14 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान सहभागी
June 24th, 09:40 pm
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या अध्यक्षतेखाली 23-24 जून 2022 रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित 14 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या वतीने सहभाग नोंदवला. ब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोलसोनारो, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामफोसा हे देखील (23 जून) शिखर परिषदेत सहभागी झाले होते. 24 जून रोजी बिगर -ब्रिक्स सहभाग अंतर्गत जागतिक विकासावर उच्चस्तरीय संवाद आयोजित करण्यात आला होता.पंतप्रधानांनी भूषविले 13 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद
September 09th, 09:21 pm
यावर्षी भारताच्या अध्यक्षते दरम्यान ब्रिक्स भागीदारांकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली. ज्यामुळे अनेक नवीन उपक्रम साध्य झाले.यात पहिली ब्रिक्स डिजिटल आरोग्य शिखर परिषद; बहुपक्षीय सुधारणांवरील पहिले ब्रिक्स मंत्रीस्तरीय संयुक्त निवेदन; ब्रिक्स दहशतवादविरोधी कृती आराखडा ; रिमोट सेन्सिंग उपग्रहांच्या क्षेत्रातील सहकार्यावरील करार; आभासी ब्रिक्स लस संशोधन आणि विकास केंद्र; हरित पर्यटनाबाबतची ब्रिक्स आघाडी इत्यादींचा यात समावेश आहे.13 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधानांचे उद्घाटनपर भाषण
September 09th, 05:43 pm
या ब्रिक्स शिखर परिषदेत मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. ब्रिक्सच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त या शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषविणे ही माझ्यासाठी आणि भारतासाठी खूप आनंदाची बाब आहे. तुमच्यासोबत होत असलेल्या या शिखर परिषदेचा तपशीलवार अजेंडा आपल्याकडे आहे. जर तुम्ही सर्व सहमत असाल तर आपण हा अजेंडा स्वीकारू शकतो. धन्यवाद, अजेंडा आता स्वीकारला गेला आहे.13 वी ब्रिक्स शिखर परिषद
September 07th, 09:11 am
2021 मध्ये ब्रिक्सच्या भारताच्या अध्यक्षतेचा भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 सप्टेंबर 2021 रोजी होणाऱ्या आभासी स्वरूपातील (व्हर्च्युअल) 13 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्ष असतील. या बैठकीला ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोलेसनारो, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सायरिल रामाफोसा उपस्थित राहणार आहेत. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, न्यू डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष मारकोस ट्रोयजो, ब्रिक्स व्यवसाय परिषदेचे अस्थायी अध्यक्ष ओंकार कंवर आणि ब्रिक्स महिला व्यवसाय आघाडीच्या अस्थायी अध्यक्ष डॉ. संगीता रेड्डी शिखर परिषदे दरम्यान नेत्यांना त्यांच्या क्षेत्राशी संबंधित त्याअंतर्गत या वर्षी पाठविलेल्या निकालांचे अहवाल सादर करतील.