वाराणसी - पंडित दीनदयाळ उपाध्याय (DDU) जंक्शन रेल्वे मार्गावर अतिरिक्त रेल्वे मार्गिका उभारण्यासह, गंगा नदीवरील नवीन रेल्वे तसेच रस्ते मार्ग पूल (rail-cum-road bridge) उभारण्याच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
October 16th, 03:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत रेल्वे मंत्रालयाद्वारे प्रस्तावित 2,642 कोटी रुपये (अंदाजे) इतक्या एकूण अंदाजित खर्चाच्या एका प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. आज मंजुरी दिलेला प्रस्तावित प्रकल्प बहुपदरी - मार्गिकांविषयीचा (multi - tracking) असून, या प्रकल्पामुळे रेल्वेचे परिचालन सुलभ होणार असून, त्यामुळे गर्दीचे प्रमाणही कमी होऊ शकणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत भारतीय रेल्वेमार्गावरील सर्वाधिक वर्दळ असलेल्या विभागांमधील आवश्यक पायाभूत सोयी सुविधांचा विकास केला जाणार आहे. हा प्रकल्प उत्तर प्रदेशातील वाराणसी आणि चंदौली जिल्ह्यांतर्गत राबवला जाणार आहे.पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन
January 12th, 07:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन केले. मोदींनी छायाचित्र दालन आणि अटल सेतूच्या प्रदर्शनीय प्रतिकृतीचा आढावा घेतला.पंतप्रधान 12 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर
January 11th, 11:12 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांचे दुपारी 12:15 च्या सुमाराला नाशिक येथे आगमन होणार असून येथे ते 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान दुपारी साडेतीनच्या सुमाराला, मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी - न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन करणार असून प्रवाससुद्धा करणार आहेत. नवी मुंबई येथे दुपारी 4:15 च्या सुमारास, पंतप्रधान एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. या कार्यक्रमात ते विविध विकासकामांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील.