बोइंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन आणि बोईंग सुकन्या कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या वेळी पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 19th, 03:15 pm
बेंगळुरूमध्ये परदेशातील सर्व आदरणीय पाहुण्यांचे हार्दिक स्वागत. बेंगळुरू हे आकांक्षांना नवकल्पना आणि यशाची जोड देते आणि भारताच्या तांत्रिक क्षमतेला जागतिक मागणीशी संलग्न करते. ही ओळख अधिक मजबूत करण्यासाठी बेंगळुरूमध्ये बोईंगच्या नवीन जागतिक तंत्रज्ञान संकुलाचे उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे, हे संकुल अमेरिकेबाहेर बोईंग कंपनीची सर्वात मोठी सुविधा आहे, जे केवळ भारतालाच नव्हे तर जागतिक विमान वाहतूक बाजारालाही नवीन ऊर्जा देईल. पण मित्रांनो, या सुविधेचे महत्त्व इतकेच मर्यादित नाही. या सुविधेचे महत्त्व जागतिक तांत्रिक प्रगती, संशोधन, नवोन्मेष, संरचना आणि मागणी यांच्या पूर्ततेत भारताच्या वचनबद्धतेशी निगडित आहे. ते 'मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड' या आमच्या संकल्पाला बळ देते. शिवाय, या संकुलाची उभारणी ही भारताच्या प्रतिभेवर जगाचा विश्वास अधोरेखित करते. आजचा सोहोळा हा एक दिवस भारत या सुविधेत 'भविष्यातील विमान' डिझाइन करेल या विश्वासाचा आहे. म्हणून, मी संपूर्ण बोईंग व्यवस्थापन आणि सर्व हितधारकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो; आणि तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा.पंतप्रधानांच्या हस्ते कर्नाटकातील बंगळुरू येथे नवीन अत्याधुनिक बोईंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्र संकुलाचे उद्घाटन
January 19th, 02:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातील बंगळुरू येथे नवीन अत्याधुनिक बोईंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्र संकुलाचे उद्घाटन केले. 1,600 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह बांधण्यात आलेले हे 43 एकर क्षेत्राचे संकुल बोइंगची अमेरिकेबाहेरची अशी सर्वात मोठी गुंतवणूक आहे. पंतप्रधानांनी बोईंग सुकन्या कार्यक्रमाचा देखील प्रारंभ केला ज्याचा उद्देश देशातील वाढत्या विमान वाहतूक क्षेत्रात भारतातील जास्तीत जास्त मुलींच्या प्रवेशाला पाठबळ देणे हा आहे.बोइंगचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड एल. कॅल्हॉन यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
June 24th, 07:21 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 जून 2023 रोजी वॉशिंग्टन डीसी येथे बोइंगचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड एल. कॅल्हॉन यांची भेट घेतली.