ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांना शस्त्रक्रियेनंतर उत्तम आरोग्य आणि प्रकृतीत वेगाने सुधारणेसाठी पंतप्रधानांकडून शुभेच्छा
December 12th, 09:50 pm
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्या शस्त्रक्रियेनंतर उत्तम आरोग्य आणि प्रकृतीत वेगाने सुधारणेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना शुभेच्छा दिल्या.दुसऱ्या भारत-कॅरिकॉम शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले समारोपीय भाषण
November 21st, 02:21 am
आपण सर्वांनी दिलेल्या मौल्यवान सूचनांचे आणि व्यक्त केलेल्या सकारात्मक विचारांचे मी स्वागत करतो. माझा चमू तुमच्याबरोबर भारताच्या प्रस्तावांच्या संदर्भात सर्व तपशील सामायिक करेल आणि आपण सर्व बाबतीत कालबद्ध रितीने पुढे जाऊ.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली चिलीच्या राष्ट्राध्यक्षांची भेट
November 20th, 08:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 नोव्हेंबर रोजी चिली प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फॉन्ट यांची ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जी -20 शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट घेतली. ही त्यांची पहिली भेट होती.पंतप्रधानांनी अर्जेंटिनाच्या अध्यक्षांची घेतली भेट
November 20th, 08:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जी 20 शिखर परिषदेच्या निमित्ताने 19 नोव्हेंबर रोजी अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मिलेई,यांची भेट घेतली.रिओ दि जानेरो येथील G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली
November 20th, 08:05 pm
रिओ दि जानेरो येथे सुरु असलेल्या G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 नोव्हेंबर रोजी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांची भेट घेतली.पंतप्रधानांनी जोनास मसेट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेतली; वेदांत आणि गीता यात त्यांना असलेल्या रुची बद्दल केले कौतुक
November 20th, 07:54 am
वेदांत आणि गीता याविषयी असलेल्या रुचीबाबत जोनास मासेट्टी यांचे कौतुक करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज असे नमूद केले की भारतीय संस्कृती जगभरात जो प्रभाव पाडत आहे ते कौतुकास्पद आहे. संस्कृतमधील रामायणाचे जोनास मासेट्टी आणि त्यांच्या सहकार्याने केलेले सादरीकरण पाहून पंतप्रधानांनी त्यांची भेट घेतली.प्रशासनासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि डाटा संदर्भातील जाहिरनामा - अनेक जी 20 देशांनी, अतिथी देशांनी तसेच आंतरराष्ट्रीय संघटनांनी मान्यता दिलेले आणि भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या जी 20 मधील त्रयीतर्फे सादर करण्यात आलेले संयुक्त परिपत्रक
November 20th, 07:52 am
केवळ 3 टक्क्याची जागतिक वृद्धी ही या शतकातील सर्वात नीचांकी वृद्धी असून महामारीच्या आधीपर्यंत या वृद्धीचा दर सुमारे 4 टक्के होता. त्याच वेळी तंत्रज्ञान मात्र भोवळ आणणाऱ्या वेगाने प्रगती करत असून जर न्याय्य पद्धतीने वापरले तर हे तंत्रज्ञान आपल्याला वृद्धीचा दर वाढवण्याची ऐतिहासिक संधी देते, असमानता कमी करते आणि शाश्वत विकास उद्दीष्ठांची (एसडीजीज)पूर्तता करण्यातील दरी भरून काढण्याच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल ठरते.डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा व्यवस्थापनावर भर ही सर्वसमावेशक विकास साध्य करण्याची आणि जागतिक स्तरावर जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची गुरुकिल्ली आहे: पंतप्रधान
November 20th, 05:04 am
सर्वसमावेशक वाढ साध्य करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर जीवन बदलण्यासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा व्यवस्थापन महत्त्वाचे आहे यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भर दिला.तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणाला प्राधान्य देऊन भारत आरोग्य क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहे : पंतप्रधान
November 20th, 05:02 am
आपण राहतो तो ग्रह निरोगी असेल तरच तो चांगला ग्रह आहे असे अधोरेखित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणाले की भारत आरोग्य क्षेत्रात सक्रियपणे काम करत असून तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणाला मोठे प्राधान्य देत आहे. यावेळी त्यांनी हे देखील नमूद केले की भारत या संदर्भात सुरू असलेल्या जागतिक प्रयत्नांना अधिक बळकटी देईल.तंत्रज्ञानामध्ये शाश्वत विकास उद्दिष्टांसंदर्भात वेगाने प्रगती साधण्यासाठी आणि जागतिक स्तरावर जीवन सक्षम बनवण्यासाठी अफाट क्षमता आहे: पंतप्रधान
November 20th, 05:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की तंत्रज्ञानामध्ये शाश्वत विकास उद्दिष्टांसंदर्भात वेगाने प्रगती साधण्यासाठी आणि जागतिक स्तरावर जीवन सक्षम बनवण्यासाठी अफाट क्षमता आहे.शाश्वत विकास आणि ऊर्जा संक्रमणावरील जी 20 सत्रातील पंतप्रधानांचे भाषण
November 20th, 01:40 am
आजच्या सत्राची संकल्पना अतिशय प्रासंगिक आहे आणि भावी पिढीच्या भविष्याशी निगडित आहे. नवी दिल्ली जी -20 शिखर परिषदेदरम्यान, आपण शाश्वत विकास उद्दिष्टांना गती देण्यासाठी वाराणसी कृती आराखडा स्वीकारला होता.पंतप्रधानांनी शाश्वत विकास आणि उर्जा स्थित्यंतरावर आधारित जी20 सत्राला संबोधित केले
November 20th, 01:34 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी20 शिखर परिषदेतील शाश्वत विकास आणि उर्जा स्थित्यंतरावर आधारित सत्राला संबोधित केले. नवी दिल्ली येथे आयोजित जी 20 शिखर परिषदेदरम्यान या गटाने वर्ष 2030 पर्यंत नवीकरणीय उर्जा क्षमता तिप्पट करण्याचा आणि उर्जा कार्यक्षमता दर दुप्पट करण्याचा संकल्प केला होता याचा त्यांनी उल्लेख केला. या शाश्वत विकासविषयक प्राधान्यक्रमांना पुढे नेण्याच्या ब्राझीलच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले.Joint Statement: 2nd India-Australia Annual Summit
November 19th, 11:22 pm
PM Modi and Anthony Albanese held the second India-Australia Annual Summit during the G20 Summit in Rio de Janeiro. They reviewed progress in areas like trade, climate, defence, education, and cultural ties, reaffirming their commitment to deepen cooperation. Both leaders highlighted the benefits of closer bilateral engagement and emphasized advancing the Comprehensive Economic Cooperation Agreement (CECA) to strengthen trade and investment ties.इटली-भारत संयुक्त सामरिक कृती योजना 2025-2029
November 19th, 09:25 am
भारत-इटली सामरिक भागीदारीचे अतुलनीय महत्त्व लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी ब्राझीलमध्ये रिओ-दि-जानेरो येथे जी-20 शिखर परिषदेतील 18 नोव्हेंबर 2024 च्या बैठकीदरम्यान, तिला अधिक गती देण्याचा निर्णय घेतला. यासाठी पुढीलप्रमाणे लक्ष्यकेंद्री आणि कालबद्ध उपक्रम आणि सामरिक कृतीची संयुक्त योजना आखण्यात आली आहे. या दिशेने, इटली आणि भारत या देशांनी पुढील गोष्टींना मान्यता दिली आहे:पंतप्रधानांनी घेतली इटलीच्या पंतप्रधानांची भेट
November 19th, 08:34 am
ब्राझीलमध्ये रिओ द जानिरो येथे आयोजित जी20 परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी आज इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. या दोन पंतप्रधानांची गेल्या दोन वर्षांतील ही पाचवी भेट आहे. आजच्या भेटीआधी जून 2024 मध्ये इटलीत पुगलिया येथे पंतप्रधान मेलोनी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जी 7 शिखर परिषदेनिमित्त या दोन नेत्यांची भेट झाली होती. सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत जी 7 चे नेतृत्व करत असल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान मेलोनी यांचे अभिनंदन केले.पंतप्रधान आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष यांची झाली भेट
November 19th, 06:09 am
ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष एचई प्रबोवो सुबियांटो यांची आज भेट घेतली. दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती.पंतप्रधानांनी घेतली पोर्तुगालच्या पंतप्रधानांची भेट
November 19th, 06:08 am
ब्राझीलमध्ये रिओ द जानिरो येथे आयोजित जी20 परिषदेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोर्तुगालचे पंतप्रधान लुईस माँटेनेग्रो यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांची परस्परांशी ही पहिलीच भेट होती. पंतप्रधान माँटेनेग्रो यांनी एप्रिल 2024 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि पोर्तुगाल यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणखी दृढ तसेच आणखी मजबूत करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा मनोदय व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांच्या पंतप्रधान म्हणून तिसऱ्या कार्यकाळाबद्दल पंतप्रधान माँटेनेग्रो यांनी त्यांचे अभिनंदन केले.पंतप्रधानांनी नॉर्वेच्या पंतप्रधानांची घेतली भेट
November 19th, 05:44 am
जी-20 शिखरपरिषदेनिमित्त रिओ दि जानेरो येथे दाखल झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेथे नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गार स्टोर यांची भेट घेतली.पंतप्रधान मोदी आणि युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान यांची भेट
November 19th, 05:41 am
ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि युनायटेड किंग्डमचे महामहीम पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांची आज भेट झाली.दोन्ही देशांतील पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान स्टार्मर यांचे पदभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केले. पंतप्रधान स्टार्मर यांनीही पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या ऐतिहासिक तिसऱ्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.पंतप्रधानांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट
November 19th, 05:26 am
ब्राझीलमध्ये रिओ द जानिरो येथे आयोजित जी20 परिषदेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रोन यांची भेट घेतली. यावर्षी जानेवारी महिन्यात प्रजासत्ताक दिन सोहोळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांच्या भारत भेटीदरम्यान दोन नेत्यांची झालेली भेट तसेच जून महिन्यात इटली येथे जी 7 शिखर परिषदेच्या अनुषंगाने घेतलेल्या बैठकीच्या वेळी झालेल्या भेटीनंतर पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांची या वर्षभरातील ही तिसरी भेट आहे.