्रधानांनी गांधीनगरमध्ये “जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष” शिखर परिषदेचे केले उद्‌घाटन

पंतप्रधानांनी गांधीनगरमध्ये “जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष” शिखर परिषदेचे केले उद्‌घाटन

April 20th, 11:01 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषदेचे उद्‌घाटन केले. यावेळी मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ आणि जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) महासंचालक डॉ. टेड्रोस गेब्रेयसस उपस्थित होते. केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडविया, सर्वानंद सोनोवाल, मुंजपारा महेंद्रभाई आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल हे देखील यावेळी उपस्थित होते. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत सुमारे 90 प्रख्यात वक्ते आणि 100 प्रतिनिधींसह 5 पूर्ण सत्रे, 8 गोलमेज, 6 कार्यशाळा आणि 2 परिसंवाद होणार आहेत. ही परिषद, गुंतवणुकीची क्षमता वृद्धी करण्यात मदत करेल आणि नवकल्पना, संशोधन आणि विकास, स्टार्ट-अप परिसंस्था तसेच आरोग्यदायी उद्योगाला चालना देईल. उद्योगातील नेतृत्व, शिक्षणतज्ज्ञ आणि विद्वानांना एकत्र आणण्यास ही परिषद मदत करेल तसेच भविष्यातील सहकार्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल.

ग्राहक हक्क संरक्षणविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेतील पंतप्रधानांच्या भाषणातील निवडक उतारे

ग्राहक हक्क संरक्षणविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेतील पंतप्रधानांच्या भाषणातील निवडक उतारे

October 26th, 10:43 am

मंत्रिमडळातील माझे सहकारी राम विलास पासवान, सी. आर. चौधरी, UNCTAD चे सरचिटणीस डॉ. मुखीसा किटूयी आणि येथे उपस्थित इतर मान्यवर,