महाराष्ट्रातील 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा प्रारंभ करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 19th, 05:00 pm
नवरात्रीचा पवित्र उत्सव सुरु आहे. आज नवरात्रीचा पाचवा दिवस असून या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. प्रत्येक आई तिच्या मुलांना सुख आणि यश लाभो अशी प्रार्थना करते. सुख आणि यशाची प्राप्ति केवळ शिक्षण आणि कौशल्याद्वारेच शक्य आहे. आजच्या शुभ प्रसंगी महाराष्ट्रातील आपल्या मुलामुलींच्या कौशल्य विकासासाठी एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचा शुभारंभ होत आहे. आणि माझ्या समोर जे लाखो युवक बसले आहेत आणि ज्यांनी या कौशल्य विकासाच्या मार्गावर पुढे चालण्याचा संकल्प केला आहे, त्यांना मी अवश्य सांगेन की त्यांच्या जीवनात आजची ही सकाळ मंगल प्रभात बनून आली आहे. महाराष्ट्रात 511 ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांची स्थापना होणार आहे.पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रातील 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा प्रारंभ
October 19th, 04:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 511प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांचा प्रारंभ केला. ग्रामीण युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्राच्या 34 ग्रामीण जिल्ह्यांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या या केंद्रांमध्ये विविध क्षेत्रांतील कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जाणार आहेत.हैद्राबाद इथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
April 08th, 12:30 pm
महान क्रांतिकारकांची भूमी, तेलंगणाला माझे शत-शत वंदन. आज मला तेलंगणाच्या विकासाला आणखी गती देण्याचे सौभाग्य मिळाले आहे. थोड्या वेळापूर्वी तेलंगणा-आंध्र प्रदेश यांना जोडणाऱ्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आहे. ही आधुनिक गाडी आता भाग्यलक्ष्मी मंदिर शहराला भगवान श्री व्यंकटेश्वर धाम तिरूपतीशी जोडणार आहे. म्हणजे एकप्रकारे ही वंदेभारत एक्सप्रेस, श्रद्धा, आधुनिकता, तंत्रज्ञान आणि पर्यटन यांना जोडणारी आहे. त्यासोबतच, आज इथे, 11 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी झाली आहे. हे तेलंगणाच्या रेल्वे आणि रस्ते जोडणीशी संबंधित प्रकल्प आहेत. आरोग्यविषयक पायाभूत सुविधांशी जोडलेले प्रकल्प आहेत. मी विकासाच्या या सर्व प्रकल्पांसाठी, आपल्याला, तेलंगणाच्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचे अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणात हैदराबाद इथे 11,300 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी
April 08th, 12:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तेलंगणाची राजधानी हैदराबाद इथल्या परेड ग्राऊंड इथे 11,300 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी झाली. या प्रकल्पांमध्ये या प्रकल्पांमध्ये हैदराबाद इथल्या बिबीनगर एम्सची पायाभरणी, पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आणि सिकंदराबाद रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास यांचा समावेश आहे.यावेळी, रेल्वेशी संबंधित इतर विकास प्रकल्पांचेही त्यांनी लोकार्पण केले. त्याआधी, पंतप्रधानांनी हैदराबादमधील सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला.भोपाळ ते नवी दिल्ली दरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पंतप्रधानांचे संबोधन
April 01st, 03:51 pm
इंदूर मधल्या मंदिरात रामनवमीला जी दुर्घटना झाली त्याबद्दल मी आधी दुःख व्यक्त करतो. या दुर्घटनेत आपल्यातून अकाली निघून गेलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक भावना व्यक्त करतो.जे भाविक जखमी झाले आहेत, ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा मी व्यक्त करतो.पंतप्रधानांनी मध्य प्रदेशात भोपाळमधील राणी कमलापती स्थानक येथे वंदे भारत एक्सप्रेसला दाखवला हिरवा झेंडा
April 01st, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वे स्थानकावर भोपाळ आणि नवी दिल्ली दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधानांनी कार्यक्रमस्थळी आल्यानंतर राणी कमलापती - नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेसची पाहणी केली आणि रेल्वेगाडीमधील मुले तसेच कर्मचारी यांच्याशी संवादही साधला.महिलांचे आर्थिक सक्षमीकरण या विषयावरील वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 10th, 10:23 am
यंदाच्या अर्थसंकल्पाला भारताने 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्याच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेचा शुभारंभ म्हणून पाहिले आहे ही आपल्या सर्वांसाठीच आनंदाची बाब आहे. या अर्थसंकल्पाकडे भावी अमृतकाळाच्या दृष्टीकोनातून पाहण्यात आले आणि त्याची पडताळणी करण्यात आली आहे. देशातील नागरिक देखील आगामी 25 वर्षांचा संबंध याच उद्दिष्टांशी जोडून पाहत आहेत हा देशासाठी शुभसंकेत आहे."महिलांचे आर्थिक सक्षमीकरण" या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला पंतप्रधानांनी केले संबोधित
March 10th, 10:00 am
पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण या विषयावर अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित केले. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये घोषित केलेल्या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कल्पना आणि सल्ला मिळविण्यासाठी सरकारने आयोजित केलेल्या अर्थसंकल्प पश्चात 12 वेबिनारच्या मालिकेतील हा 11वा वेबिनार होता. पंतप्रधानांनी या वर्षीचा अर्थसंकल्प देशासाठी शुभ असल्याचे सांगून आनंद व्यक्त केला. 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सुरुवात केली आहे. हा अर्थसंकल्प भविष्यातील अमृत काळच्या दृष्टिकोनातून पाहिला आणि तपासला गेला आहे. देशातील नागरिकही या उद्दिष्टांशी जोडून पुढील 25 वर्षांचा वेध घेत आहेत, हे देशासाठी चांगले लक्षण आहे, असे ते म्हणाले.वित्तीय क्षेत्राशी निगडीत अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 07th, 10:14 am
अर्थसंकल्पोत्तर वेबिनारच्या माध्यमातून सरकार अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी संयुक्त स्वामित्व आणि समान भागीदारीचा एक मजबूत मार्ग तयार करीत आहे. या वेबिनारमध्ये तुम्हा लोकांचे विचार आणि तुमच्या शिफारसी यांना खूप महत्व आहे. आपल्या सर्वांचे या वेबिनारमध्ये मी खूप-खूप स्वागत करतो.'विकासाच्या संधी निर्माण करण्यासाठी वित्तीय सेवांची कार्यक्षमता वाढवणे' या विषयावरील अर्थसंकल्प पश्चात वेबिनारला पंतप्रधानांनी केले संबोधित
March 07th, 10:00 am
'विकासाच्या संधी निर्माण करण्यासाठी वित्तीय सेवांची कार्यक्षमता वाढवणे' या विषयावरील अर्थसंकल्प पश्चात वेबिनारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये घोषित केलेल्या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी मते आणि सूचना प्राप्त करण्याच्या दृष्टीने सरकारने आयोजित केलेल्या 12 अर्थसंकल्प पश्चात वेबिनारच्या मालिकेतील हे दहावे वेबिनार आहे.गुजरात रोजगार मेळाव्याला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 06th, 04:35 pm
चारही दिशांना सर्वत्र होळीच्या सणाचा उत्साह आहे. मी देखील तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आजच्या या कार्यक्रमामुळे होळीच्या या महत्त्वाच्या सणानिमित्त हजारो कुटुंबांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. गुजरातमध्ये अल्पावधीतच दुसऱ्यांदा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यासाठी मी आमचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे खूप खूप अभिनंदन करतो.गुजरात रोजगार मेळ्याला पंतप्रधानांनी केले संबोधित
March 06th, 04:15 pm
मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधानांनी नमूद केले की होळीचा सण अगदी समीप आहे आणि गुजरात रोजगार मेळा ही संस्था त्यांची नियुक्ती पत्रे प्राप्त करणार्यांसाठी उत्सवाचा आनंद द्विगुणित करेल. रोजगार मेळा गुजरातमध्ये दुसऱ्यांदा होत आहे हे निदर्शनास आणून पंतप्रधानांनी तरुणांना सातत्याने संधी उपलब्ध करून देण्याच्या आणि देशाच्या विकासात त्यांच्या क्षमतेचा उपयोग करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकला. केंद्र सरकार आणि एनडीएशासित राज्य सरकारचे सर्व विभाग जास्तीत जास्त नोकऱ्या देण्यासाठी निरंतर काम करत आहेत याबद्दल पंतप्रधानांनी संतोष व्यक्त केला. पंतप्रधानांनी माहिती दिली कि केंद्र सरकार व्यतिरिक्त, 14 एनडीए शासित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सातत्याने रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत. नवीन जबाबदारी स्वीकारणारे तरुण हे अमृत काळातील संकल्प साध्य करण्यासाठी पूर्ण समर्पण आणि निष्ठेने योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.‘आरोग्य आणि वैद्यकीय संशोधन’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 06th, 10:30 am
जेव्हा आपण आरोग्याविषयी चर्चा करतो, तेव्हा या विषयाकडे, कोविडपूर्व काळ आणि कोविडोत्तर असं विभागून बघायला हवं. कोविडने संपूर्ण जगाला दाखवून दिलं आणि शिकवलं देखील की जेव्हा इतकं मोठं संकट येतं तेव्हा समृद्ध देशाच्या विकसित व्यवस्था सुद्धा उध्वस्त होतात. जग आता पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त लक्ष आरोग्य सेवेकडे देऊ लागलं आहे, मात्र भारताचा दृष्टीकोन फक्त आरोग्य सेवेपुरताच मर्यादित नाही, तर आपण एक पाऊल पुढे जाऊन निरामयतेसाठी देखील काम करत आहोत. म्हणून आपण जगासमोर एक विचार ठेवला आहे - एक पृथ्वी - एक आरोग्य. म्हणजे जीव सृष्टीसाठी, मग ते मनुष्य असो की प्राणी असो, वृक्षं असोत, सर्वांसाठी एक सर्वंकष आरोग्य सेवेचा विचार आहे. कोविड जागतिक महामारीने आपल्याला हे देखील शिकवलं आहे, की पुरवठा साखळी, किती महत्वपूर्ण विषय बनला आहे. जेव्हा जागतिक महामारी टिपेला होती, तेव्हा काही देशांसाठी औषधं, लसी, वैद्यकीय उपकरणं, अशा जीवन रक्षक गोष्टी दुर्दैवानं हत्यार बनल्या होत्या. गेल्या वर्षांच्या अर्थसंकल्पात भारतानं या सगळ्या विषयांवर खूप लक्ष दिलं आहे. आम्ही सातत्यानं परदेशांवर असलेली अवलंबिता कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा परिस्थितीत सर्वच भागधारकांची भूमिका फार मोठी आहे.आरोग्य आणि वैद्यकीय संशोधनावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला पंतप्रधानांनी केले संबोधित
March 06th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘आरोग्य आणि वैद्यकीय संशोधन’ या विषयावर अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित केले. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये घोषित केलेल्या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कल्पना आणि सूचना प्राप्त करण्याच्या दृष्टीने सरकारने आयोजित केलेल्या 12 अर्थसंकल्पोत्तर वेबिनार मालिकेतील हा नववा भाग आहे.पर्यटनाचा मिशन मोडवर विकास साधणे या विषयावर आयोजित केलेल्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधानांनी केलेलं संबोधन
March 03rd, 10:21 am
या वेबिनार मध्ये उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत आहे. आजचा नवा भारत नव्या कार्यसंस्कृतीसह पुढे वाटचाल करत आहे. यावेळच्या अर्थसंकल्पाचीही खूप प्रशंसा झाली आहे, देशातील लोकांनी या अर्थसंकल्पाला खूप सकारात्मकपणे घेतलं आहे. देशात जुनी कार्य संस्कृती असती तर अर्थसंकल्पाबाबत अशा प्रकारचे वेबिनार आयोजित करण्याचा कुणी विचारही केला नसता. मात्र आज आमचं सरकार अर्थसंकल्पाच्या आधी आणि अर्थसंकल्पानंतरही अर्थसंकल्पाशी संबंधित प्रत्येक भागधारकाशी विस्तृत चर्चा करत असते, या सर्वांना सोबत घेऊन जायचा प्रयत्न करत असते. अर्थसंकल्पातून जास्तीत जास्त फलनिष्पत्ती कशी करता येईल, अर्थसंकल्पाची अंमलबजावणी निर्धारित कालमर्यादेच्या आत कशी पूर्ण होईल याबाबत, तसच अर्थसंकल्पातून मांडण्यात आलेली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, अशा प्रकारचे वेबिनार उत्प्रेरकाप्रमाणे काम करतात. आपण हे जाणताच की सरकारचा प्रमुख म्हणून(गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान म्हणून) काम करण्याचा मला वीस वर्षाहून जास्त अनुभव आहे. या अनुभवाचं सार हे आहे की जेव्हा कुठल्याही धोरणात्मक निर्णयाशी त्या निर्णयाशी संबंधित भागधारक सुद्धा जोडले जातात, सहभागी होतात तेव्हा त्या धोरणाचे परिणाम सुद्धा मनासारखे आणि वेळेत मिळतात. आपण पाहत आहात की गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वेबिनार मध्ये आमच्या सोबत हजारो लोक सहभागी झाले, संपूर्ण दिवसभरात सर्वांनी मिळून खूप विचार मंथन केलं आणि मी हे सांगू शकतो की खूपच महत्त्वपूर्ण सूचना या वेबिनार मधून मांडल्या गेल्या आणि विशेष करुन आगामी काळाच्या अनुषंगाने पुढे आल्या. या वेबिनार मधून, जो अर्थसंकल्प आहे त्यावरच फक्त लक्ष केंद्रित केलं गेलं आणि त्यातूनच प्राप्त परिस्थितीत कसं पुढे जाता येईल याबद्दल खूप उत्तम सूचना आल्या. आज आता आपण देशाच्या पर्यटन क्षेत्राचा कायापालट करण्याबाबत विचार मंथन करण्यासाठी हा वेबिनार करत आहोत.‘मिशन मोडमध्ये पर्यटन विकास’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला पंतप्रधानांनी केले संबोधित
March 03rd, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मिशन मोडमध्ये पर्यटनाचा विकास’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला आज संबोधित केले. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये घोषित करण्यात आलेल्या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कल्पना आणि सूचना प्राप्त करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे आयोजित 12 अर्थसंकल्पोत्तर वेबिनार्सच्या मालिकेतील हे सातवे वेबिनार आहे.'तंत्रज्ञानाचा उपयोग करुन लोकांचे जीवनमान सुखकर करणे' या विषयावर आयोजित अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 28th, 10:05 am
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिवशी आजच्या अर्थसंकल्पीय वेबिनारचा विषय अतिशय महत्वपूर्ण आहे. 21व्या शतकातील बदलता भारत, आपल्या नागरिकांचे तंत्रज्ञानाच्या शक्तीने सातत्याने सक्षमीकरण करत आहे. गेल्या काही वर्षांत आमच्या सरकारने प्रत्येक अर्थसंकल्पात तंत्रज्ञानाच्या मदतीने देशवासियांची जगण्यातील सुलभता वाढविण्यावर भर दिला आहे. या अर्थसंकल्पात देखील तंत्रज्ञान तर आहेच, मात्र त्या सोबतच मानवी भावनांना प्राथमिकता देण्याचा आमचा प्रयत्न आहे.‘तंत्रज्ञानाचा उपयोग करुन राहणीमान सुलभता’ या विषयावर अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला पंतप्रधानांनी केले संबोधित
February 28th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘तंत्रज्ञानाचा उपयोग करून राहणीमान सुलभता’ या विषयावर अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित केले. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये घोषित केलेल्या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कल्पना आणि सूचना प्राप्त करण्यासाठी सरकारने आयोजित केलेल्या 12 अर्थसंकल्पोत्तर वेबिनारच्या मालिकेतील हा पाचवा भाग आहे. 21व्या शतकातील भारत सातत्याने तंत्रज्ञानाचा उपयोग करुन आपल्या नागरिकांना सक्षम बनवत आहे असे पंतप्रधानांनी वेबिनारला संबोधित करताना सांगितले. गेल्या काही वर्षांतील प्रत्येक अर्थसंकल्पात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लोकांचे जीवन सुलभ करण्यावर भर देण्यात आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात तंत्रज्ञान आणि मानवी स्पर्शाला प्राधान्य देण्यात आले आहे यावर त्यांनी भर दिला. मागील सरकारांच्या प्राधान्यक्रमातील विरोधाभास पंतप्रधानांनी अधोरेखित केला. त्यांनी आठवण करून दिली की लोकांचा एक विशिष्ट वर्ग नेहमीच लोकांचे भले व्हावे यासाठी सरकारी हस्तक्षेपाची अपेक्षा करत राहिला. मात्र, या सुविधांअभावी त्यांचे संपूर्ण आयुष्य व्यतीत झाल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी लोकांचा आणखी एक भाग अधोरेखित केला ज्यांना पुढे जायचे होते परंतु दबाव आणि सरकारी हस्तक्षेपामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे ते खालीच ओढले गेले. पंतप्रधानांनी घडलेल्या बदलांची नोंद घेत सांगितले की जीवन सोपे बनवताना आणि राहणीमान सुलभता वाढवताना अत्यंत आवश्यक असलेल्या परिस्थितीत धोरणे आणि त्यांचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. सरकारी हस्तक्षेप कमी झाला असून नागरिक सरकारला अडथळा मानत नाहीत, असेही त्यांनी नमूद केले. त्याऐवजी, पंतप्रधान म्हणाले की नागरिक सरकारकडे एक उत्प्रेरक म्हणून पाहत आहेत. इथे तंत्रज्ञानाने खूप मोठी भूमिका बजावली आहे. एक राष्ट्र एक शिधापत्रिकाअर्थसंकल्पोत्तर वेबिनार,' शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे ' मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 27th, 10:16 am
साधारणपणे अशी परंपरा असते की अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यावर संसदेत चर्चा होते, आणि ही चर्चा आवश्यकही असते, उपयुक्तही असते. मात्र आमचे सरकार अर्थसंकल्पावरील चर्चा आणखी एक पाऊल पुढे घेऊन आले आहे. गेल्या काही वर्षांपासून आमच्या सरकारने अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी आणि त्यानंतरही सर्व हितसंबंधी घटकांसोबत सखोल विचारमंथन करण्याची परंपरा सुरू केली आहे. आणि अर्थसंकल्पाची अंमलजावणी करण्यासाठी, कालबध्द नियोजन करण्यासाठी देखील हे अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे करदात्यांच्या पै न पैंचा योग्य वापर होईल, हे ही सुनिश्चित होईल. गेल्या काही दिवसांपासून मी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करतो आहे.‘‘शेवटच्या मैलापर्यंत पोहचणे’ या विषयावरील अर्थसंकल्पीय वेबिनारला पंतप्रधानांनी केले संबोधित
February 27th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘शेवटच्या गावापर्यंत पोहचणे ’ या विषयावरील अर्थसंकल्पीय वेबिनारला संबोधित केले. वर्ष 2023 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित केलेल्या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कल्पना आणि सूचना मागवण्यासाठी सरकारने आयोजित केलेल्या 12 अर्थसंकल्पोत्तर वेबिनारच्या मालिकेतील हे चौथे वेबिनार आहे.