मंत्रिमंडळाने बहु-राज्य सहकारी संस्था (एमएससीएस) अधिनियम, 2002 अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील बहु-राज्य सहकारी बियाणे सोसायटी स्थापनेसाठी दिली मान्यता
January 11th, 03:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बहु राज्य सहकारी संस्था (एमएससीएस) कायदा, 2002 अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील बहु-राज्यीय बियाणे सहकारी संस्था स्थापन करून तिला प्रोत्साहन देण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला मान्यता दिली आहे. राष्ट्रीय स्तरावरील बहु-राज्यीय बियाणे सहकारी संस्था दर्जेदार बियाणांचे उत्पादन, खरेदी, प्रक्रिया, ब्रँडिंग, लेबलिंग, पॅकेजिंग, साठवण, विपणन आणि वितरण यासाठी सर्वोच्च संस्था म्हणून काम करेल. याशिवाय, धोरणात्मक संशोधन आणि विकास; देशी वाणांच्या नैसर्गिक बियाणांचे संरक्षण आणि संवर्धन यासाठी एक प्रणाली विकसित करणे हे देखील या संस्थेचे महत्वपूर्ण कार्य असेल. ही सर्वोच्च संस्था देशभरातील विविध सहकारी संस्थांमार्फत, विशेषत: कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) आणि राष्ट्रीय बियाणे महामंडळ (एनएससी) यांच्या योजना आणि संस्थेच्या सहाय्याने ‘संपूर्ण सरकार दृष्टीकोनाचे’ पालन करेल.गोव्यामधील कोविड प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाचे लाभार्थी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 18th, 10:31 am
गोव्याचे उर्जावान आणि लोकप्रिय मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, गोव्याचे सुपुत्र श्रीपाद नाईक, केंद्र सरकारमधील मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी डॉक्टर भारती पवार, गोव्याचे सर्व मंत्री, खासदार आणि आमदार, इतर लोकप्रतिनिधी, सर्व कोरोना योद्धे, बंधू आणि भगिनींनो!गोव्यातील कोविड लसीकरण कार्यक्रमात पंतप्रधानांनी साधला आरोग्य कर्मचारी आणि लाभार्थ्यांशी संवाद
September 18th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यातील कोविड लसीकरण मोहिम कार्यक्रमात, आरोग्य कर्मचारी आणि आणि लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. गोव्यात प्रौढ लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण झाल्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.